Sanjay Kishan Kaul

कलम ३७० रद्द करण्याच्या आव्हान याचिकांचा ११ डिसेंबरला निकाल!

कलम ३७० रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय सोमवारी रोजी निकाल देणार आहे.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० मधील बहुतांश तरतुदी रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या २०१९ च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. भुषण गवई आणि न्या. सूर्यकांत यांचे घटनापीठ सोमवारी निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी निकाल राखून ठेवण्यापूर्वी १६ दिवस सुनावणी घेतली

Read More

समलिंगी विवाहाप्रकरणी हस्तक्षेप करणार नाही - सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी समलिंगी जोडप्यांना विवाह करण्याचा अधिकार देण्यास नकार दिला आहे. विवाहासंबंधी कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा संसदेकडे आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार याविषयी समिती स्थापन करून निर्णय घेऊ शकते, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.समलिंगी व्यक्तींना विवाहाचा अधिकार असावा, असे आदेश देण्याची विनंती करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. एस. रविंद्र भट, न्या. हिमा कोहली आणि न

Read More

श्रीकृष्ण जन्मभूमीचे सर्वेक्षण करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!

मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वेाच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला मशिदीच्या सर्वेक्षणावपर निर्णय घेण्यास सांगितले आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने याआधी उच्च न्यायालयात सर्वेक्षणाबाबत याचिका दाखल केली होती. जी फेटाळण्यात आली. त्यानंतर ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण आता श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (SC)

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121