आपल्या आयुष्यात कोण येणार, हे नियती ठरवत असते. नियतीचे फासे फिरले की, अशक्य गोष्टी शक्य होतात असं वाटतं. शंतनू नायडू या तरुणाबद्दल ऐकलं आणि वाटलं, जगात चांगला विचार करून काम केलं की, आपल्याला सहज न वाटणारी गोष्टही सहज भेटून जाते. मग सगळं आयुष्य स्वप्नवत वाटावं, असंच पुढे घडत जातं. खरंतर आपल्याकडे दैनंदिनी लिहिण्याची सवय अनेकांना होती. तीच ही दैनंदिनी आणि त्यातीलच हे प्रसंग आहेत. आठवणीच्या गावी माणूस रमतो आणि त्यातून त्याला जे गवसतं, त्यात सच्चेपणा आणि साधेपणा असतो. असच काहीसं हे पुस्तक, शंतनू नायडू याने लिह
Read More
मृत्यूनंतर झालेली गर्दी हीच माणसाने कमावलेली खरी संपत्ती असते. रतन टाटांच्या अमाप ‘संपत्ती’चे दर्शनच त्यांच्या मृत्यूनंतर जगाला झाले. व्यवसाय व्यवस्थापनात जपलेल्या मानवी मूल्यांचा परिपाक म्हणजेच, अंत्यदर्शनासाठी झालेली टाटा समूहाच्या कर्मचार्यांची गर्दी होती. व्यवसाय करताना माणुसकी जपण्याचा वस्तुपाठच रतन टाटांनी घालून दिला त्याविषयी...
रतन टाटा यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. उद्यमशीलता आणि या नैतिकता यांचा संगम घडवून आणत, रतन टाटा यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक नवीन अध्याय रचले आहेत.
देशातील प्रसिध्द उद्योजक, टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योग विश्वासह सबंध देशावर शोककळा पसरली असून देशातील नामवंत व्यक्तींकडून यावेळी शोक व्यक्त करण्यात येत आहे.
प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांचे श्वानप्रेम कधीच लपून राहिले नाही. त्यांनी चक्क ब्रिटनचे राजे प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून मिळणारा पुरस्कार केवळ श्वानप्रेमापोटी नाकारला होता. विशेष म्हणजे टाटांच्या श्वान प्रेमाचा अनुभव चक्क ब्रिटिश राजघराण्याला थक्क करणारा होता. रतन टाटा यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यासाठी राजघराण्याने बकिंगहम पॅलेसमध्ये पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.
भारतातल्या औद्योगीक क्षेत्रातल्या प्रगतीसोबत, टाटा हे नाव जोडले गेले आहे.
इंग्रजीतलं आद्यक्षर टी म्हणजे टाटा नव्हे तर 'ट्रस्ट'. उद्योग विश्वात विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे टाटा उद्योगसमूह. टाटा समूहाने आजवर ग्राहकांचे हित जपत आपल्या उद्योगविस्तारासह जगभरातील असंख्य लोकांच्या मनावर राज्य केले आहे. देशाच्या आर्थिक विकासात भरीव योगदान देणाऱ्या उद्योजकांच्या यादीत रतन टाटांचे नाव अग्रणी राहील.
देशातील आदर्शवत उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या रतन टाटांनंतर टाटा समूहाचे उत्तराधिकारी कोण, यावर चर्चा घडताना दिसून येत आहे. अविवाहित रतन टाटा यांच्या नावे तब्बल ३,८०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
देशातील मोठा उद्योगसमूह म्हणजेच टाटा उद्योगसमूहातील उपकंपनी असलेल्या टाटा स्टीलने देशांतर्गत बाजारपेठेत आपले वर्चस्व राखण्याकरिता नवनवीन स्टॅट्रेजी अमलात आणत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे १.२५ लाख कोटी रुपयांच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली. त्यापैकी २ प्रकल्प गुजरातमध्ये आणि एक आसाममध्ये आहे. भारत उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत असून सेमीकंडक्टर चिप उत्पादन भारताला आत्मनिर्भरता आणि आधुनिकतेकडे घेऊन जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
कंगाल पाकिस्तानची अर्थव्यवस्था भारताशी ही बरोबरी करू शकत नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या भारताच्या एक दशांशही नाही. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती इतकी वाईट आहे की भारतीय उद्योगपती टाटा समूहाकडे त्यापेक्षा जास्त बाजार भांडवल आहे.टाटा समूहाचे एकूण बाजार भांडवल आता ३६० अब्ज डॉलर्स (सुमारे ₹ ३० लाख कोटी) आहे. Tata Consultancy Services (TCS), टाटा समूहाची सर्वात मोठी कंपनी, $१७० अब्ज (सुमारे ₹१४ लाख कोटी) चे बाजार भांडवल आहे. टाटा समूहाच्या २९ कंपन्यांना स्टॉक एक्स्चेंजमध्ये अधिसूचित करण्यात आले आहे.
देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठ ही सुमारे ९०० दशलक्ष डॉलर इतकी असून, येत्या काही काळात ती वेगाने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘एअर इंडिया’ आणि ‘विस्तारा’ या कंपन्यांचे झालेले विलीनीकरण ‘एअर इंडिया’ला बळ देणारे ठरणार आहे. ‘इंडिगो’चे या क्षेत्रातील जे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे, त्याला आता नव्या ‘एअर इंडिया’चे आव्हान असेल. त्याविषयी...
एयर इंडियात नोकरीची संधी निर्माण झाली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, एयर इंडियातील रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एयर इंडियामध्ये विमान तंत्रज्ञ (देखभाल / इंजिन शॉप), विमान तंत्रज्ञ (देखभाल), तंत्रज्ञ (वेल्डर), तंत्रज्ञ (मशिनिस्ट) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. दरम्यान, अर्ज सुरू तारीख ११ ऑगस्ट २०२३ रोजी झाले असून शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२३ असणार आहे.
देशातील सर्वात मोठी हवाई वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगोने हवाई वाहतूक क्षेत्राच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठा करार केला आहे. इंडिगोने युरोपियन विमान निर्माता कंपनी एअरबसला ५०० विमानं बनवण्याची ऑर्डर दिली आहे.
आयफोन निर्माता Apple ने आपल्या iPhone १५ मालिकेतील दोन मॉडेल्स तयार करण्यासाठी भारताची निवड केली आहे. टाटा समूह Apple चे आगामी मॉडेल iPhone १५ आणि iPhone १५ Plus भारतात असेंबल केले जाणार आहेत. याआधी फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि लक्सशेअर सारख्या कंपन्या भारतात आयफोन असेंबल करत आहेत. मात्र आता टाटा समूह सुद्धा या शर्यतीत सामील झाला आहे. टाटा समूह भारतात आयफोन बनवणारी चौथी कंपनी ठरणार आहे.
कधीकाळी जगभरात भारताची ओळख असलेली ‘एअर इंडिया’ ही विमान कंपनी पुन्हा एकदा जगभरात अधिराज्य गाजविण्यास सज्ज होत आहे. ‘एअर इंडिया’चे ‘टाटा समूहा’कडे पुनरागमन झाल्याने त्यांचे दिवस पालटू लागले आहेत. ‘टाटा समूहा’चे संपूर्ण लक्ष ‘एअर इंडिया’ला तिची हरवलेली ओळख परत मिळवून देणे आणि तिला जागतिक विमान कंपनी बनवण्यावर आहे.
रशिया-युक्रेन संघर्ष, रशियाने अमेरिकेसह युरोपला डोळे दाखविणे, चीनची वाढती दादागिरी, ब्रिटनमध्ये आर्थिक-सामाजिक अराजकतेची स्थिती अशा बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये भारताचे स्थान अतिशय महत्त्वाचे बनले आहे. त्याची चुणूक ‘एअर इंडिया’ने ‘एअरबस’ या फ्रेंच आणि ‘बोईंग’ या अमेरिकन कंपनीकडून एकूण ४७० विमाने विकत घेण्याच्या करारात दिसून आली. त्यामुळे भारताची ही ‘महाराजा’ डिप्लोमसी अतिशय महत्त्वाची ठरावी.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची बुधवारी (दि. २७ जुलै) त्यांचा कुलाबा इथल्या निवासस्थानी भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री तिथे गेल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल रतन टाटा यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या.
देशातील सर्वात जुन्या उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या पालनजी ग्रुपचे चेअरमन पल्लोनजी मिस्त्री यांचे मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झाले
मागच्याच आठवड्यात एअर इंडिया खरेदीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर टाटा उद्योग समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी बुधवारी ट्विटर मार्फत प्रवाशांना आवाहन केले.
मला भारतरत्न मिळावा यासाठी तुम्ही सर्वजण सोशल मीडियावर मोहिम सुरू करत आहात. याबद्दल मला आदर आहे, असे म्हणत टाटांनी एक विनंतीही केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताची शान असलेले दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न मिळावा यासाठी सोशल मीडियावर मोहिम खुली करण्यात आली आहे. या मोहिमेबद्दल टाटांना समजल्यावर त्यांनी याची दखल घेतली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात २०% कपात
राष्ट्रीय कंपनी लवादाने टाटा समुह व्यवस्थापनाला मोठा दणका दिला आहे. टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्रींना हटवण्यात आलेली प्रक्रीया अवैध ठरवली आहे. त्यांची पून्हा या पदावर नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत. दरम्यान, टाटा समुहाकडे आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे पर्याय खुले आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी
देशातील सर्वात जूनी स्टील उत्पादक कंपनी टाटा स्टीलने ३, ११६.२ कोटी रुपयांचा तिमाही नफा नोंदवला आहे. सप्टेंबर तिमाहीच्या निकालांची माहीती कंपनीने गुरुवारी मुंबई शेअर बाजाराला दिली.
ज्येष्ठ उद्योगपती व देशातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व असणारे रतन टाटाही संघ व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.