मुंबई : २०२४ मराठी भाषेला ( Marathi Bhasha ) ‘अभिजात’ भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि हेच औचित्य साधून आज सिनेटॉकिजच्या या उपक्रमावेळी जाहीर करतो की, लवकरच मी मराठी मातृभाषेवर आधारित चित्रपट तयार करणार आहे, ही महत्त्वपूर्ण घोषणा अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते सचिन पिळगांवकर यांनी केली. मुंबईत नॅशनल स्टॅाक एक्सचेंजच्या (एनएसई) वास्तूत संस्कार भारतीतर्फे आयोजित सिनेटॉकिज या तीन दिवसीय उपक्रमाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. १३ डिसेंबर रोजी संपन्न झाला.
Read More
अभिनेते, गायक, निर्माते सुनील बर्वे सध्या स्वरगंधर्व सुधीर फडके या चरित्रपटामुळे चर्चेत आहेत. आजवर नाटक, मालिका, चित्रपट या मनोरंजनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेच. शिवाय सध्या सुनील बर्वे संस्कार भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष म्हणून कामकाज पाहात आहेत. ‘महाएमटीबी’च्या ‘Unfiltered गप्पा With कलाकार’ या कार्यक्रमात सुनील बर्वे यांनी हजेरी लावत राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत ते कसे जोडले गेले याबद्दल त्यांनी सांगितलं.
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिराचा भव्य उद्धाटन सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्ताने संपुर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातच आता विश्व हिंदू परिषद आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० आणि २१ जानेवारी रोजी पुण्यातील नारायण पेठेतील रमणबाग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
जगप्रसिद्ध नृत्यांगना आणि संस्कार भारतीच्या दिल्ली प्रांत अध्यक्ष पद्मभूषण डॉ. सरोजा वैद्यनाथन यांचे गुरुवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वा निधन झाले. दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येतही अस्वस्थ होती. ‘संस्कार भारती’ दिल्ली प्रांतच्या कार्यकारिणी आणि इतर सर्व सदस्यांकडून डॉ. सरोजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
बाबा योगेंद्रनाथ यांनी ‘संस्कार भारती’च्या माध्यमातून कलाक्षेत्रात ‘सत्य, शिव आणि सुंदरतेची’ पुनर्स्थापना करण्याचे व्रत घेतले होते.
‘संस्कार भारती’चे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ मार्गदर्शक, संघ प्रचारक योगेंद्रजी यांचे १० जून रोजी लखनौ येथे निधन झाले. लखनौच्या राम मनोहर लोहिया दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ९९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने ‘संस्कार भारती’ या संघटनेची मोठी हानी झाली आहे. आपण निश्चित केलेल्या ध्येयाप्रमाणे जीवनभर ते काम करत राहिले. ‘दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवन भर अविचल चलता हैं।’ ही उक्ती त्यांच्या जीवनाला अगदी शंभर टक्के लागू होते. त्यांच्याविषयी...
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि संस्कार भारतीचे संस्थापक बाबा योगेंद्रजी यांचे शुक्रवार, दि. १० जून रोजी वयाच्या ९८व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ढासळल्याने लखनऊच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संस्कार भारती या कला क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेत राष्ट्रीय संगठन मंत्री म्हणूनही ते कार्यरत होते.
भारती वासुदेव यांचे निधन संस्कार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ख्यातनाम चित्रकार वासुदेव कामत यांच्या सुविद्य पत्नी भारती वासुदेव कामत यांचे ६ मे रोजी निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. काशिमीरा येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. भारती कामत यांचा जन्म कर्नाटकच्या कारकळ येथे झाला. त्यांच्या जाण्यामुळे वासुदेव कामत यांच्या रथाचे एक चाक निखळले आहे.
संस्कार भारती, रायगड विभाग, पनवेल समितीने ‘कलांजली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले
स्वतःच्या कर्तृत्वाच्या विश्वासाची जाणिव होणं,कोणत्याही क्षेत्रातील यशासाठी आवश्यक आहे,असं प्रतिपादन संस्कार भारतीचे अ.भा.संरक्षक राजदत्त यांनी केलं. संस्कार भारती कोकण प्रांत कार्यकर्ता त्रैमासिक बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते. कार्यकर्त्याच्या घडणीमध्ये स्व-कर्त्तृत्वाची जाणीव,अश्वारुढ व्हायला शिकलं तरच घोडदौड सुरु होईल,असंही त्यांनी सांगितलं.
'संस्कार भारती साहित्य कट्ट्या'चा उपक्रम
या स्पर्धेमुळे विविध भागांतील गायक, वादक, परीक्षक, श्रोते एकत्र आले. ते एकमेकांशी रक्षाबंधनाच्या पवित्र बंधनांना जोडले गेले.(यावेळी सर्वांना राखी बांधण्यात आली!)विविध विषयांवरील प्रबोधन, थोड्यावेळात गाऊन,बोलून आपण सर्वांनी जे भारूड तयार केले आहे