‘शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे,’ असा आग्रह धरणारे व प्रत्यक्ष कृतीद्वारे आयुष्यभर कार्यरत राहणारे अरुण फडके नुकतेच अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत. मराठी भाषा, तिचे सौंदर्य अधिकाधिक शुद्ध व स्वच्छ असावे म्हणून फडके प्रयत्नशील होते. त्यांच्या स्मृतींना आणि कार्यांना उजाळा देणारा हा लेख...
Read More
मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचे कर्करोगामुळे गुरुवारी (१४ मे) निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. 'शुद्धलेखन ठेवा खिशात' या छोट्या पुस्तिकेद्वारे समग्र मराठी लेखन-कोशापर्यंत विविध प्रकारची पुस्तके त्यांनी लिहिली होती. 'शुद्धलेखन ठेवा खिशात' हे त्यांच्या पुस्तकावर आधारित असलेले अॅपही अनेकांना खूप उपयुक्त ठरले. पुस्तकलेखनाबरोबरच शुद्धलेखन कार्यशाळांच्या माध्यमातूनही ते मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी लोकांना जागरूक करण्याचे कार्य करत होते. गेली काही वर्षे कर्करोगाशी लढा देत असतानाही त्यांचे कार्य अविरत सुरूच ह