( Ayodhya Deepotsav 2024 ) अयोध्या दिपोत्सव २०२४ : यावेळी एकाच दिवशी एक नाही तर दोन विश्वविक्रम नोंदविण्यात आले आहेत.
Read More
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शुक्रवार, दि. १० मे रोजी सहपरिवार अयोध्येत रामललाचे दर्शन घेतले. दुपारी सर्वप्रथम त्यांनी हनुमान गढी येथे मारुतीरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर राम मंदिर येथे श्री रामलला चरणी ते नतमस्तक झाले. संध्याकाळी सर्व परिवाराने मिळून शरयू नदीची आरती केली. गुरुवारपासूनच स्थानिक प्रशासन उपराष्ट्रपतींच्या आगमनाच्या तयारीला लागले होते. दरम्यान राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासचे महामंत्री चंपत राय व अन्य सदस्यांसह उपराष्ट्रपतींची बैठकही संपन्न झाली.
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नायिका प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या अमेरिकेहून भारतात आली आहे. मुंबईत एका कार्यक्रमासाठी नुकतीच तिने हजेरी देखील लावली होती. यानंतर ती थेट अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) लेक मालती आणि नवरा निक जोनस सोबत गेली आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात जाऊन तिने (Priyanka Chopra) दर्शन घेतले. यावेळी तिच्यासोबत मालती आणि निक दोघेही पारंपारिक पेहरावात दिसले.
कल्याण लोकसभा मतदार संघातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 1350 हून अधिक रामभक्त रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येत गेले आहेत.
"समाज कसा खुश राहील, हीच आपली विचारधारा आहे. भारत येत्या दहा वर्षांत जगाचे नेतृत्व करेल. परंतु त्यासाठी आपल्याला भारतात नेतृत्व क्षमता विकसित करावी लागेल.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल यांनी केले.
अयोध्येतील भव्य राम मंदिरात अरूण योगिराज यांनी साकारलेल्या रामललाच्या लोभसवाण्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. आकर्षक आणि मनमोहक अशी रामललाची मूर्ती घडविणार्या शिल्पकार अरूण योगिराज यांच्या कलकौशल्याचे जगभरातून कौतुक झाले. मात्र, अयोध्येत पार पडलेला रामललाच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद कर्नाटकातील काँग्रेस सरकारला झालेला दिसत नाही.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत आज दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत केली जाणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी संपुर्ण अयोध्यानगरी विविध मान्यवरांच्या उपस्थितीने बहरुन आली आहे. राम मंदिराच्या आवारात रामाची गाणी ऐकू येत आहेत. यात राम आएंगे हे गाणे विशेष असून चक्क दिवंगत गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. लता दीदींच्या आवाजातील हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांची अनुपस्थिती या गाण्यामुळे काहीशी दुर झालेली
सर्वत्र 'जय श्री राम हा एकच जयघोष ऐकू यात आहे. देशातील तमाम रामभक्तांचे डोळे रामलललाचे दर्सन करण्यासाठी आसूसलेले आहेत. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे. अशात अभिनेते अनुपम खेर हे देखील अयोध्येत पोहोचले असून त्यांनी सर्वप्रथम हनुमानाचे दर्शन घेतले आहे. त्यांनी अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात जाऊन पूजा केली असून रामाच्या भक्तीत तल्लीन झालेले ते पाहायला मिळत आहेत.
अयोध्येत प्रभू रामाचे मंदिर आज २२ जानेवारी २०२४ रोजी अखेर ५०० वर्षांनी उभारले जाणार असून देशातीलच नव्हे तर जगातील सर्व रामभक्त रामाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार देखील अयोध्येत प्रभू रामाच्या आगमनासाठी पोहोचले असून यात अभिनेत्री कंगना राणावत हिचाही समावेश आहे. अयोध्येत पोहोचल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना ‘आज रामललला संपुर्ण देशाला मार्गदर्शन करणार', असे कंगानाने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदमंत्रांच्या घोषात १४० कोटी भारतीयांच्या वतीने अयोध्येतील भव्य मंदिरात श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी अवघ्या हिंदू समाजाच्या मनात “विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी” अशी भावना दाटून आली होती.
जगभरातील तमाम रामभक्तांचे २२ जानेवारीला होणाऱ्या अयोध्या राम मंदिर सोहळ्याची उत्सुकता आहे. प्राणप्रतिष्ठेपुर्वीच प्रभू रामचंद्राच्या मुर्तीचा एक फोटो सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. यावर अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या बावना व्यक्त केल्या आहेत.
एखाद्या निवडलेल्या विषयाचा बहुपैलू वेध घेणारे आणि अनेक आयामांतून त्या विषयाचा एक एक पदर अलगद उलगडून सांगणारे लेखक आणि नाटककार म्हणजे अभिराम भडकमकर. त्यांच्या ’सीता’ या नव्या कोर्या कादंबरीचे नुकतेच प्रकाशन झाले. तसेच उद्या, दि. 22 जानेवारी रोजी रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळाही अयोध्येत मोठ्या उत्साहात संपन्न होईल.त्या पार्श्वभूमीवर रामराज्यातील सीतेचे भावविश्व आणि तिची निर्णयक्षमता व भूमिका घेण्याची वृत्ती, यावर ही कादंबरी प्रकाश टाकते. तेव्हा या कादंबरीविषयी, एकूणच सीतेच्या व्यक्तिरेखेविषयी अभिराम भडकमकर य
काँग्रेस पक्षाने रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता काँग्रेसचे मोठे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी रामललाच्या मूर्तीविषयी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी मूर्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
या लेखाच्या कालच्या पहिल्या भागात मांडलेली बाबरीच्या पतनापूर्वी आणि पश्चात हिंदू मंदिरांसह मालमत्तांच्या नरसंहाराची दाहक आकडेवारी सर्वस्वी मन विषण्ण करणारी अशीच. आजच्या दुसर्या भागात बाबरी पतनानंतर हिंदूंवर झालेले जीवघेणे हल्ले आणि या एकूणच घटनाक्रमात इस्लामी ताकदींनी माध्यमांचा नॅरेटिव्ह सेटिंगसाठी केलेला यथायोग्य वापर, याचा केलेला हा पदार्फाश...
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’मिशन दक्षिण’ सुरू केले आहे. याच क्रमाने पंतप्रधान मोदी शुक्रवारी म्हणजेच दि. १९ जानेवारीला तामिळनाडूला भेट देणार आहेत. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी चार दिवसांत पंतप्रधान मोदी तिसर्या दक्षिणेकडील राज्याचा दौरा करणार आहेत.
डिसेंबर १९९२च्या बाबरी ध्वस्तीकरणाच्या अगोदर व नंतर भारतासह पाकिस्तान व बांगलादेशात हिंदूंना नृशंस अत्याचाराला सामोरे जावे लागले. हजारोंच्या संख्येने मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली. हिंदू बांधवांची घरे, दुकाने अशा मालमत्तांनाही धर्मांधांनी लक्ष्य केले. तेव्हा, दि. २२ जानेवारीच्या अयोध्येतील रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, हिंदूंवरील या अनन्वित अत्याचारांचे स्मरण करणे क्रमप्राप्त ठरावे.
तब्बल पाच शतकांच्या संघर्षाला सोमवार, दि. 22 जानेवारी रोजी मूर्त स्वरूप येत आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पाश्वर्र्भूमीवर संपूर्ण देश राममय झाला आहे. मात्र, हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी अनेक रामभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. येणार्या पिढीला राम मंदिरासाठीचा संघर्ष, रामजन्मभूमी आंदोलन नेमके काय होते, त्यात कुणाकुणाचा सहभाग होता. तसेच, राममंदिर निर्माणाचा इतिहास माहीत व्हावा, याकरिता रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे यासंदर्भातील सर्व माहितीचे दस्ताऐवजीकरण केले जात आहे. हे काम नाशिक जिल्ह्य
अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. त्यामुळे संपुर्ण देश सध्या राममय झाला आहे. श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि हा महत्वाचा दिवस साधत प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. यात गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजातील प्रभू श्रीराम हे गाणे श्रोत्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.
अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला संपन्न होणार असून या दिवसाची प्रत्येक रामभक्त आतुरतेने वाट पाहात आहे. या सोहळ्याचे निमंत्रण विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींना दिले जात आहे. यात हिंदी आणि दाक्षिणात्य कलाकारांचा देखील समावेश आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांना देखील नुकतेच निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, कोकण प्रांत प्रचार प्रमुख अजय मुडपे आणि निर्माता महावीर जैन यांच्या उपस्थितीत आलिया व रणबीरला श्रीरामलल्ला
“तरुणांनो, मी तुम्हाला सांगत आहे, आम्ही आमची मशीद गमावली आहे आणि तिथे काय केले जात आहे ते तुम्ही पाहत आहात. तरुणांनो, तुमच्या अंतःकरणात वेदना नाही का? ज्या ठिकाणी आपण बसून ५०० वर्षे कुराण-ए-करीमचे पठण केले ते आज आपल्या हातात नाही. तरुणांनो, तुम्हाला दिसत नाही का आणखी तीन-चार मशिदींबाबत षडयंत्र सुरू आहे, ज्यामध्ये दिल्लीची मशीदही सामील आहे." असे वक्तव्य एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.
अयोध्येत येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरातील रामभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होते. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून यात हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील हजर राहणार आहेत. दरम्यान, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापुर्वी अभिनेता रणवीर शौरी याने राम मंदिरासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल जाहीर माफी मागितली आहे. रणवीर याने अयोध्येतील राम मंदिराजागी एखादे रुग्णालय किंवा स्मारक उभारण्यात यावे असे म्ह
‘मंदिर वहीं बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे’ अशी घोषणा देशातील हिंदू समाजाने 90 च्या दशकात दिली होती. अयोध्येत श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभारण्याच्या तब्बल 500 वर्षांच्या लढ्याचे ही घोषणा एक प्रतीक होती. हिंदू समाजाच्या लढ्यास यश येऊन अखेर मंदिराची उभारणी निर्णायक टप्प्यात आली असून, दि. 22 जानेवारी रोजी श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्रीराम मंदिर प्रकल्पाचे मुख्य अभियंते आणि रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, ज्येष्ठ स्थापत्त्य अभियंते जगदीश आफळे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विशेष प्रति
अयोध्येत दि. २२ जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. यातच आता रेल्वेकडून सुद्धा मोठी अपडेट आली आहे. ३० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांनी सोमवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अमृत भारत ट्रेनची पाहणी केली. यावेळी अश्विनी वैष्णव म्हणाले की, "अमृत भारत ही ट्रेन नव्या भारताची ट्रेन आहे."
अयोध्येत रामलला विराजमान होणार असल्याच्या निमित्ताने दि. सोमवार, २२ जानेवारी २०२३ राज्य सरकारतर्फे सार्वजनिक सुटी जाहीर करावी अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्याना पत्र दिले आहे.
काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंनाही रामनामाची ॲलर्जी झाली आहे. त्यामुळेच रामनामाचा गजर केला की त्यांना त्रास होतो, असे प्रत्युत्तर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना गुरुवारी ट्विटरद्वारे दिले. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. 'काही राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. निवडणुकीसाठी आचारसंहिता असते. काही शंकाकुशंकाबाबत खुलासा व्हावा, यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
"अयोध्येत श्रीराममंदिर निर्माणाचे कार्य जवळजवळ पूर्णत्वास येत आहे. येत्या २२ जानेवारी रोजी श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असून यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संघ स्वयंसेवकांकडून देशभरात व्यापक संपर्क अभियान राबविले जाणार आहे.", अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी दिली.
अयोध्येत राम मंदिरात श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्याआधी ५ नोव्हेंबरला एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राम मंदिरात ५ नोव्हेंबरला अक्षत पूजा होणार आहे. या अक्षत पूजेमध्ये १०० क्विंटल तांदूळ, एक क्विंटल हळद आणि एक क्विंटल देशी तूपाची पूजा केली जाणार आहे. हा कार्यक्रम संपूर्ण श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आयोजित केला आहे.
"काँग्रेस नेत्यांचे बाबरीवरील प्रेम कमी होत नाही हे दुर्दैवी आहे. ते स्वतः रामभक्त नसून परकीय आक्रमक बाबरचे भक्त असल्याचे वेळोवेळी सांगतात. अयोध्येतील संत अशा लोकांना कोणत्याही मंदिरात जाऊ देणार नाहीत." असा इशारा हनुमानगडीचे महंत राजुदास यांनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे.
"कारसेवकांवर गोळ्या झाडल्या गेल्या तेव्हा हे रामाचे भक्त कुठे होते." अशा शब्दांमध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रणावरून राजकारण करणाऱ्या संजय राऊत आणि सलमान खुर्शीद यांना सुनावले आहे. अयोध्येतील राममंदिरात रामललाच्या विराजमन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रणावरून विरोधक राजकारण करत आहेत.
अभिनेत्री कंगना रणौत यांनी गुरुवारी (२६ ऑक्टोबर २०२३) रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांनी रामललाच्या मंदिराचे बांधकामात मदत करणाऱ्या कामगारांशी मुलाखत केली. त्यावेळी त्या म्हणाला की, "'तुम्ही सर्व आमच्यासाठी हनुमानजीची सेना आहात, जी हे काम पूर्ण करत आहे."
अयोध्येच्या रामजन्मभूमीवरील राममंदिराचे ४० टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झाले आहे. राममंदिराचे तसेच या मंदिर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या मंदिराच्या पायाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. या नव्याने उभारण्यात येणाऱ्या मंदिरात भाविकांना श्रीरामाच्या दर्शनाची सुविधा डिसेंबर २०२३ पासून उपलब्ध होईल. २०२४ च्या आधी अयोध्येतील राममंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
अंधेरी येथील मेयर सभागृहात मंगळवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी अमीरचंद यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी साहित्याचे सर्व नऊ रस, चित्रातील सर्व सात रंग, लोककलांचे सर्व सात सुर एकाचवेळी आपल्या लाडक्या अमीरचंद यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी एकत्र आले होते.
काँग्रेसने चीनसोबत छुपे समझोते करण्याव्यतिरिक्त साठ वर्षांत काहीही केले नाही, अशी टिका राम माधव यांनी केली.
अयोध्या राम मंदिर प्रकरणातील खटल्यातील रामलला विराजमानचे वकील के. पराशरन आपल्या तीन पिढ्यांना समवेत रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. ९२ वर्षीय पराशरन यांनी रामललाचे पक्षकार म्हणून खटल्यात भूमिका मांडली होती. राम मंदिराचा निकाल रामललाच्या बाजूने आल्यानंतर प्रथमच ते अयोध्येत जाणार आहेत.
के. पराशरन पोहोचणार अयोध्येला