भारतात आजपासून मोटोरोला एज ५० अल्ट्रा (Motorola Edge 50 Ultra) दाखल होत आहे. आनंदाची बातमी म्हणजे या फोनमध्ये गॅझेट प्रेमींना आवडेल अशी फिचर्स असल्याने मोटोरोला फोनला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणे महत्वाचे आहे. कागदावर या फोनमध्ये दमदार फिचर्स आहेत. आज दुपारी १२ वाजल्यापासून हा फोन खरेदीसाठी ग्राहकांची उपलब्ध असणार आहे.
Read More
गुगलने स्मार्टफोन बनवण्यासाठी तामिळनाडू राज्याला पसंती दिली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन प्रकल्पासाठी गुगलने तामिळनाडू राज्याला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू सरकारची व गुगल व्यवस्थापनात याविषयी चर्चा घडलेली आहे. अद्याप यातील व्यवहाराची माहिती समोर येऊ शकली नाही.
भारताच्या स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाली आहे. स्मार्टफोन शिपमेंटमध्ये ८ ते १० टक्क्यांनी वाढ मार्च २०२४ मध्ये झाली आहे. काऊंटरपार्ट रिसर्च (Counterpart Research) या अहवालातील माहितीप्रमाणे, व्यापार व संख्या (Volume) मध्ये'सॅमसंग' ने प्रथम क्रमांक पटकावला आहे क्रमांक दोनवर ॲपल कंपनीने पटकावला आहे. या दोन कंपन्यांचे मार्केट शेअर अनुक्रमे २३ व १९ टक्के असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.
मोटोरोला या भारतातील 5G स्मार्टफोन ब्रँडने आज moto g64 5G या सेगमेंटमधील 5G स्मार्टफोन लॉन्चची घोषणा केली. moto g64 5G हा मीडियाटेक टीएम डायमेंसिटी 7025 प्रोसेसर आणि सेगमेंटमधील 6000mAh बॅटरी तसेच क्वाड पिक्सेल टेक्नॉलॉजीसह सेगमेंटच्या अग्रगण्य शेक फ्री 50MP OIS कॅमेरासह फक्त रु. 14, 999 (रु. 13,999 सर्वसमावेशक प्रस्तावांसह) स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होईल.
वन प्लस कंपनीने आपल्या सुरूवातीच्या काळात कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स हा ट्रेंड सुरू केला होता. त्यानंतर मार्केट डिस्ट्रपटर ठरल्यानंतर अनेक कंपन्यानी वन प्लस कंपनीला अनुसरून आपले नवे स्मार्टफोन लाँच केले.त्यानंतर उत्पादनांच्या वाढत्या खर्चासोबत मोबाईलच्या किंमती वाढल्या त्यामुळे वन प्लस चाहत्यांना कमी किंमतीत चांगला फोन मिळावा अशी अपेक्षा होती. नेमके हेच जाणत वन प्लसने आपल्या मिडरेंज सेगमेंटमध्ये नवीन फोन आणला आहे. कंपनी लवकरच वनप्लस नोर्ड सीई ४ बाजारात लवकरच दाखल होणार आहे.बाजारातील तज्ञांच्या म्हणण्यानुसार
मोटोरोला प्रेमींसाठी एक गुड न्यूज आहे. भारतात ३ एप्रिल रोजी मोटोरोला एज ५० प्रो बाजारात दाखल होणार आहे.गेल्या काही वर्षांत मोटोरोला कंपनीचे अनेक मोबाईल बाजारात आले नसले तरी कंपनीने भारतात पुनरागमन करायचे ठरवले आहे. त्यातील पुढचा टप्पा म्हणून स्नॅपड्रॅगन ७ जनरेशन ३ १२५ वॉल्टचा वायर चार्जर, ५० वॉल्टचे वायरलेस चार्जिंग,५० मेगापिक्सल कॅमेरा, १४४ हर्टज पोलेड (poLED ) डिस्प्ले, ५० मेगापिक्सल कॅमेरा, ६.७ इंच स्क्रिन अशा आकर्षक वैविध्यपूर्ण फिचर्ससह बाजारात दाखल होणार आहे.
विवोकडून आपल्या विवो वी ३० सिरिजचे भारतात अनावरण करण्यात येणार आहे. विवो वी ३० व विवो वी ३० प्रो अशा दोन प्रकारात हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. विवो आपल्या कॅमेरा केंद्रित वैशिष्ट्यासाठी ओळखला गेला तरी काही वर्षांपासून विवोने परफॉर्मन्स व इतर मोबाईल सुविधेत चांगले काम करत ' ब्रँड' चा मोठा जनाधार बनवला आहे. विवोने नव्या लाँचच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
‘फॉक्सकॉन’चे सीईओ आणि तैवानी नागरिक असलेले यंग लिऊ यांना नुकताच ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘पद्मभूषण’ पुरस्कार यादीतील ते एकमेव विदेशी नागरिक. लिऊ यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करणे हा ‘फॉक्सकॉन’च्या भारतातील आजवरच्या योगदानाचा हा सन्मानच. तसेच या पुरस्काराने चीनला शह देण्याबरोबरच ‘फॉक्सकॉन’च्या भारतीय गुंतवणुकीचा मार्गही अधिक प्रशस्त केला आहे. त्याचे आकलन...
देशातील पहिली ‘आयफोन’ निर्मिती कंपनी असलेल्या ‘टाटा’तर्फे आता एकूण २८ हजार रोजगारनिर्मिती केली जाईल. त्यासाठी सद्यःस्थितीतील निर्मिती कारखान्यांची क्षमता दुप्पट होऊन, आगामी १८ महिन्यांत ते पूर्णपणे कार्यान्वित होतील. यानिमित्ताने भारतातील मोबाईल निर्मिती क्षेत्रातील बाजारपेठेचा घेतलेला हा आढावा... देशातील पहिली ‘आयफोन’ निर्मिती कंपनी असलेल्या ‘टाटा’तर्फे आता एकूण २८ हजार रोजगारनिर्मिती केली जाईल. त्यासाठी सद्यःस्थितीतील निर्मिती कारखान्यांची क्षमता दुप्पट होऊन, आगामी १८ महिन्यांत ते पूर्णपणे कार्यान्वित हो
मध्य प्रदेश निवडणूकीत प्रचारादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारताच्या मोबाईल उत्पादनावरुन तथ्यहीन वक्तव्य केले होते. त्यावर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडेबोल सुनावले आहे. पण राजकारणा व्यतिरिक्त विचार करायचा झाल्यास सुद्धा मागच्या एका दशकात भारताने मोबाईल उत्पादनात क्रांती केली आहे.
बाजारात उपलब्ध इतर उत्पादनांच्या तुलनेत अत्यंत किफायतशीर दरांत नव्या युगाची वैशिष्ट्ये दाखल करण्याच्या तत्त्वज्ञानाकरिता वचनबद्ध असणाऱ्या लाव्हाने आज रू 9,999/- पासून सुरू होणाऱ्या किंमतीत आज नवीन ब्लेझ २ ५जी सादर करण्यात येईल. हे उपकरण उत्कृष्ट ग्लास बॅकसह उपलब्ध असून हा सेगमेंटमधील पहिला रिंग लाईट ठरला. ते ग्लास ब्लॅक, ग्लास ब्ल्यू आणि ग्लास लवेंडर अशा तीन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे.
अँपल कंपनीने यंदा चौथ्या तिमाहीत महसूलवाढीचा नवा विक्रम नोंदवला आहे. याविषयी बोलताना अँपलचे चीफ एक्झिक्युटिव्ह टीम कुक यांनी,अँपल इंडियाने प्रथमच दोन अंकी महसूल उत्पन्नात वाढ केली असल्याचे स्पष्ट केले. जुलै ते सप्टेंबर तिमाहीमध्ये दोन अंकी वाढ केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अँपल कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये ८९.५ अब्ज डॉलरचा महसूल मिळवला होता. गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये अँपलचा महसूल ४३.८ अब्ज डॉलर होता. त्यामुळे यंदा तुलनेत १ टक्यांनी महसूल कमी झाला असल्याचे चित्र आहे.
नवी दिल्ली येथील वर्ल्ड मोबाईल काँग्रेस मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत हे उभारते उत्पादन निर्मिती केंद्र असल्याचे अधोरेखित केले. जग आता ' मेड इन इंडिया ' फोन वापरत असल्याचे याप्रसंगी त्यांनी गौरवोद्गार काढले. नरेंद्र मोदी यांनी एनडीए प्रणित भाजप सरकारने ९ वर्षात भारताला उत्पादनाचा आयातदार पासून आता निर्यातदार बनवल्याचे सांगितले आहे.
मुंबई : सध्या बाजारात नवनवीन स्मार्ट फोन्स येत असतात. आता वन प्लस या कंपनीने आपला पहिला फोल्डेबल स्मार्ट फोन बाजारात लॉंन्च करणार आहे. वन प्लसच्या या मोठ्या लॉन्चिंगमुळे सॅमसंग या कंपनीला स्पर्धक तयार झाला आहे. याआधी फोल्डेबल स्मार्ट फोन तयार करणाऱ्या कंपनीत सॅमसंगचा बोलबाला होता. वन पल्सच्या फोल्डेबल फोनच्या लॉन्चिंगमुळे त्यांचेसुध्दा फोन्स आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.
भारताविरोधी कारस्थाने करण्याऱ्या चीनच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली होती. भारत हा सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्मार्टफोन बाजार असून त्यावर चिनी कंपन्यांचा ताबा आहे.
गेल्या वर्षी हॉट १० प्लेला मिळालेल्या भव्य यशानंतर इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने आपल्या हॉट पोर्टफोलिओचा विस्तार करत फुली-लोडेड मनोरंजन अनुभवासाठी 'हॉट १२ प्ले' स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
चिनी ‘स्मार्टफोन’ उत्पादक कंपन्या ‘शाओमी’ आणि ‘ओप्पो’ भारताच्या प्राप्तिकर कायद्याचे उल्लंघन केल्याने सरकारच्या निशाण्यावर आल्या आहेत. केंद्र सरकारच्या मते, प्राप्तिकरविषयक नियमांचे उल्लंघन करुन चिनी ‘स्मार्टफोन’ कंपन्यांनी अफाट रकमेची चोरी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर या कंपन्यांकडून एक हजार कोटींपर्यंतचा दंड वसूल केला जाऊ शकतो.
अनेक दिवसांपासून ५ जी ची प्रतीक्षा होत आहे. देशात अनेक ५ जी स्मार्टफोन विकले जात आहेत. पण ५ जी नेटवर्क कोठेही उपलब्ध नाही. असं असलं तरी ५ जी इंटरनेट स्पीड २०२१ या वर्षामध्ये देशात येणार आहे. सरकार लवकरच ५ जी नेटवर्कचे स्पेक्ट्रम वाटप आणि लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे.
अभिनेता सोनू सूद पुन्हा ठरला सुपर हिरो
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय लष्कराचा मोठा निर्णय
‘लॉकडाऊन’मुळे हाताशी भरपूर रिकामा वेळ असल्यामुळे तर स्मार्टफोन वापरण्यात जाणार्या तासांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि त्यातूनच ’पिंकी फिंगर’ म्हणून ओळखल्या जाणार्या करंगळीमध्ये व्यंग निर्माण होत असल्याची तक्रार घेऊन येणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात, तासनतास स्मार्टफोनचे वजन पेलण्यामुळे आपल्या डॉमिनंट किंवा प्रामुख्याने वापरल्या जाणार्या हाताची करंगळी वाकडी होत असल्याचे दिसून येत आहे. यालाच ‘स्मार्टफोन पिंकी’ असे म्हणतात.
मुलं ही अनुकरणाने शिकतात, हे विसरून कसे चालेल? तेव्हा, आपल्या मुलांच्या हाती संगणक, मोबाईल, व्हिडिओ गेम देताना त्यांच्या डोळ्यासमोर नेमके काय चित्र आपण उभे करत आहोत, याचे पालकांनी भान ठेवायलाच हवे; अन्यथा पडद्यावरचा हिंसाचार, मुलांच्या आचारात उतरायला फारसा वेळ लागणार नाही.
ट्रांशन होल्डिंग्सचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅंड इंफिनिक्सने ‘स्मार्ट 3 प्लस’ हा नवीन फोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. स्मार्ट 3 प्लस हा ७ के श्रेणीतील असा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यात लो-लाइट सेन्सर असलेला ट्रिपल कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन आधुनिक अँड्रॉइड पाय ९.० ऑपरेटिंग प्रणालीद्वारा संचालित आहे. ३० एप्रिल पासून हा फोन फक्त फ्लिपकार्टवर मिडनाइट ब्लॅक आणि सफायर स्यान या रंगांमध्ये उपलब्ध असेल. जिओ यूझर्सना प्रत्येक स्मार्ट 3 प्लस च्या खरेदीवर ४५००/- रु ला लाभ मिळेल.
आजपासून १६ राज्यात व केंद्रशासित प्रदेशात महिलांसाठी ११२ हा नवीन आपत्कालीन क्रमांक असणार. महिला कोणत्याही अडचणीत असताना हा क्रमांक त्यांच्यासाठी आशेचा किरण बनणार
नववर्षाच्या निमित्ताने चीनची स्मार्टफोन कंपनी विवोने एक धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना केवळ १०१ रुपये देऊन विवोचा स्मार्टफोन खरेदी करता येणार
एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्ड आवश्यक असते. मात्र आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डाची गरज भासणार नाही.
Meizu कंपनीचे स्मार्टफोन भारतात लॉन्च!
स्मार्टफोनच्या दुनियेतील ओप्पो कंपनी आपल्या R सिरिजमधील Oppo R17 Pro हा फोन आज लाँच होत आहे.
शिक्षकांनीही सुरुवातीला ऑनलाईन पेपर तपासणीकडे ‘तांत्रिकदृष्ट्या सर्वांना झेपेल का?’ वगैरे चष्म्यातून पाहिल्याने आणि पुरेशा पूर्वप्रशिक्षणाअभावी उदासीनता होती