समर्थ शिष्य वेणास्वामी इतकीच आपल्याला त्यांची ओळख आहे. पण सोळाव्या शतकात बालविधवांच्या फार मोठ्या समस्या होत्या. विधवांचे जीवन भयानक होते. त्या काळात समर्थ रामदासस्वामींनी विधवा स्त्रियांना संप्रदायात प्रवेश दिला त्यातील काहींना मठपती बनवले त्यातील मिरज मठाच्या मठपती म्हणून वेणास्वामी यांची निवड समर्थांनी केली. हे त्या काळातील क्रांतिकार्य समर्थांनी घडवले. अत्यंत कणखर मनाच्या असलेल्या वेणास्वामी समर्थ संप्रदायाच्या आधारवेली वर स्थिरावल्या आणि संप्रदाय कार्य व्यापक उंचीवर नेले. वेणा ते वेणास्वामी ही आधारवेल
Read More
समर्थ रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी ही गुरुशिष्याची अलौकिक जोडी त्या काळात महाराष्ट्राने पाहिली. आदर्श गुरुशिष्याची जी लक्षणे समर्थांनी दासबोधात सांगितली आहेत, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे समर्थ रामदासस्वामी आणि त्यांचा शिष्योत्तम कल्याणस्वामी.