मुंबई : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज ( Prayagraj Mahakumbh ) येथे आजपासून ‘महाकुंभ’ला सुरुवात होत आहे. दि. १३ जानेवारी ते दि. २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘महाकुंभ’ होत आहे. यासाठी जगभरातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. सुमारे ४० कोटी भाविक प्रयागराजला पोहोचण्याची शक्यता आहे. आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले अमृत स्नान होत असून दि. १४ जानेवारी मकर संक्रांती, दि. २९ जानेवारी मौनी अमावस्या, दि. ३ फेब्रुवारी बसंत पंचमी, दि. १२ फेब्रुवारी माघी पौर्णिमा, दि. २६ फेब्रुवारी महाशिवरात्री या अमृत स्नानाच्या एकूण सहा तारखा
Read More
संक्रांतीचा ( makar sankranti ) सण साजरा करण्यात प्रचंड विविधता दिसते. पदार्थांमध्ये, गोधनाच्या सेवेमध्ये, उपासनेमध्ये आणि खेळांमध्ये ही विविधता दिसते. असे म्हणता येईल की, या सणाचे तत्त्व एक आहे - तीळगूळ, गोसेवा आणि सूर्योपासना आणि भारतभर तेच एक तत्त्व विविध प्रकारांनी प्रकट केले जाते. ही एकातून प्रकट झालेली विविधता आहे आणि खोलात गेले की, वरवर दिसणार्या विविधतेत एकता दिसते.
थंडी ऐन बहरात येऊन गुलाबी होते. धुक्यांच्या लाटा सकाळ कुशीतून उमलायला लागतात. सांज अधिक गहिरी कातर होऊ लागते. पानगळीचे गालिचे रस्त्यांवर पहुडूलागतात अन् हिवाळा भरात येतो. शेकोटी, हुरडा, वांग्याचा लुसलुशीत कोवळेपणा, माघाची थंडी आणि जोडीला संक्रांतीचे तीळवण. एका सृजनोत्सवाची पेशकारी. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला...
आता सगळेच कसे समाजमाध्यमांवर साजरे होत असते. त्यामुळे दिवाळीच्या फटाक्यांपासून संक्रांतीच्या लाडूपर्यंत सगळेच कसे व्हॉटस्अपवर टाकले आणि ‘तीळगुळ घ्या, गोड गोड बोला!’ असे टाकले की मग हाताचे अंगठे दाखवणे सुरू होते. आजकाल तर पतंगीही व्हॉटस्अपवरच जास्त उडविल्या जातात. त्यामुळे त्या कटण्याचा प्रश्नच येत नाही.
आता सगळेच कसे समाजमाध्यमांवर साजरे होत असते. त्यामुळे दिवाळीच्या फटाक्यांपासून संक्रांतीच्या लाडूपर्यंत सगळेच कसे व्हॉटस्अपवर टाकले आणि ‘तीळगुळ घ्या, गोड गोड बोला!’ असे टाकले की मग हाताचे अंगठे दाखवणे सुरू होते. आजकाल तर पतंगीही व्हॉटस्अपवरच जास्त उडविल्या जातात. त्यामुळे त्या कटण्याचा प्रश्नच येत नाही. आता संक्रांतीचा तीळगुळ समाजमाध्यमांवरच येत असल्याने आजकाल अत्यंत लोकप्रिय असलेला जो रोग आहे मधुमेह तो असणार्यांनाही त्यामुळे काही प्रॉब्लेम जात नाही.