भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू आहे. पश्चिम बंगाल राज्यातील बेथुआदहरी रेल्वे स्टेशन आणि ट्रेनवर जमावाने हल्ला केला. काल दि. १२ रोजी संध्याकाळी, पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर इस्लामी जमावाने हल्ला केला. तसेच स्थानकावरील लोकल ट्रेनचे नुकसान केले.
Read More