जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण येथे शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख बंदरांच्या सचिवांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसीय कार्यक्रमात देशातील प्रमुख बंदरांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाकडून वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या संमेलनाचे उद्घाटन जेनपीएचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ, केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचे सहसचिव संदीप गुप्ता यांच्या उपस्थितीत झाले.
Read More
अयोध्येत वॉटर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २२ जानेवारी २०२४ रोजी या सेवेचे उद्घाटन करू शकतात. त्याच दिवशी अयोध्येतील रामललाच्या भव्य मंदिरात प्रभू रामाच्या बालस्वरूपाचा अभिषेक केला जाणार आहे. या विशेष जल मेट्रो सेवेसाठी दोन मोठ्या बोटी वापरण्यात येणार आहेत. दोन्ही बोटी कोचीन शिपयार्ड येथून तयार करण्यात आल्या असून त्या अयोध्येत पोहोचल्या आहेत. उत्तर प्रदेशातील ही पहिली वॉटर मेट्रो सेवा असेल.