दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अमानतुल्लाह खान हे ईडीच्या रडारवर आहेत. अमानतुल्लाह खान यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची मागणी ईडीने न्यायालयाकडे केली आहे. दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत दावा केला होता की, ईडी आम आदमी पार्टीच्या आणखी ४ नेत्यांना अटक करणार आहे. पंरतु यावेळी त्यांनी अमानतुल्लाह खान यांचे नाव घेतले नव्हते. पण आता ईडीची टांगती तलवार अमानतुल्लाह खान यांच्या मानेवर लटकू लागली आहे. त्यामुळे अमानतुल्लाह खान यांना ही अटक होऊ शकते.
Read More
अनेकांना दारू पाण्यासोबत घेण्याची आवड असते. जणू काही त्याचप्रकारे दिल्लीमध्ये आता दारूनंतर ‘जल बोर्डा’चा अर्थात पाण्याचा घोटाळा झाला आहे, असे म्हणता येईल. या घोटाळ्यातही तथ्य असल्यास, अरविंद केजरीवाल सरकार आणि आम आदमी पक्ष घोटाळे करण्यातील वैविध्य नक्कीच सिद्ध होते.
"त्यांचे शरीर कैदेत आहे, पण आत्मा स्वतंत्र आहे. डोळे बंद करा आणि त्या आत्म्याची अनुभूती घ्या,” इति सुनीता केजरीवाल. केजरीवालांचा आत्मा मुक्त आहे आणि डोळे बंद करून तो भेटू शकतो असे म्हणणार्या सुनीता मात्र शरीररूपी अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी तुरुंगात जातात. तिथे जाण्यापेक्षा सुनीताच मग डोळे मिटून त्यांना भेटूच शकत होत्या की? काय म्हणावे, भारतीय जनता त्यातही दिल्लीकरांना मूर्ख समजणारे हे केजरीवाल दाम्पत्य आणि आप पक्ष!
भाजप नेत्या शाझिया इल्मी यांच्याकडून सौरभ भारद्वाज यांना प्रश्न