प्रामाणिकपणे प्राप्तीकर भरणार्या नागरिकांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ ही नवीन व्यवस्थेचा शुभारंभ करुन प्राप्तीकर नियमात तीन मोठ्या सुधारणा सुचविल्या. यामुळे कर संकलनात अधिक पारदर्शकता येईल तसेच नागरिक उत्पन्न न लपविता कराची योग्य रक्क्म भरण्यास उपुक्त होतील.
Read More
‘आत्मनिर्भर भारत’ ही योजना क्रांतीकारी आणि पथदर्शी असली तरी त्याचे व्यापक स्वरुप पाहता, या योजनेची प्रत्यक्ष काटेकोरपणे अंमलबजावणी करणे हे निश्तितच सरकारसाठी मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे आगामी काळात या आव्हानांचा सामना मोदी सरकार कशाप्रकारे करते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सध्या कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे देशाबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही प्रचंड धक्का बसला आहे. तेव्हा, आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्याची वर्तमान आर्थिक स्थिती, आव्हाने आणि उपाययोजनांचा घेतलेला हा आढावा...
आतापर्यंत वैयक्तिक अपघात विम्यासाठी दुचाकीधारकाला १ लाख रुपयांपर्यंतच्या विमा संरक्षणासाठी ५० रुपये प्रीमियम भरावा लागत होता, तर खाजगी चारचाकी किंवा व्यवसायासाठी वापरली जाणारी चारचाकी यांना २ लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा संरक्षणासाठी १०० रुपये प्रीमियम आकारला जात होता. आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी १५ लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण सक्तीचे करण्यात आले असून, यासाठी ७५० रुपये प्रीमियम अधिक कर आकारले जाणार आहेत.