सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आपली गादी कायम ठेवली आहे. त्यांच्याविरोधात शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे मैदानात होते. दरम्यान, उदयनराजेंनी त्यांचा पराभव करत सातारा लोकसभेत विजय मिळवला आहे.
Read More
आता विधानपरिषदेतही होणार आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी; राष्ट्रवादीच्या ८ आमदारांना नोटीस; सात दिवसांत उत्तर सादर करण्याची सूचना
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्या लोकांनी अपात्रतेची काळजी करावी अशी टीका त्यांनी महेश शिंदे यांच्यावर केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील दोन्ही नेते आमनेसामने आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुरू असलेल्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा आज निर्णायक दिवस असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून मेळावे बोलवण्यात आले आहेत. यात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू असलेल्या शरद पवार गटाच्या मेळाव्याला अवघ्या १२ ते १४ आमदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू असलेल्या बैठकीला
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील दोन्ही नेते आमनेसामने आले. त्यावेळी अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील ४२ आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा केला. पण अजितदादासोबत गेलेले दोन आमदार आता शरद पवारांच्या गटात परतले आहेत.
राज्यातील 1 हजार 89 पोलीस ठाण्यांपैकी 1 हजार 82 पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी नियमितपणे कॅमेरे सुरु असणे आणि रेकॉर्डिंग जतन केले जाणे याबाबींचे ऑडिट केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान यासंदर्भात सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
प्राथमिक शाळांनी वीज देयक भरण्यासाठी पुरेश्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या शाळांची वीज जोडणी तोडली जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तसेच या शाळांची वीज जोडणी तोडू नये, याबाबत वीज वितरण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत चर्चा झाली असून त्यांच्यासोबत लवकरच बैठक देखील घेतली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता.
विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कुठलेही कामकाज सुरू होण्यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांनी भंडारा गोंदियातील महिलेवर झालेल्या अत्याचाराचा प्रकरण चर्चेसाठी आणण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.