मोदी सरकारने भारताची संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले असून, त्याच अंतर्गत स्पेन आणि अमेरिकेसोबतही नुकतेच दोन करार करण्यात आले. पहिला म्हणजे, स्पेनच्या सहकार्याने एअरबस निर्मिती प्रकल्प आणि दुसरा भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेला ‘एमक्यू-९बी’ ड्रोन खरेदी करार. त्याविषयी सविस्तर...
Read More
फिफा महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनने बलाढ्य इंग्लंडचा पराभव करत विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच स्पेनच्या महिला संघाने ही कामगिरी बजावली आहे. दरम्यान, स्पेनच्या महिला संघाने इंग्लंडचा १-० असा पराभव करून फिफा महिला विश्वचषक २०२३ विजेतेपद पटकावले आहे. विशेषतः दोन्ही संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत.
स्पेनलगतच्या समुद्रात जानेवारी ते जून यादरम्यान किती लोक मृत्युमुखी पडले, याचा नुकताच एक अहवाल जाहीर झाला. त्यानुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये स्पेनमध्ये जाता-जाता ९५१ लोक मृत्युमुखी पडले, त्यात ४९ बालकांचाही समावेश आहे. हे लोक समुद्रामार्गे बोटीने स्पेनमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते. मात्र, स्पेनमध्ये जाण्यापूर्वी वाटेतच त्यांचे जहाज समुद्रात बुडाले किंवा फुटले किंवा आणखी कोणत्यातरी कारणाने हे लोक मृत्युमुखी पडले. कॅनरी आईसलॅण्ड मार्ग, अलबोरन समुद्री मार्ग, अल्जेरीयन रूट, जिब्राल्टर मार्ग या चार मार्गा