(Fatima Shaikh) आधुनिक काळात स्त्रीशिक्षणासाठी पुढाकार घेणार्यांत सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रणी आहे. त्यासाठी सर्व समाज कृतज्ञ आहे. सावित्रीबाई आणि जोतिराव यांना यासाठी सहकार्य करणार्या अनेकांची नावे ब्रिटिश कागदपत्रांमुळे लोकांना माहीत झाली आहेत.
Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावित्रीबाई फुलेंचेच काम पुढे नेत आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांचे तोंडभरून कौतूक केले. बुधवार, ३ जानेवारी रोजी सातारा येथे आयोजित सावित्रीमाई फुले जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
सावित्रीआईंच्या नेतृत्वात महिला राज्याकडे आपण वाटचाल करत आहोत, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. बुधवार, ३ जानेवारी रोजी सातारा येथे आयोजित सावित्रीमाई फुले जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, अतुल सावे, शंभुराज देसाई यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ (भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला) आणि ‘क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती’ संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने, चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्मधील शाहीर योगेश रंगमंच या नूतन प्रेक्षागृहात, दि. २८ आणि २९ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे व्यासंगी अभ्यासक अन् संशोधक प्रा. डॉ. प्रभाकर मांडे साहित्यलेखन, संशोधन आणि सामाजिक-सां
सावित्रीची लेक आपल्या आयुष्यातील चढउतार पचवत, शिक्षणाचे व्रत हाती घेत, आदर्श भावी पिढी घडविणार्या, आणि सावित्रीबाई फुले यांचा समृद्ध वारसा पुढे चालविणार्या वनिता उगले यांच्याविषयी...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया तातडीने राबवा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहेत. शुक्रवारी विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
समाजसुधारक क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त 'फुले' (Phule Movie) चित्रपटाचे नवीन पोस्टर भेटीला आले आहे. फुले चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा सावित्रिबाई फुलेंची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. स्त्री शिक्षणाचा पायंडा रोवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या शैक्षणिक क्रांतीमुळे आज समाजात महिलांना मुक्तपणे शिक्षण घेता येते. या चित्रपटात फुले दाम्पत्याचा प्रवास दाखवला जाणार आहे. ‘फुले’ (Phule Movie) चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्री
स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. महाराष्ट्रातील विविध चित्रपटगृहात या चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण केले आहे. अशातच 'सत्यशोधक' सिनेमाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.
स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा ५ जानेवारीला ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोहळा संपन्न झाला.
ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ सुरू करण्यात आल्याची माहिती इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी बुधवार, दि. १३ डिसेंबर रोजी दिली. आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शनिवारी ९ डिसेंबरला झारखंडमधील गोड्डा भागातील पाथरगामा येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी कार्यक्रमातील लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात उपस्थित मुलींना सायकल घेण्यासाठी पैसे मिळतात का, असा सवाल केला
पुणे महापालिकेने जेथे मुलींची पहिली शाळा बांधण्यात आली होती त्या ऐतिहासिक भिडेवाड्याचे जीर्ण बांधकाम मंगळवारी पहाटे पाडले. महत्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेला चित्रपट म्हणजे ‘सत्यशोधक’. महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांचे जीवन मोठ्या पडद्यावर उलगडले जाणार आहे. नुकतेच या पोस्टरचे अनावरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ‘सत्यशोधक’ चित्रपटाचा ट्रेलर छगन भुजबळ यांना दाखविण्यात आला व लवकरच हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. यावेळी छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या सर्व टीमला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
पर्यावरण आणि अध्यात्माची सांगड घालून जैवविविधता, वनस्पती वर्गीकरणशास्त्र, परागीभवन शास्त्र, औषधी वनस्पती यांच्याविषयी ‘बायोस्फियर्स संस्थे’मार्फत काम करणारे डॉ. सचिन पुणेकर यांच्याविषयी...
मुंबई : मरीन ड्राईव्हजवळील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील १८ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन हत्या केल्याप्रकरणी सखोल तपास करुन दोषींवर कडक कारवाई करावी त्याचबरोबर भविष्यात अशा घटनांना पायबंद घालण्याकरिता दर महिन्याला मुंबईतील महिला वसतिगृहांचे सिक्युरिटी ऑडिट करावे, अशी मागणी आ. मनिषाताई चौधरी यांच्या नेतृत्वात भाजपा शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन दिले आहे.
चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. ज्याने या तरुणीची हत्या केली. त्याचा मृतदेहही रेल्वेरुळावर आढळला आहे. यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी या वसतिगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुलींच्या संरक्षणासाठी कडक नियमावली होणार असल्याचे सांगितले. विद्यार्थीनींनी त्यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. आरोपीचं वागणं बरोबर नव्हतं. त्याची नजरही चांगली नव्हती, असं या विद्यार्थींनीनी म्हटल्याचं चित्रा वाघ य
महिला आणि बालके, सुधारगृहातील मुलांसाठी काम करणार्या कालिंदी हिंगे यांना नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या ‘सावित्रीबाई फुले पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. त्यांच्या जीवनकार्याचा हा आदर्श प्रवास...
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा परिसरातील ‘ब्लू बेल’ या शाळेचे दोन मजले ‘सील’ केले. याठिकाणी दहशतवादी कारवायांकरिता सशस्त्र आणि नि:शस्त्र लढा कसा लढावा, याचे प्रशिक्षण ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून दिले जात होते, असा दावा ‘एनआयए’कडून करण्यात आला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारकासंदर्भात अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. ३४९ कोटींच्या आधीचा निधीमिळून ७४१ कोटींचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आता परत कृष्ण, अर्जुन, छ. शिवाजी महाराज होणे नाही. तेव्हा खरी जबाबदारी आज महिला आयोगावर आहे. महिला आयोग म्हटलं की, सगळ्यांना धडकी भरायला पाहिजे. एक अतिशय करारी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची या महाराष्ट्राला नेहमीच गरज असेल, जे नि:पक्षपणे आपली छाप पाडेल व समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडवण्यास कटिबद्ध असेल.
मित्रहो, दि. ८ मार्च हा दिवस वैश्विक स्तरावर ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. मागील काही वर्षांपासून अमेरिका, युरोप, ब्रिटन, जर्मनी, भारत या देशांमध्ये स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल करणे, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना ‘वर्किंग हवर्स’ कमी देणे, वेतनवाढ, नोकरीच्या ठिकाणी महिलांना संरक्षण आदी मागण्यांसाठी विविध महिला संघटनांकडून आंदोलने झाली, मोर्चे निघाले. यातूनच महिलांच्या सन्मानासाठी अन् हक्कांसाठी सर्वानुमते दि. ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरल
पुणे येथील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी मालक, विकासक व भाडेकरू यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
‘युजीसी’ने परदेशी विद्यापीठांना भारतात प्रवेशासाठी दारे खुली केली खरी. परंतु, यानिमित्ताने उपस्थित होणार्या काही मूलभूत प्रश्नांचाही खोलवर विचार करुन त्यांचीही उत्तरे शोधावी लागतील.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त दि. ३१ मे रोजी जन्मस्थळी चौंडीत कार्यक्रम संपन्न झाला. आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात हा कार्यक्रम असल्याने राष्ट्रवादीतर्फे हा कार्यक्रम 'हायजॅक' करण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला
एका सर्वेक्षणानुसार, कोरोना महामारीच्या काळातील पहिल्या टाळेबंदीत ऑनलाईन शिक्षणामुळे शहरी वस्त्यांमधील विद्यार्थिनींना शिक्षण तसेच प्राथमिक आरोग्य सेवासुविधांपासून वंचित राहावे लागले. तेव्हा, ठाकरे सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे आणि या सावत्र वागणुकीमुळे महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकींच्या आयुष्यात मात्र अंध:कारच दाटून आला.
“मंडल आयोगाच्या अंमलबजावणीवेळी ‘ओबीसी’ समाजाने लढायला हवे होते. पण, त्यावेळेस दलित वर्ग मैदानात उतरला. ‘ओबीसी’ मात्र, मागे होते. कारण, त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा आहे. त्यामुळे मला ‘ओबीसीं’वर फारसा विश्वास नाही,” अशी जाहीर कबुली राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवार, दि. ३ जानेवारी रोजी दिली.
: महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सहाय्यक प्राध्यापक पदाकरता घेण्यात येणारी सेट अर्थात राज्य पात्रता परीक्षा येत्या २६ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी आजपासून अर्ज भरता येणार असून १० जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित 'सत्यशोधक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोषित पिडीतांसाठी जोतिरावांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. अंधश्रद्धेच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे काम जोतिरावांनी केले.
माँसाहेब जिजाऊंचा आदर्श प्रमाण मानून प्रत्येक सुख-दुःखात संकटात स्वत्त्व आणि मानवी मूल्य जपत जीवनक्रमण करणार्या साहित्यिक आणि समाजसेविका राखी रासकर यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा.
महाराष्ट्रातील महान कर्ते समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या संघर्षमय कार्यात सावलीसारखी साथ देणाऱ्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा त्याग अतुलनीय असा आहे. ज्या काळात स्त्रीला मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला दुर्लक्षित केले जात होते, त्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला.
मी एकटा काही करू शकत नाही, पण म्हणून मी करूच नये असे काही आहे का? मी सुरूवात तर करेन. माझ्यापरीने सत्कार्याची ज्योत प्रज्वलित करेन. एक ज्योत लाखो ज्योती निर्माण करून अंधकाराला पराभूत करू शकते, असा विचार करून चंद्रकांत सावंत या शिक्षकाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात सेवाकार्य करण्यास सुरूवात केली. सेवाकार्याचे बिज रोवताना या माणसाने कोणत्याच प्रसिद्धीचा, लाभाचा विचार केला नाही. हे सेवाकार्य जणू त्यांच्या जीवनाचे लक्ष्य होते आणि आहे. या लेखामध्ये त्यांच्या सेवाकार्याचा घेतलेला हा मागोवा...
सावित्रीबाई साठे या साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई... त्यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनातर्फे ‘मातृशक्ती रमाई पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. त्यांची जीवनकहाणी...
क्रांती ही दुसर्यांसाठी असते की स्वत:साठी? जगात अनेक क्रांतिकारक झाले, पण हा मूलभूत प्रश्न त्यांच्या जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही पडलाच. या सार्याला अपवाद आहेत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या क्रांतीतील संतत्व जाणून घ्यायलाच हवे.
पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन, पुणे मराठी ग्रंथालय आणि स्वयं महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कवयित्री संमेलन
भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांसदर्भात संकल्पपत्राची घोषणा झाली आहे. सर्वसामावेशक अशा संकल्पपत्रात एक महत्वाची घोषणाही करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा, यासाठी नवे राज्य सरकार पाठपुरावा करेल, अशी घोषणा भाजपतर्फे संकल्पपत्रात करण्यात आली आहे.
पर्यटन विभागामार्फत देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्रात आकर्षित करून येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र हे पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन ठरावे, यादृष्टीने राज्य शासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्याविषयी सविस्तर...
संदीप कुलकर्णी आणि अभिनेत्री राजश्री देशपांडे 'सत्यशोधक' या आगामी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
‘नाही रे’ गटातल्या व्यक्तीने आयुष्यातील काटे बाजूला सारत फुलांच्या सुगंधाचे देणेकरी व्हावे. परंतु, हे सगळ्यांनाच शक्य नसते. या पार्श्वभूमीवर सुनील यांचे जगणे पथदर्शक आहे.
पालघर जिल्ह्यातील ‘विवेक’ संचालित ‘राष्ट्र सेवा समिती’ ग्राम भालिवली येथील बांबू हस्तकला केंद्रातील प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आदिवासी कलाकार महिलांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
माझी महत्त्वाकांक्षा ‘लेनेवाला नही देनेवाला’ बनण्याची होती
सुरुवातीला एमबीएचा अभ्यासक्रम सुरू केला जाईल