योगशास्त्रातील अष्टांगापैकी अतिशय महत्त्वाचे सातवे अंग म्हणजे ध्यान. आजकालच्या ‘सॉफिस्टिकेटेड’ समाजामध्ये ध्यान म्हणजे काय, हेच माहिती नसल्याकारणाने ध्यानाचा ‘पॉम्प शो’ (दिखाऊ प्रदर्शन) तेवढे पाहायला मिळते. त्यानिमित्ताने ‘ध्यान’ या संकल्पनेविषयी केलेले हे चिंतन...
Read More
महाकुंभ मेळ्यात सनातनी श्रद्धाळूंचा लोटलेला महापूर आणि त्यातून जगाला दिसलेली सनातन संस्कृतीची विलक्षण शक्ती ही जगाला आश्चर्याचा धक्का देणारीच होती. या कुंभमेळ्याचे केलेले आयोजन यामुळे अनेक देशविघातक वृत्तींनाही मोठाच धक्का बसला आहे. असे असले तरीही श्रद्धाळू भक्तांना निश्चितच अलौकिक सुखाचा अनुभव मिळाला यात शंका नाही.
ध्यान, प्राणायाम, वेगवेगळ्या मुद्रा, घरातील संस्कारांच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत, युवा पिढी घडवणार्या रुपेश बाविस्कर यांच्याविषयी...
जगातील अनेक देशांच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षाही, अधिक लोकांनी सध्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात स्नान केले आहे. भारत सरकार इतक्या प्रचंड जनसंख्येचे सुयोग्य व्यवस्थापन कसे करू शकते, हे जगाने पाहिले. अनेक देशांतील लोकही यात सहभागी झाल्यामुळे, जगालाही सनातन धर्माचे विश्वरूपदर्शन झाले आहे.
भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार!
प्रयागराजमध्ये होत असलेला, महाकुंभ ( Prayagraj Mahakumbh ) हा परमेश्वरी कृपा आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करणे, म्हणजे मोक्षप्राप्तीच. हा एक धार्मिक विधी नाही, तर आत्मशुद्धी, तपश्चर्या आणि भगवंताशी संपूर्णतः एकरूप होण्याचा अनुपम योग आहे. वेद, उपनिषदे आणि पुराणांमध्ये महाकुंभाचे महत्त्व अनादिकालापासून सांगितले गेले आहेच. महाकुंभ म्हणजे हा परमात्म्याच्या साक्षात्काराचा आणि ईश्वरी तेजाच्या अनुभूतीचा प्रसादच. या महाकुंभाविषयी परंपरेचा घेतलेला
नवी दिल्ली : “अध्यात्म आणि विज्ञान यात कोणताही परस्परविरोध नाही. विज्ञानाबरोबरच अध्यात्मातही श्रद्धा असलेल्या व्यक्तीलाच न्याय मिळतो. त्याचवेळी ज्याला आपल्या ज्ञानाचा अहंकार आहे, त्याला तो मिळत नाही. श्रद्धेमध्ये अंधत्वाला स्थान नाही,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) ( RSS ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी केले.
महाशिवरात्रीचा शाब्दिक अर्थ "भगवान शिवाची महान रात्र" किंवा "शिवाची रात्र" असा होतो. भगवान शिव हे शुद्ध आणि दैवी गुण पुनःनिर्मितीसाठी मार्ग तयार करणारे आणि जुन्या आणि अपवित्राचा नाश करणारे आहेत. आपला अहंकार, आसक्ती आणि अज्ञानावर नियंत्रण ठेवण्यासाठी भगवान शिव आपली जागरुकता वाढवतात. अनेकांना भगवान शिवाच्या संहारक शक्तीची भीती वाटते, परंतु पुनरुत्पादनाच्या उद्देशाने तो विनाश आहे. मृत्यूशिवाय जीवन पुन्हा सुरू होऊ शकत नाही. जुन्या वाईट सवयी, आसक्ती आणि अहंकार नष्ट केल्याशिवाय आपण ईश्वरप्राप्तीच्या दिशेने प्रगती
भारतातील राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, अध्यात्म वगैरे जवळपास सर्व क्षेत्रांतील सर्वोच्च व्यक्ती एकाच ठिकाणी एकाच सोहळ्यात एकत्र आल्याचे उदाहरण भारताच्या इतिहासात नाही. पण, सोमवारी अयोध्येत झालेल्या प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ही गोष्ट प्रत्यक्षात घडली. भारताच्या सर्व भागांतील आणि सर्व क्षेत्रांतील दिग्गज नेते आणि कलाकार या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहिले होते, हीच प्रभू रामांची ताकद आणि प्रभाव...
कौशांबी येथील रहिवासी असलेल्या ७३ वर्षीय रामचंद्र केसरवानी यांनी रामनाम पुस्तिकेवर २.८६ कोटींहून अधिक वेळा प्रभू रामाचे नाव कोरले आहे. ही पुस्तिका त्यांनी अयोध्येतील आंतरराष्ट्रीय श्री सीता राम नाम बँकेत जमा केली आहे. केसरवाणी हे ऑगस्ट २०१० मध्ये उत्तर प्रदेश राज्य पाटबंधारे विभागातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एप्रिल २०११ मध्ये रामनाम लिहायला सुरुवात केली आणि तेव्हापासून दररोज किमान ५ हजार वेळा त्यांनी प्रभू रामाचे नाव कोरले आहे.
‘वाद-विवाद-संवाद’ या विषयावर मागील आठ श्लोकांतून समर्थांनी आपले विचार वेगवेगळ्या पद्धतीने मांडले आहेत. वादविवादाला उद्युक्त करणार्या अहंभावाला विवेकाने आवरता येते. विवेकाने अहंकाराला दूर सारून आपल्या आचारविचारात पालट करायचा असेल, तर परमेश्वराची भक्ती केली पाहिजे.
आयुर्वेदाचा आधार लेखक सुश्रुत वनस्पतींची भाषा समजू शकत होता आणि त्यामुळे त्याला वनस्पतींचे गुण आपोआप समजत असत. म्हणूनच त्याचे नाव ‘सुश्रुत’ असे सार्थ ठेवण्यात आले.
सुर्याच्या किरणांचे पृथक्करण केल्यास त्यातून दृश्यमान होणारे सप्तरंगच असतात. परंतु, या सप्तरंगापूर्वी आणि नंतरही अनेक रंग शलाका असतात. लाल रंगापूर्वीच्या रंग शलाकांना ‘इन्फ्रारेड’, तर जांभळ्या रंगानंतरच्या रंगशलाकांना ‘अल्ट्रावायोलेट’ असे म्हणतात. विद्युत उपकरणात या रंगशलाका दृग्गोचर होतात, पण मानवी नेत्र त्या रंगशलाका पाहू शकत नाही.
समर्थांच्या मते, आपली कृती, आपण करीत असलेली क्रिया महत्त्वाची आहे. नुसत्या क्रियाशून्य बडबडीला काही अर्थ नसतो. अशी बडबड, असा उपदेश लोक तेवढ्यापुरता ऐकतात व विसरतात. कारण, त्यामागे सांगणार्याच्या शब्दाला कृतीचे पाठबळ नसल्याने ते सांगणे, तो उपदेश प्रभावशाली होऊ शकत नाही.
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने त्यांची नवीन ऑफरिंग ईझीदर्शन लाँच केले आहे. हे समर्पित व्यासपीठ भारतभरात सर्वसमावेशक तीर्थक्षेत्र पॅकेजेस् प्रदान करत पर्यटकांच्या आध्यात्मिक गरजांची पूर्तता करण्यासाठी बारकाईने डिझाइन करण्यात आले आहे.
समर्थ सांगत आहेत की, तुमच्या हितासाठी जे सत्य आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. तुमच्या हितासाठी तुम्हाला याचा शोध घ्यायचा आहे. आत्मप्रचिती घ्यायची आहे. माझे सांगणे जसेच्या तसे न स्वीकारता खरे हित शोधण्याचा तुम्हीच प्रयत्न करा. आत्मप्रचितीने खर्या हिताची जाणीव होते.
स्वानुभवाने सांगावेसे वाटते की, गायनाने वस्तुलाभ व घटनाप्राप्ती होऊ शकते. पण, यावर अधिक संशोधन व प्रयोग होणे आवश्यक आहे.
आचार्य म्हणजे शुद्ध आचरणाने परिपूर्ण असलेले दिव्योत्तम व्यक्तिमत्व अशा आचार्यांची प्रत्येक कृती व त्याचे सदाचारसंपन्न जीवन हे ब्रह्मचार्यांसाठी आदर्शांचा प्रेरक दीपस्तंभ असतो. आचार्य आपल्या विद्यार्थ्यांना ‘ब्रह्मचारी’ नावाने संबोधतात, ‘विद्यार्थी’ म्हणून नव्हे. कारण, विद्यार्थी म्हणजे केवळ विद्येला ग्रहण करणारा! पण, ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मणि चरति- नेहमी ब्रह्मतत्वात विचरण करणारा!
दरवर्षीप्रमाणे नित्यनेमाने येणारे गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांच्या उत्साहाला उधाण आणणारा महाराजाच. गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा अप्रतिम मिलाप असलेला हा उत्सव म्हणजे ‘स्कील इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ची प्रेरणा देणारा उत्सव असतो.
पहिली जागतिक सर्वधर्म परिषद दि. ११ ते २७ सप्टेंबर १८९३ या कालावधीत अमेरिकेतील शिकागो शहरात आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेच्या उद्घाटनाला आज १३० वर्षे पूर्ण होत आहेत. हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या स्वामी विवेकानंदांनी या परिषदेत जागतिक समुदायाला विश्व बंधुत्वाचा मौलिक संदेश दिला. असा हा दिवस विश्वबंधुत्व दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हे चिंतन...
सर्व भारतीय शास्त्रांचे आधारशास्त्र म्हणजे योगशास्त्र होय. सांख्य दर्शनानुसार सारी सृष्टी पंचमहाभूतांच्या क्रमागत आविष्काराने उत्पन्न झाली आहे. प्रत्येक वस्तूत, मग ती सजीव असो की निर्जीव असो, पंचमहाभूतांचा अविष्कार असतो. पंचतत्वांशिवाय कोणतीच वस्तू साकारू शकत नाही आणि म्हणून प्राप्त होऊ शकत नाही.
स्वातंत्र्य दिन जवळ आला असून यावेळी भारतीय पर्यटकांना सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठा वीकेण्ड देखील मिळणार आहे. यादरम्यान भारतीय पर्यटकांनी फिरायला जाण्याचे बेत आखले असून आध्यात्मिक स्थळांना भेट देण्याला त्यांचे प्राधान्य असल्याचे ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकच्या फ्लाइट सर्च डेटामधून पाहायला मिळाले आहे
अत्यंत आदरपूर्वक रामनाम घ्यावे, असे सांगून समर्थांनी मनाच्या श्लोकांचे पहिले शतक संपवले आहे. येथून पुढे मनाच्या श्लोकांच्या दुसर्या शतकात प्रवेश करताना भक्तांना येणार्या समस्या विचारात घेऊन स्वामी विवेकाचे महत्त्व सांगणार आहेत. सगुणभक्ती आणि सदाचरण या विषयांवर चर्चा करणार आहेत.
मुंबई : योगा या प्राचीन प्रथेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि भारतीय योगाने जगासमोर आणलेल्या शारीरिक आणि आध्यात्मिक पराक्रमाचा उत्सव साजरा करण्यासाठी मुलुंड अग्निशमन केंद्रावर ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगा ही एक असा सराव आहे, जी मन आणि शरीराला आराम देण्यासाठी आणि लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. सदर योगा कार्यक्रमाचे संचालन डी.एम. पाटील, अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल यांनी केले आणि सदर कार्यक्रमाला मुलुंड अग्निशमन केंद्रातील कर्मचारी आणि अधिकारी
पैसा सर्व सुख, आनंदाचे कारण कधीच नव्हता आणि पुढेही असणार नाही. मात्र, मनुष्याच्या विवेकी बुद्धीत हैवान शिरला, तर काय विद्ध्वंस होतो याचा प्रत्यय गेल्या आठवड्यातील राज्यात घडलेल्या अन् अंगाचा थरकाप उडवणार्या घटनाची मालिकांमधून समोर आला. ठाणे जिल्ह्यात आई-वडिलांचा राग मनात ठेवून मुलाने वृद्ध मात्यापित्यांवर सुरीने हल्ला चढवला. त्यात वडिलांचा मृत्यू झाला, तर आई रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.
रामनामाचा अभ्यास, चिंतन, नाम घेणे हे आपले अंतःकरण सुधारावे यासाठी आहे. आपल्या आनंदप्राप्तीतील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे अहंकार. जर जपसाधनेने अहंकार वाढत असेल, मी इतरांपेक्षा निराळा असून श्रेष्ठ आहे, असा सूक्ष्माहंकार उत्पन्न होत असेल, तर नामाचे खरे महत्त्व समजले नाही, असे म्हणावे लागेल. रामनामाच्या अभ्यासाने माणसाला चारित्र्यसंपन्न, नीतिमान व निगर्वी जीवनातील आनंद गवसला पाहिजे. विकारवशतेेतून सुटण्याचा काय आनंद असतो, याचा शोध लागला पाहिजे. समुदायात गेल्यावर किंवा सार्वत्रिक आनंद घेत असताना अतिआदराने रामनामाच
तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनीचे ‘सीईओ’ टीम कूक केवळ ‘अॅपल’चे दालन खुले करण्यासाठी भारताच्या आर्थिक राजधानीत दाखल होतात, हा वरकरणी वाटतो तितका सोप्पा विषय नक्कीच नाही. भारतीय बाजारपेठ आज मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्त्य देशांना खुणावत असल्याची ही शुभचिन्हेे आहेत. त्याचेच केलेले हे आकलन...
“देशात पर्यटन क्षेत्रात नवीन उंची गाठण्यासाठी आपण चौकटी बाहेर जाऊन विचार करण्याची आणि त्याप्रमाणे पुढील योजना आखण्याची गरज आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या विपुल संधी असून त्यासाठी नियोजनबद्ध धोरण आवश्यक आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. ‘मिशन मोडमध्ये पर्यटनाचा विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते.
देशाची सर्वांगीण प्रगती साधण्याकरिता त्या-त्या देशात ब्रह्मशक्ती आणि क्षत्रशक्ती यांचा समन्वय असणे अत्यंत मोलाचे आहे. कारण, राष्ट्राचे अस्तित्व सुरक्षित ठेवावयाचे असेल, तर तेथील व्यवस्था या दोन्ही तत्त्वांनी संयुक्तिक असाव्यात.
शारदीय नवरात्रोत्सवात आज सरस्वतीपूजन. सरस्वतीचं एक प्रतिभासंपन्न रूप म्हणजे प्रतिभाताई! ज्यांनी केवळ आध्यात्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिलेले आहे.
आज ‘ज्ञानेश्वरी’ जयंती. ‘ज्ञानेश्वरी’च्या आरंभीचे गणेशाचे मंगलाचरण म्हणजे गणपतीवरचे अर्थगर्भ व नितांतसुंदर असे स्वतंत्र काव्यच आहे! ही गणेशाची निव्वळ स्तुती नाही, तर हे श्रीगणेशाच्या रुपाचे खरे वर्णन आहे. माऊलींनी ही गणेशमूर्ती म्हणजे समस्त वेदवाङ्मयची मूर्ती आहे, अशी कल्पना केली व तिचे वर्णन केले.
इच्छा द्वेष: सुखं दु:खं संघातश्चेतनाधृतिः ॥ (अ.१३ श्लो.६ ) गीतेतील सहाव्या श्लोकातील हे सूत्र अतिशय महत्त्वाचे असून जडात चेतना कशी उत्पन्न झाली, याचे महाविज्ञान सांगते. 'E = mc2' सूत्राद्वारे परमाणूला फोडल्यानंतर त्यातून भयानक ऊर्जा प्राप्त होते, हे सांगून आईनस्टाईनने विज्ञानक्षेत्रात क्रांती घडवून आणली. तद्वत् व्यासांचे वरील सूत्र लक्षात आल्यास जडातून चैतन्य कसे उत्पन्न झाले, याबद्दल आज जो न संपणारा वाद उत्पन्न झाला आहे, त्याचे उत्तर याच सूत्रात सापडते. आजच्या विज्ञानानुसार सदा भयानक वेगाने फिरण
आपण सगळे घाईघाईत उतावीळ होऊन जीवन का जगतो आणि आपले आयुष्य वाया का घालवतो? ज्यात जीवन जाणवत नाही, ते जगायचे तरी कसे? जीवनाच्या प्रत्येक क्षणाची जाण बरेच काही देऊन जात असते, ते क्षण जसेच्या तसे नैसर्गिकपणे जगता येत नसतील, तर त्याला जगणं तरी कसे म्हणायचे? हेन्री डेव्हीड थोरो यांनी जीवनाविषयी खूप सुंदर शब्दांत वर्णन केले आहे. आपले जीवन खूप मूल्यवान आहे. फक्त जीवन नाही, तर प्रत्येक दिवस आणि मिनीट आणि क्षण our lives are so precious not just 'life' but every single day and moment.' थोरोचे हे शब्द आणि वॉल्डन पॉण्डच
समर्थांचे आराध्यदैवत राम असल्याने ‘जगीं होईजे धन्य या रामनामे’ असे स्वामी म्हणाले. स्वामींच्या मते, राम हाच अंतरात्मा असून तो परब्रह्म आहे. रामनामाचा जप करीत असताना रामाच्या अंगी असलेल्या अनेक गुणांंची आठवण येते. रामचरित्राचा अभ्यास करताना लक्षात येते की, रामाच्या ठिकाणी अनेक उत्तमोत्तम गुण एकवटले आहेत. त्या रामाला आपला आदर्श मानून त्याच्या गुणांची उजळणी आपल्या मनात होत राहिली, तर त्या गुणांचा स्पर्श आपल्या अंत:करणाला होतो.
पुणे : गणेशोत्सवाची खरी धामधूम सुरू होते,गणेशमूर्तींच्या खरेदीने. गणेशमूर्तीची निवड करणे म्हणजे गणेशभक्तांची खरी कसोटी.गणेशाची अनेक सुंदर रूपं मोह घालतात. त्यांचे रंगीत पितांबर व उपरणे आणि सगळा साज जितका सुंदर तितके मन हरखून जाते आणि अशी सुंदर मूर्ती घरच्या गणेश स्थापनेसाठी निवडली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांचा तर जास्तीत जास्त भव्य मूर्ती घेण्याकडे कल असतो. पण मूर्ती कितीही सुंदर असल्या तरी विसर्जनानंतर मात्र पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण करतात. पाण्यात न विरघळणारे प्लॅस्टर ऑफ पॅरीस आणि विविध रसायनयुक्त प
आपली राष्ट्रमाता ही खूपच प्राचीन आहे. जेव्हा ही भूमी छोट्या-छोट्या भूखंडात विभागली गेली नव्हती, अर्थातच सर्वत्र एकच अखंड भूमी माता होती. म्हणूनच ती फार पुरातन आहे. खंड किंवा देश कोणताही असो. त्याने आपले मूळ पाहिले, तर सगळ्यांची एकच भूमिमाता आहे, असे दृष्टिपथात येते. जेव्हा या एकाच भूमिमातेवर सर्व राष्ट्रांचे व राष्ट्रनेत्यांची दृष्टी पडेल, तेव्हा आम्ही सर्वजण एक आहोत, असा भाव जागृत होतो. अशा पुरातन मातृभूमीची नेहमी प्रशंसा व स्तुती झालीच पाहिजे.
परमार्थ साधनेला सुरुवात करायची, तर ती तरुणवयात करायला हवी. भगवंताला ओळखण्यासाठी, त्याच्या चिंतनात रममाण होण्यासाठी वयाचे ज्येष्ठत्व येईपर्यंत वाट पाहत थांबलो, तर साधारणतः साधनेला सुरुवात होत नाही आणि ती साध्य होणेे कठीण असते. भगवंत आणि परमार्थ साधना हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. याची जाणीव माणसाला तरुण वयातच व्हावी. ज्या भक्ताला अशी जाणीव होते, तो संयमाने, सदाचाराने आपले आयुष्य घालवतो. त्याच्या अंगी मनाची एकाग्रता, प्रसन्नता येते. त्याच्या अंगीविवेकनिष्ठा येते. असा हा ज्ञानीभक्त आनंदी असतो. अशा भक्त
आजचे युग हे विज्ञान युग मानले जाते. विज्ञान संशोधनाद्वारे प्रगत होत असते. वैज्ञानिकांना आपल्या मनाच्या एकाग्रतेमुळे अशी संशोधने करणे शक्य झाले आहे. सर्व थोर वैज्ञानिक आधुनिक ऋषीच होत. आपले मन ध्यानाद्वारे एकाग्र करून ऋषी आध्यात्मिक चिंतन करीत आणि त्याद्वारे ज्ञानविज्ञानातील गहन तत्त्वे समाजासमोर ठेवित असत. वेदांमध्ये बरेच ज्ञानविज्ञान साठविले आहे. परंतु, दुर्दैवाने आज वेद म्हणजे केवळ मंत्र मानले जातात. वैदिक परंपरेने केवळ ज्ञानाचा किंवा विज्ञानाचाच एकांगी बडेजाव केला नाही, तर ज्ञानाची पूर्ती होण्याकरिता
देशाला १५ ऑगस्ट, १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर संविधान सभेपासून आपल्या इच्छा व आकांक्षांच्यानुसार देश चालविण्याच्या तंत्राचा प्रारंभ झाला. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असून अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी ‘स्व’च्या आधारावर ‘तंत्राची’ युगानुकूल पुनर्रचना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सोमवारी नागपुर येथे केले.
परमात्म स्वरूपाचे चिंतन आणि अध्यात्मतत्वांचे चिंतन-मनन करणे खर्या भक्ताला आवडते. त्यात आपल्याला आत्मोद्धाराचा मार्ग सापडेल, याची भक्ताला खात्री असल्याने इतर गोष्टीत तो आपला वेळ फुकट घालवीत नाही. भक्त सर्वाथाने भगवंताचा झाला असल्याने त्याच्या ठिकाणी गर्व, ताठा, ज्ञानाचा वृथा अभिमान निर्माण होत नाही
'रानबाजार' वेब सिरिजमुळे आणि 'वाय' सिनेमामुळे सध्या मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री प्राजक्ता माळीची चर्चा सुरु आहे. प्राजक्ता नेहमीच सोशल मिडीयावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.
जुन महिना बिनपावसाचा अनुभवलेल्या पुणेकरांना जुलैच्या पहिल्या तारखेपासूनच अगदी पुणेकर ज्यासाठी प्रसिद्ध आहेत, तशाच लहरीपणाने येणार्या पावसाने कोंडीत पकडले असून आता पुणेकर देखील रोज आपली या पावसाने फजिती होत असल्याचे बघून ’डॉयलॉग फेम’ आमदार शहाजी पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या त्या माणदेशी भाषेतील ‘डायलॉग’च्या धर्तीवर वर ’काय पाऊस...काय पुणे... काय उणे? अशी ‘डॉयलॉग’ बाजी करून ‘एन्जॉय’ करीत आहेत. यातून पुणेकरांनी प्रशासनाच्या नालेसफाईतील दिरंगाई आणि रस्त्यातील पाण्याने भरलेले खड्डे यावर नेमके बोट ठेवले आहे.
आज २१ जून. आंतरराष्ट्रीय योग दिन. ‘युञ्जते इति योग:’ या विशेष लेखमालिकेतील आजच्या शेवटच्या भागात मानवाच्या शारीरिक, आध्यात्मिक विकासासासाठी ‘मानवतेसाठी योग’ या संकल्पनेचा केलेला हा सर्वांगीण उहापोह...
आजचा लेख हा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन देणारा आहे. ज्यांनी ब्रश हातात घेतला की रंग बोलायला लागतात आणि लेखणी हातात घेतली की कागद बोलायला लागतात, हे दोन्ही माध्यमांचं बोलणं सामाजिक बांधिलकीशी असतं. ज्यांच्या डोक्यात सतत सृजन असते, तर मनात अनेक विचार असतात, भारतीय कलाजगत, भारतीय पत्रकारिता विश्व आणि फिल्म जगतातील अनेक दिग्गज ज्या व्यक्तिमत्त्वाला अगदी जवळून ओळखतात, अशा चित्रकार, पत्रकार जैन कमल यांच्या वादळी कलाप्रवासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखात करणार आहोत.
ज्ञानवंता हेचि खरे सुख!
वैदिक परंपरा आणि साधना
नम्रता हा जीवनाचा आधार आहे. आपल्याकडे सर्व काही असेल, पण नम्रता अंगी नसेल, तर सर्व काही व्यर्थ समजले जाते. आज-काल समाजात वाईट लोकांना महत्त्व दिले जात असले, तरी चिरस्थायी मोठेपणा मिळतो, तो विनयशीलमुळेच. ज्याच्या अंगी नम्रता असते, तो यशाचे शिखर गाठतो
साधनेद्वारे झालेली गुणाणुरचना, शरीरशुद्धी व चित्तशुद्धीकरिता असल्याने त्यासाठी गुणाणुंची रचना अतिशय शुद्ध म्हणजेच सुसंस्कृत हवी. योगसाधना म्हणजे प्राणायाम, ध्यानधारणा करताना साधकाच्या शरीरातील असली उपयुक्त गुणाणुरचना आपोआप घडत असे. साधकाचा मूळ स्वभावच बदलत असतो
ध्यानाचा अभ्यास दृढ आणि दीर्घकाळ करण्याच्या अवस्थेला ‘धारणा’ म्हणतात. १५ मिनिटे ध्यान कायम ठेवल्यास एक मिनिट अवस्थेची प्राप्त होऊ शकते. धारणेमध्ये ध्येयविषय सोडून अन्य विषयाचे अस्तित्व उरत नाही. सखोल ध्यान म्हणजे धारणा. धारणा ही समाधीची पहिली पायरी आहे. साधकाचा पिंडधर्म जागृत होतो. पिंडधर्म जागृत झाल्यावर साधक आपल्या पिंडधर्मानुसार समाधीअवस्था आणि ज्ञान प्राप्त करेल.
वासनेप्रमाणे विकृत मनोवृत्ती दर्शवणारेही बरेच विकार आहेत. त्यांनाही मनाने दूर सारले पाहिजे. तथापि मनाच्या काही सहजप्रवृत्ती असतात. विवेकाने त्यांचा वापर केला, तर त्या त्रासदायक नाहीत. पण, अविवेकाने त्यांच्या वापराचा अतिरेक झाला, तर त्यांचे विकृत स्वरूप तयार होते, ते म्हणजे विकार. असे हे विकार हानिकारक असतात.