अफगाणिस्तानमधील दहशतवादाचे चित्रीकरण करताना दहशतवाद्यांकडून हत्या झालेले रॉयटर्सचे पत्रकार दानिश सिद्दीकी यांना सोमवारी मरणोत्तर पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे
Read More
जुलै २०२१ मध्ये दानिश सिद्दिकी ‘रॉयटर’चा प्रतिनिधी म्हणून ‘अफगाण नॅशनल आर्मी’सोबत अफगाणिस्तानात, कंदाहार परिसरात, स्पिन बुलदाक या गावात गेला होता. तिथे अफगाणी सैन्य आणि तालिबान यांची चकमक झाली, त्यात सैनिकांबरोबर सिद्दिकीसुद्धा जखमी झाला. या जखमी लोकांनी गावातल्या एका मशिदीत आश्रय घेतला. पण, तेवढ्यात तालिबानी गनीमही तिथे पोहोचले. दानिश हा पत्रकार आहे, हे कळूनही तालिबान्यांनी इतर सैनिकांसह त्यालाही गोळ्या घातल्या.
कंदाहार येथे भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांची हत्या झाली आहे. तालिबान-अफगाणी सैन्य यांच्यात झालेल्या संघर्षात सिद्दिकी यांचा बळी गेला आहे.