चित्रपटाचं उत्कृष्ट कथानक हे त्याचं 'युएसपी' असतंच पण त्याच्या साथीला कलाकारांच्या नव्या जोड्या हा रंगतदार चौफेर विषय. आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत.
Read More
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'शिवराज अष्टक' उभारण्याचे बहुमोलाचे काम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केले. नुकताच शिवाष्टकातील 'सुभेदार' हे पाचवे पुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आले. यात नरवीर सुभेदार तान्हाजी मालूसरे यांची भूमिका अभिनेते अजय पुरकर यांनी अतिशय उत्कृष्टरित्या साकारली आहे. सुभेदार चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयानंतर अजय पुरकर यांची वर्णी थेट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लागली आहे. सध्या अनेक मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावर इतर भाषिक चित्रपटसृष्टीत यश म
२५ ऑगस्टला प्रदर्शित झालेला व दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला 'सुभेदार' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर हाउसफुलची पाटी मिरवत आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त, शेर शिवराज आणि पावनखिंड या चार चित्रपटांच्या अद्भुत यशानंतर श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला हा चित्रपट सिंहगडाची शौर्यगाथा मांडतो.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवाष्टकातील पाचवे पुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट काल २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. समाज माध्यमावर एकीकडे या चित्रपटाचे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या टीमची चिंता वाढवणारी गोष्ट होत आहे. सुभेदार चित्रपटाचा क्लायमॅक्स फोनवर शुट करुन समाज माध्यमावर वायरल केला जात असल्याने दिग्पाल लांजेकर यांनी प्रेक्षकांना इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ पोस्ट करत क्लायमॅक्स वायरल न करण्याची विनंती केली आहे
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या चित्रपटातून तानाजी मालूसरेंच्या शौर्याची गाथा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला इतिहास रुपेरी पडद्यावर मांडण्याचे काम ‘शिवराज अष्टक’ मार्फत दिग्पाल लांजेकर करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सुभेदार चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आणि या चित्रपटातील ‘आले मराठे’ हे दुसरे गाणे देखील नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
“चित्रपट हा ऐतिहासिक दस्तऐवज असू शकत नाही. परंतु 'शिवराज अष्टक' या श्रृंखलेमार्फत येणाऱ्या भावी पिढीला आपला इतिहास समजावा हा माझा अट्टहास आहे”, असे मत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना मांडले. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटानंतर याच श्रृंखलेतील पाचवे पुष्प असणारा 'सुभेदार' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित असणार आहे. दरम्यान, या चित्रपटाची
शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांच्या नेत्रदीपक कर्तृत्वाने शिवकालीन इतिहास झळाळून उठला आहे. अशा शूरवीर योद्ध्यांनी आपल्यापैकी प्रत्येकालाच प्रेरित केले आहे.
शिवचरित्र रुपेरी पडद्यावर यावं, नव्या पिढीच्या भावविश्वात छत्रपती शिवाजी महाराज पोहोचावे, यासाठी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवराज अष्टक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज हैं’, ‘पावनखिंड’ या चार यशस्वी चित्रपटांनंतर ‘सुभेदार’ हा ‘शिवराज अष्टका’तील त्यांचा पाचवासिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा, या ‘शिवराज अष्टाकां’मागचं प्रयोजन आणि आतापर्यंत या चित्रपटांना मिळालेला रसिकप्रेक्षकांचा प्रतिसाद, अशा विविध मुद्द्यांवर आज शिवजयंतीनिमित्त
मागील काही वर्षांपासून मराठी सिनेपटलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्यगाथांचा देदीप्यमान जागर सुरू आहे. वर्तमानकाळात रसिकांना शिवकालीन इतिहासाच्या क्षणांचे साक्षीदार बनवण्याच्या या वाटेवर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता-निर्माता दिग्पाल लांजेकरचे मोलाचे योगदान आहे.
कर्जत तालुक्यातील दहिवली गावातील सर्वांत जुनी वास्तू म्हणजे पिंपुटकर सुभेदारांचा वाडा होय. साधारणतः शके 1714 म्हणजे इसवी सन 1792 मध्ये विठ्ठल मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद मिळते. विचार केला असता त्या आधी पिंपुटकर सुभेदार इथे आले आणि त्यांनी निवास केला व दहिवली गावाला व्यापक रूप मिळत गेले. त्याचवेळी विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात पंचायतन आकार घेत होते. याच परिसरात अनेक जुन्या वृक्षांना पार बांधण्यात आले; आजही त्यातील चार पार शाबूत आहेत. तीन पार विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आहेत, तर एक पार हे गुरव आळीतील प
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या देहावसानाला आज, दि. १ ऑगस्ट, २०२० रोजी १०० वर्षे होत आहेत. लोकमान्यांच्या पुण्यस्मृतीच्या शताब्दीच्या निमित्ताने कल्याणच्या सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाच्यावतीने त्यांना अभिवादन करणे हा या लेखाचा हेतू.
'अन्न, वस्त्र, निवारा' यापेक्षा 'अन्न-वस्त्रे व विचार' अशी त्रिसूत्री अंमलात येणे अत्यावश्यक आहे