Sports

'योगा ऑन स्ट्रीट' चारकोप स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनचा अनोखा उपक्रम!

चारकोप स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईतील सर्वात मोठा 'योगा ऑन स्ट्रीट' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुमारे ३ हजार योग साधक दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी होतात. दरम्यान शुक्रवार दि. २१ जून २०२४ रोजी चारकोप मार्केट, कांदिवली (पश्चिम) मुंबई येथे सकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच या भव्य-दिव्य अशा 'योगा ऑन स्ट्रीट' कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चारकोप कल्चरल अ‍ॅण्ड स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील अंकम यांनी केले आहे.

Read More

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या १० खेळाडूंचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील १० खेळाडूंनी क्रिडा क्षेत्रातील मानाचा असा शिवछत्रपती पुरस्कार मिळवून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विजेत्या खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले, ठाणे जिल्ह्याची परंपरा आहे की,येथील खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही असेच खेळत राहा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, यामुळे आमचाही उत्साह वाढेल, असे कौतुकोद्वार जिल्हा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121