उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिल्यानंतर आता मुंबईत उबाठा गटाने निषेध आंदोलन सुरु केले आहे. शिवसेना भवनासमोर भर पावसात हे आंदोलन सुरु झाले असून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह अनेकजण यात सहभागी झाले आहेत.
Read More
आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईकस्वाराने धडक दिली आहे. आदित्य ठाकरे शिवसेना भवनमध्ये येत असताना गाडीच्या मागून आलेली बाईक त्यांच्या चारचाकीला धडकली. शिवसेना भवनच्या सिग्नलच्या पुढे येऊन आदित्य ठाकरे शिवसेना भवनच्या उजव्या बाजूला वळण घेत होते, तेव्हा अचानक वेगाने आलेल्या बाईकने पुढच्या चाकाजवळ धडक दिली.
मनसेकडून मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्यात राज ठाकरे यांचा उल्लेख 'भावी मुख्यमंत्री' असा करण्यात आला आहे. यावरुन उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या बॅनरबाजीत महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचा मजकूर छापण्यात आला आहे.
“शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे, निधीशी आम्हाला काही करायचे नाही, हे स्पष्ट केले होते तरीही उद्धव ठाकरेंनी एका दिवसात निधी दुसर्या खात्यावर वळवला,” असा खळबळजनक आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. आमदार शिरसाट म्हणाले, “आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत, आम्हाला निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिले ते यामुळे,” असेही त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक मुंबईतील शिवसेना भवन येथे सोमवारी घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाप्रमुखांना भावनिक आवाहन केले. "२०२४ साली देशात हुकुमशाही येणार असल्याचे यावेळी ठाकरे म्हणाले. तसेच आपल्याकडे मशाल चिन्ह आहेच, त्याशिवाय माझ्या मनात आणखी दहा चिन्ह आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चिंता न करता आता संघर्ष करण्यास तयार रहावे. भाजपाचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही." असं ते यावेळी म्हणाले.
पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर आता शिंदेंच्या नेतृत्वातील मूळ शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. सोमवारी शिवसेना पक्षाला विधान मंडळात देण्यात आलेले विधिमंडळ पक्ष कार्यालय सेना नेत्यांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर आता शिवसेनेची आक्रमकता वाढण्याची शक्यता असून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे पुढील लक्ष शिवसेना भवन आणि राज्यातील शिवसेनेच्या शाखांवर असल्याचेही आता बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सेना दादर मधील शिवसेना भवन आणि सेनेच्या शाखांवरून दोन गटांमध्ये संघर्ष होण्य
मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कार्यालयावरून काल २८ डिसें. रोजी राडा झाला. त्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. उ. बा. ठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत नितेश राणे म्हणाले, "शिवसेनेच कार्यालय बाळासाहेबांच्या शिवसेनेचं कार्यालय बाळासाहेबांचा फोटो त्या कार्यालयामध्ये आहे आणि शिंदे साहेबांची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे म्हणून जे त्यांचा अधिकार आहे ते शिंदे घेणारच. आत्तापर्यंत का घेतलं नाही हा माझा प्रश्न आहे म्हणून जे जे बाळासाहेबांचा आहे, शिवसेनेचं आहे. त
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना भवनवर नुकतीच दक्षिण मुंबई विभागातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
"सुकलेली पानं गळलीच पाहिजेत, हा तर निसर्गाचा नियम आहे. ज्या पानांना कीड लागली आहे ती तोडावीच लागतील. नाहीतर ती कीड संपूर्ण झाड सडवून टाकेल.", असे विधान राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी (दि. २४ जून) शिवसेना भवन येथे घेण्यात आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते उपस्थितांशी बोलत होते. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि शिवसेनेतल्या आमदारांचं एकामागोमाग गुवाहाटीला जाणं यामुळे मुख्यमंत्र्यांनी असे विधान केल्याचे दिसत
"एमआयएमने शिवसेनेला तसेच महाविकास आघाडीला दिलेली ऑफर हे एक प्रकारे भाजपचे कटकारस्थान आहे. शिवसेनेची बदनामी होण्यासाठी भाजपकडून अशाप्रकारे प्रयत्न केले जात आहेत.", असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि. २० मार्च) पक्षातील खासदारांना 'शिवसंपर्क अभियान' अंतर्गत शिवसेना भवनातून ऑनलाईन स्वरूपात मार्गदर्शन केले. त्यानंतर संजय राऊत हे शिवसेना भवन परिसरात माध्यमांशी या संदर्भात बोलत होते.
"देशात ईडीच्या सर्वाधिक धाडी या महाराष्ट्रात झाल्या. यात महाविकास आघाडीमधल्या एकूण १४ नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या. मात्र भाजपच्या एकाही नेत्यावर ही वेळ आली नाही.", असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते, आयकर विभाग आणि ईडीकडून होणाऱ्या कारवायांवर भाष्य केले आहे. मंगळवार, दि. ८ मार्च रोजी शिवसेना भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद घेतली ते बोलत होते.
खा. संजय राऊत यांची पत्रकार परिषद, कशी नसावी अशी झाली. त्यांनी आक्रस्ताळेपणे भाषण केले. पत्रकारांनी (बिचारे पत्रकार) ते ऐकले. प्रश्न विचारण्यास बंदी होती. प्रश्नोत्तराशिवाय पत्रकार परिषद केवळ संजय राऊतच घेऊ शकतात. त्यांच्या परिषदेवरून जाणवले की, ते फार घाबरलेले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमुळे मुंबईकरांना नाहक त्रास झाल्याचे दिसून आले आहे
अयोद्धेत प्रभू श्रीराम मंदिराच्या मुद्द्यावरून दादर शिवसेना भवन परिसरात आंदोलन करणाऱ्या भाजप युवा मोर्चातील आंदोलकांवर बेछूट तुटून पडलेल्या शिवसैनिकांना भाजपच्या माहिम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांनी चांगलाच हिसका दाखवला. "महिलेवर हात टाकणाऱ्या शिवसैनिकांची खरी मदुर्मकी मला आज कळली," अशी प्रतिक्रीया अक्षता तेंडुलकर यांनी या घटनेवर दिली. झुंडीने हाणामारी अंगावर आलेल्या शिवसैनिकांना शिंगावर घेणाऱ्या अक्षता तेंडुलकर यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
शिवसेना भवन, शिवाजी पार्कसह परिसरात भाजपतर्फे सॅनिटायझेशन
राज्यसभेत उदयनराजे भोसले यांच्या शपथविधीनंतर 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवरून सुरू असलेल्या राजकारणाला खासदार उदयनराजे यांनी पूर्णविराम दिला आहे. महाराजांचा अवमान झाला असता तर मी तिथेच राजीनामा दिला असता, केवळ छत्रपतींच्या नावे राजकारण करणाऱ्यांचा हा डाव आहे, असे म्हणत खासदार संजय राऊत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यांनी समाचार घेतला आहे.
ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण