( Patotsav festival celebrated at Shri Kalaram Temple ) नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात सोमवार, दि. १० मार्च रोजी पाटोत्सवाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. आमलकी एकादशीच्या मुहूर्तावर काळाराम मंदिरात रामरायाला 32 हात पांढरेशुभ्र वस्त्र प्रदान करण्यात आले. तसेच रामरायासह लक्ष्मणाला परंपरेनुसार तब्बल ३२ हात लांब फेटा बांधण्यात आला. गेल्या २७ पिढ्यांपासून पुजारी घराण्यातील ही परंपरा असून अनेक शतके या परंपरेचे पालन केले जात आहे.
Read More