पश्चिम महाराष्ट्रातला सह्याद्री आणि काही उपडोंगररांगा म्हणजे देवरायांचे माहेरघर. असंख्य देवराया तुम्हाला सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागात पाहायला मिळतात. यातील ज्या देवराईचे नाव वरती येईल, ती म्हणजे दाजीपूर ( Dajpur Devrai ) राधानगरीच्या कुशीत लपलेली ओळवणमधली उगवाईची देवराई. या देवराईविषयी...
Read More
सिंधुदुर्गातील तळाशील खाडीत गुरुवार दि. २३ जानेवारी रोजी वाहून आलेल्या सात फुटांच्या 'ड्वार्फ स्पर्म व्हेल' या सागरी सस्तन प्राण्याला सुखरुप समुद्रात सोडण्यात आले (whale released from sindhudurg). वन विभागाच्या 'कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण'च्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने खाडीत अडकलेल्या या व्हेलला खोल समुद्रात जाऊन सोडले. (whale released from sindhudurg)
'इंडियन जाईन्ट फ्लाईंग स्क्विरल' या प्रजातीच्या उडणाऱ्या खारीची ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच छायाचित्रित नोंद आहे (flying squirrel in sindhudurg).
समुद्री घोड्यांची संख्या वाढवून त्याच्यासाठी आवश्यक असणार्या अधिवासाच्या निर्मितीसाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) वनविभागाच्या ‘कांदळवन प्रतिष्ठान’सोबत सामंजस्य करार केला आहे (sea horse sindhudurg). या करारांतर्गत सिंधुदुर्गमध्ये समुद्री घोड्यांसाठी संवर्धन प्रजनन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे (sea horse sindhudurg). या केंद्रासाठी ‘बीएनएचएसएन’ने आवश्यक असलेली जागा शोधण्याची आणि त्यासाठीच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे.(sea horse sindhudurg)
मुंबई : सिंधुदुर्गातील किमान ५० ते ६० टक्के जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा ठोकला आहे. सिंधुदुर्गातील एका सभेमध्ये नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी हा दावा केला. वक्फ बोर्डाच्या कायद्याअंतर्गत कोणकोणत्या जमिनींवर ताबा करण्यात आला आहे हे तपासणीदरम्यान अनेक देवस्थानांवरदेखील वक्फ बोर्डाचा दावा असल्याचे सांगण्यात आले. नितेश राणे यांनी आपल्या भाषणादरम्यान हा मुद्दा मांडला.
सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यामधून रविवार दि. १५ डिसेंबर रोजी १२ फूट अजस्त्र अशा 'किंग कोब्रा' सापाचा बचाव करण्यात आला (king cobra rescued from sindhudurg). स्थानिक वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांच्या मदतीने बांबर्डे येथे लोकवस्तीनजीक आढळलेल्या सापाचा बचाव करुन त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले (king cobra rescued from sindhudurg). मात्र, यानिमित्ताने गेल्या वर्षभरात दोडमार्ग आणि चंदगड मिळून पाच किंग कोब्रा सापांना जीवदान देण्यात आले आहे. (king cobra rescued from sindhudurg)
राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत देत राज्याच्या विकासाला आपली पसंती दर्शविली. हे पाहता केंद्र सरकारकडून राज्यभरात विविध प्रकल्पांची मुहूर्तमेढ आगामी काळात रोवली जाणार आहे. आठवडाभरात कोट्यवधींचे रेल्वे आणि राज्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना देणारे प्रकल्प केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यामधून सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी १२ फूट अजस्त्र अशा 'किंग कोब्रा' सापाचा बचाव करण्यात आला (king cobra rescued from sindhudurg). वन विभागाने स्थानिक वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांच्या मदतीने लोकवस्तीत शिरलेल्या सापाचा बचाव करुन त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. (king cobra rescued from sindhudurg)
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून बेडकांच्या नव्या प्रजाती शोध लावण्यात आला आहे. कोकणच्या भूमीवरुन या प्रजातीचे नामकरण 'फ्रायनोडर्मा कोंकणी', असे करण्यात आले आहे (frog from sindhudurg). कुडाळ तालुक्यातील पाणथळ आणि कातळ सड्यांवर या बेडकाचा अधिवास आहे (frog from sindhudurg). या शोधामुळे सिंधुदुर्गातील पाणथळ जागा आणि कातळ सड्यांवरील जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. (frog from sindhudurg)
महाराष्ट्रामध्ये 'व्हिनचॅट' या पक्ष्याचे दर्शन झाले आहे (whinchat). सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधून या पक्ष्याची दुर्मीळ नोंद करण्यात आली आहे (whinchat). पक्षीनिरीक्षकांनी युरोपियन पक्ष्याची केलेली ही नोंद जिल्ह्याचे पक्षीवैभव अधोरेखित करणारी ठरली आहे ( whinchat )
Amboli bush frog : या कारणांमुळे आकसला आंबोलीतील बेडकांचा आकार
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांकरिता दादर ते कणकवली पर्यंत मोफत सोडण्यात आलेली मोदी एक्स्प्रेस आज सकाळी ११.३० वाजता दादर स्टेशनवरून कोकणकडे रवाना झाली. प्रवाशांच्या उत्साहात, बाप्पाच्या जयघोषात ही रेल्वे सिंधुदुर्गसाठी रवाना झाली. आमदार नितेश राणे यांनी दादर स्टेशनवर मोदी एक्स्प्रेस ला झेंडा दाखवला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील कुंब्रल गावात 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे दुर्मीळ जंगल आढळून आले आहे (sindhudurg myristica swamp). 'मायरिस्टिका स्वॅम्प'सारख्या दुर्मीळ जंगलाची ही महाराष्ट्रातील दुसरी नोंद आहे (sindhudurg myristica swamp). भालांडेश्वर देवस्थानाच्या ठिकाणी हे जंगल असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून कुंब्रलच्या बागवाडी ग्रामस्थांनी या जंगलाला देवाच्या नावाने जपले आहे. (sindhudurg myristica swamp)
सिंधुदुर्गमध्ये जे झालं त्यासाठी मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी डोकं ठेवून त्यांची माफी मागतो, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. शुक्रवारी वाढवण बंदराच्या उद्धाटन कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नसून ते आमचे आराध्य दैवत आहे, असेही ते म्हणाले.
जगात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणार्या ‘सेरोपेजिया मोहनरामी’ (Ceropegia mohanramii) या कंदीलपुष्पाच्या प्रजातीला ‘नष्टप्राय’ (क्रिटिकली एंडेंजर्ड) श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ने (आययूसीएन) गुरुवार, दि. २७ जून रोजी या कंदीलपुष्पाला ‘नष्टप्राय’ प्रजात म्हणून घोषित केले (Ceropegia mohanramii) . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील केवळ एका सड्यावरच ही प्रजात आढळत असल्याने यानिमित्त तिच्या संवर्धनाची नितांत गरज निर्माण झाली आहे. (Ceropegia mohanramii)
पावसाची संततधार सुरू झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकाशमान होणाऱ्या बुरशी आणि अळंबी उगवून आल्या आहेत (bioluminescent fungi in Sindhudurg). जिल्ह्यातील दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यामधून अंधारात प्रकाशमान होणाऱ्या बुरशींची नोंद करण्यात आली असून त्यांना पाहणे लक्षवेधी ठरत आहेत (bioluminescent fungi in Sindhudurg). साधारण ५२० ते ५३० नॅनोमीटर तरंगलांबीचा हिरवा रंगाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या या बुरशीचे प्रजातींनुसार वेगवेगळे अवयव प्रकाश उत्सर्जित करतात. जगात या बुरशीचा १०६ पेक्षा अधिक प्रजाती आढळ
विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडला शुक्रवार दि.३० रोजी कोकणातील कुणकेश्वर आणि काळबादेवी येथील दोन नवीन पुलांच्या नागरी बांधकामासाठी सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले.
संपुर्ण देशभरात सध्या लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरु असून राज्यात महायूती आणि महाविकास आघाडीपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
सिंधुदुर्गातील वेंगुर्ला रॉक्समध्ये (vengurla rocks) अधिवास करणार्या भारतीय पाकोळी पक्ष्याची येथील गुहांमधील वीण वसाहतीची क्षमता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत भविष्यातील चक्रीवादळे आणि हवामान बदलांमुळे हे पक्षी नामशेष होण्याची शक्यता संशोधकांनी वर्तविली आहे (vengurla rocks). संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार २०२० ते २०२३ या काळात या पक्ष्यांच्या संख्येमध्ये अनेक चढ-उतार आले आहेत (vengurla rocks). हे चढ-उतार असेच सुरू राहिल्यास आणि अधिवासाची क्षमता भरल्यास, हे पक्षी त्याठिकाणाहून नामशेष ह
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील तिलारीच्या खोऱ्यात हत्तीच्या पिल्लाचा जन्म झाला आहे (sindhudurg elephant). याठिकाणी अधिवास करणाऱ्या हत्तीच्या मादीने गुरुवारी दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी पिल्लाला जन्म दिला (sindhudurg elephant). त्यामुळे तिलारी खोऱ्यात अधिवास करणाऱ्या हत्तींच्या संख्या सहा झाली आहे. (sindhudurg elephant)
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाला मोठी परंपरा आहे. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू ते डॉ. निलेश राणे यांनी आपापल्या कार्यकाळात या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या कार्यकालातील आठ वर्षे मोदींच्या नेतृत्वातील सत्तेत असूनही स्थानिक खासदार विनायक राऊत हे विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले.
आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे भाजपची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील मानव-हत्ती संघर्षाची सुरुवात कर्नाटकातील हत्तींचे कळप विलग होण्याच्या प्रक्रियेतून झाली. २००२ साली कर्नाटकातील सात हत्तींचा कळप हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पोहोचला. नवीन समृद्ध अधिवासाच्या शोधार्थ कर्नाटकातून मार्गस्थ झालेले, हे गजराज कोल्हापूर जिल्ह्यातून उगम पावणार्या तिलोत्तमा नदीच्या कुशीत विसावले. तिलोत्तमा नदी म्हणजे तिलारी नदी.
आंबोलीतील काळ्या बिबट्याचे म्हणजेच ब्लॅक पॅंथरचे ( black panther ) पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. मात्र, यावेळीस हा प्राणी कॅमेऱ्यात कैद झाला आहे ( black panther ). मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आंबोलीतील शैक्षणिक सहलीदरम्यान या प्राण्याचे दर्शन झाले. ( black panther )
फाटक्या संसाराला ठिगळांची जोड देत, त्यांनी लोककलेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. विशेषतः पिंगुळी लोककला त्यांनी देशभरात पोहोचवली. जाणून घेऊया सिंधुदुर्गातील गणपत मसगे यांच्याविषयी...
राज्यात लवकरच निवडणुकांचा मुहुर्त निघणार असून अनेक राजकीय पक्षांमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस बघायला मिळत आहे. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंधुदुर्गतील दोन पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. परशुराम उपरकर आणि प्रवीण मर्गज असे या दोन पदाधिकाऱ्यांची नावं आहेत.
शंभर खोके एकदम ओके ही घोषणा गेल्या दोन वर्षांपासून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बड्या नेत्यांच्या तोंडी आपण ऐकली असेल. मुख्यतः ही वाक्य ठाकरे गटाच्या नेत्याकडून शिंदे गटाच्या नेत्यावर केल्या जाणाऱ्या आरोपात पाहायला मिळायची. पण आज हे चित्र बदलण्यात शिवसेनेला शिंदे गटाला यश मिळालं आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना जबर धक्का देत मोठा गौप्यस्फोट केलायं. ‘उद्धव ठाकरे यांच्याकडे मी १ कोटी रूपयांचा चेक दिला होता. मंत्रिपदासाठी त्यांनी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे मला माहिती नाही’, असा मोठा गौप्य
भाजपकडून सध्या राज्यभरात 'गाव चलो अभियान' राबवण्यात येत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनीदेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे अभियान राबवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड आणि वैभववाडी मतदारसंघांमध्ये भेट देत मोदी सरकारच्या योजनांची माहिती जनतेला दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प असून हा राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार आहे, असा निर्णय मंगळवारी घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जात असल्याचा आरोप उबाठा गटाकडून केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकल्प राज्याचा असून तो बाहेर जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
'इंटरनॅशनल यूनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'च्या (आययूसीएन) (iucn red list plant) लाल यादीत महाराष्ट्रात आढळणाऱ्या वनस्पतीच्या तीन प्रजातींना धोकाग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. निसुर्डीच्या कुळातील दोन प्रजातींना 'संकटग्रस्त' (एनडेंजर्ड) आणि कोच कुळातील एका प्रजातीला 'नष्टप्राय' (क्रिट्रीकली एनडेंजर्ड) श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. (iucn red list plant) यामुळे सह्याद्रीत अगदी मोजक्याच ठिकाणी सापडणाऱ्या या प्रजातींच्या संवर्धनाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. (iucn red list plant)
ज्याचे सागरावरती अधिराज्य, तोच बलवान, ही उक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणली. त्यावेळी समुद्राकडून शत्रूचे धोके होते. जसे की जंजिर्याचा सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज आणि समुद्रामध्ये फिरणारे समुद्री चाचे. या धोक्याचे विश्लेषण करून छत्रपतींनी कोकणपट्टीच्या उथळ पाण्यामध्ये सक्षम असलेले नौदल तयार केले आणि समुद्रामध्ये सुद्धा गनिमी कावा वापरला. त्यांनी अनेक जलदुर्ग बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडवणार्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर यंदाचा भारताचा ‘नौदल दिन’ साजरा झाला, हे औचित्यपूर्ण ठरले. त्य
जवळपास सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींचे पुनरागमन झाले आहे (human-elephant conflict in sindhudurg). कोल्हापूरात काही काळ व्यस्थित केल्यानंतर हत्तींचा कळप पुन्हा कोकणात उतरला असून फळबागांमध्ये त्यांनी ठाण मांडले आहे. (human-elephant conflict in sindhudurg)
दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख डॅा. विशाल कडणे यांनी कोकणातील ज्वेलरी व सुवर्णकार व्यावसायिक यांच्या शिष्टमंडळासह कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांची ठाणे येथील निवासस्थानी सदीच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान सिंधुदुर्गातील सुवर्णकारांच्या विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. सुशिक्षित सुवर्णकार बांधवांना ज्वेलरी व्यवसायामध्ये उद्भवणार्या विविध प्रश्नावर आ. डावखरे यांनी मार्गदर्शन केले.
नौदलाच्या ‘मालवण’ नावाच्या युद्धनौकेचे कोचीन येथे जलावतरण झाले आहे. नौदल दिनाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मालवण या युद्धनौकेचे जलावतरण झाले आहे. ‘आयएनएस मालवण’ अशी ओळख असणारी ही पाणबुडीविरोधी युद्धपद्धतीची युद्धनौका असेल.
या देशात गॅरंटीचे दुसरे नाव नरेंद्र मोदीजी आहे हे देशातील जनतेने सिद्ध केले आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय नौदल दिन साजरा होत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पार पडले.
नौदलातील पदांना भारतीय परंपरेनुसार नावं देणार तर नौदलाच्या गणवेशावर शिवमुद्रा असणार, अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. भारतीय नौदल दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्ररती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
४ डिसेंबर २०२३ हा दिवस भारतीय नौदलाच्या, महाराष्ट्राच्या, कोेकण किनारपट्टीच्या इतिहासातला एक संस्मरणीय दिवस ठरणार आहे. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण शहराला भेट देऊन, छत्रपती शिवरायांच्या ४३ फूट उंच ब्राँझ पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. शिवाय ते सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन, भारतीय नौदलाचा ’आरमार दिन’ तिथे साजरा करणार आहेत.
संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत नोंद असणाऱ्या 'इंडियन स्किमर' ( indian skimmer sindhudurg ) म्हणजेच 'पाणचिरा' या पक्ष्याचे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा किनाऱ्यावर दर्शन झाले. ( indian skimmer sindhudurg ) महत्त्वाचे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पक्ष्याची ही पहिलीच नोंद आहे. महाराष्ट्रात पाणचिरा पक्ष्याच्या फार कमी नोंदी असून अधिवास नष्टतेमुळे या पक्ष्याला संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. ( indian skimmer sindhudurg )
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किनाऱ्यालगत 'किलर व्हेल' ( killer whale ) या सागरी सस्तन प्राण्याचे दर्शन घडत आहे. महाराष्ट्रातील वेंगुर्ला ते कर्नाटकपर्यंतच्या सागरी परिक्षेत्रामध्ये 'किलर व्हेल'चा ( killer whal ) गट (पाॅड) फिरत असल्याचे निरीक्षण मच्छीमारांनी नोंदवले आहे. सागरी जैवसाखळीतील सर्वात मोठा डाॅल्फिन आणि शिकारी सस्तन प्राणी म्हणून हा जीव ओळखला जातो. ( killer whale )
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष व विश्व हिंदू परिषदेचेही हीरक महोत्सवी वर्षानिमित्त बजरंग दलाच्यावतीने सिंधुदुर्ग ते मुंबई अशा १६ दिवसांच्या ‘शिवशौर्य यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समापन समारोह रविवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी दादर पश्चिम येथील राजा बढे चौक येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते.
‘हार्पेटॉलॉजी’चा अभ्यासक्रम पूर्ण करून निसर्गसंवर्धनाविषयी जनजागृतीचे उपक्रम राबविणार्या नाशिकच्या पर्यावरणप्रेमी वैभव भोगले याच्याविषयी...
वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे “वैद्यकीय अधिकारी“ पदांच्या एकुण १३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच, सदर पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात चिघळलेल्या मानव-हत्ती संघर्षावर उतारा म्हणून ठोस उपाययोजनात्मक बाबी राबवण्याचे निर्देश वनमंत्री सुधार मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिले ( Sindhudurg elephant ). या प्रश्नासंबंधी भागधारकांची बैठक मंगळवारी मंत्रालयात पार पडली. बैठकीत उपस्थित गावकऱ्यांनी हत्ती पकड मोहिमेचा ग्राहक धरला, तर वन अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईमध्ये जलदपणा आणण्याच्या अनुषंगाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. ( Sindhudurg elephant )
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. ४ डिसेंबर रोजी कोकण (महाराष्ट्र) दौऱ्यावर येणार आहेत. नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार असून सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौसेनेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी पंतप्रधान १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. पुण्यात त्यांना टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते.
कथा, कादंबरी, कविता, चित्रपट, आकाशवाणी यांसह पत्रकार म्हणून सजग तसेच संस्था, माणसं, पुस्तकं अशा विविध कलाकृतींच्या मागे पहाडासारखे उभे राहणारे मालवणी मुलुखातील मुसाफिर डॉ. महेश केळुसकर यांच्याविषयी...
गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी मोठा सण असतो. त्यामुळे गणपतीआधी कोकण रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरणाचं काम करण्याचा प्रयत्न करू. गणपतीआधी हे काम होतंय ही महत्त्वाची गोष्ट आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेची 12 रेल्वेस्थानकं आणि परिसराचं सुशोभीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी (८ ऑगस्ट) ऑनलाइन करण्यात आलं.
कात व्यावसायिकांच्या अडचणींबाबत विधानभवनात व्यावसायिकांच्या अडचणींबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती गठित करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.