भारतातील निर्यात वाढल्यामुळे रशियाकडील अतिरिक्त रुपयाची समस्या आता सुटली असून, रिझर्व्ह बँकेने नियमात केलेल्या सुधारणा रशियाला भारतात गुंतवणूक करण्याची मुभा देतात. त्याचवेळी रशियाने आयात वाढवण्यावर भर दिला असून, गेल्या सहा महिन्यांत चार अब्ज डॉलर इतकी आयात केल्याचे आकडेवारी सांगते. भारत-रशिया यांच्यातील संबंध अधिक वृद्धिंगत असल्याचेच ताज्या घडामोडींमधून समोर येते.
Read More
भारताच्या ‘जी२०’ अध्यक्षपदाच्या सक्रिय भूमिकेद्वारे इतिहासात प्रथमच ग्लोबल साऊथमधील देशांना एकत्रित करण्यात आले आहे. याद्वारे नवी सत्ताकेंद्रे उदयास येत असल्याचे रशियास दिसून येत आहे. हितसंबंधांच्या स्पष्ट व न्याय्य समतोलासाठीसाठी प्रयत्न करण्याच्या मुद्द्याच्या समावेशामुळे नवी दिल्ली घोषणापत्र हे ‘माईलस्टोन’ ठरले आहे, असे प्रतिपादन रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी केले.
देशाची राजधानी दिल्ली येथे गुरुवारी ‘जी २०’ राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हे युग यद्धाचे नाही’, हीच भूमिका भारत मांडणार असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी बुधवारी केले. राष्ट्रपती भवन कल्चरल सेंटरमध्ये (आरबीसीसी) ‘जी २०’ राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दिवसभर बैठक होणार आहे. त्याविषयी परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी पत्रकारांशी विशेष संवाद साधला.