‘जी 20’ शिखर परिषदेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक नेत्यांसमोर ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असाच आपल्या मातृभूमीचा केलेला उल्लेख सर्वस्वी सुखावणारा होताच. आता पाठ्यपुस्तकांतूनही ‘भारत’ हेच नाव वापरण्यात यावे, अशी शिफारस ‘एनसीईआरटी’च्या समितीने केली आहे. वसाहतवादी मानसिकतेचे हे ओझे आजच्या आणि पुढील पिढीच्या खांद्यावर न देण्यासाठी केलेली ही शिफारस सर्वस्वी कौतुकास्पदच!
Read More
हनुमानाला सोपविलेली कामगिरी सीतेचा शोध लावणे, एवढीच होती. तरीदेखील नेमलेल्या जबाबदारीपेक्षा अधिक जबाबदारी तारतम्याने स्वतःकडे घेणे आणि ती पार पाडण्यासाठी योग्य ते पाऊल उचलणे, यात हनुमानाची दूतकार्याविषयी प्रगल्भता दिसून येते. आज हनुमान जयंतीनिमित्त श्रीरामदूत हनुमानाचे स्मरण...
गुरूपूजन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही केले जाते. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये संघाची स्थापना करताना भगव्या ध्वजालाच गुरूस्थानी मानले. तेव्हा आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु परंपरेचे स्मरण करुया...
महान बलशाली परमेश्वर पुरुष सर्वत्र विद्यमान आहे. म्हणूनच ही सारी सृष्टी अगदी सुव्यवस्थितरित्या मार्गक्रमण करीत आहे. या सार्या् ब्रह्मांडाला त्यांने व्यापून सोडले आहे. अशी कोणतीही जागा नाही की, जिथे हा पुरुष पोहोचत नाही. कारण, ‘ईशावास्यमिदं सर्वम्।’ या जगातील प्रत्येक वस्तू त्या महान परमेश्वराने व्याप्त आहे. म्हणूनच कोणीही कितीही प्रयत्न करोत, या ईश्वराच्या सत्य न्याय व्यवस्थेपासून कोणीही सुटू शकत नाही.
इसवी सन १९२०-३०च्या दशकात मोहेंजोदरो, हडप्पा वगैरे ठिकाणे सिंधू नदीच्या खोर्यात सापडलेली असल्याने, त्या नागरीकरणाला ओघानेच ‘सिंधू संस्कृती’ असे नाव दिले गेले. पण, पुढच्या काळात सिंधूच्या खोर्यात न येणार्या अशा दूरवरच्या इतरही अनेक ठिकाणी त्याच्याशी समकालीन असे आणि साधारण तशीच वैशिष्ट्ये असलेल्या नागरीकरणाचे अवशेष मिळायला लागले. त्यांच्यापैकी बहुसंख्य ठिकाणे प्राचीन ‘सरस्वती’ नदीच्या काठी होती, असे लक्षात येते. त्यामुळे या नागरीकरणाचे ‘सरस्वती संस्कृती’ हेच नाव जास्त समर्पक ठरते. ते तसेच असावे, याची कारणम
‘पश्येम शरदः शतम्।’ म्हणजेच आम्ही शंभर वर्षांपर्यंत ईश्वरीय बीजतत्त्वाला ज्ञानदृष्टीने पाहावे! सामान्य लोकांप्रमाणे किंवा पशूंप्रमाणे केवळ डोळ्यांनी पाहणे नव्हे, तर सूक्ष्मदृष्टिकोनातून त्या त्या भगवद्निर्मित वस्तूंमध्ये दिव्यत्वाचे दर्शन करावे. वस्तू किंवा पदार्थांच्या अंतरंगात काय दडले आहे, यावर विवेकशक्तीने अवलोकन करावे. अशा या असामान्य पाहण्यालाच ‘दर्शन’ असे नाव पडले आहे.
अग्नीमध्ये सर्वांच्या कार्यांना जाणण्याचे सामर्थ्य आहे. जसा भौतिक अग्नी किंवा तिची दिवा, पणती, ज्योती अशी छोटी-छोटी प्रतीकेहीदेखील सर्व वस्तूसमूहांचे ज्ञान करून देतात. त्याप्रमाणे अग्निस्वरुप, परमेश्वर हा सर्व ज्ञान-विज्ञानाला जाणणारा ‘सर्वज्ञ’ देव आहे...
न तं विदाथ य इमा जजान, अन्यद् युष्माकं अन्तरं बभूव । नीहारेण प्रावृता जल्प्या चासुतृप उक्थशासश्चरन्ति॥ (ऋग्वेद-10/82/7, यजु.17/31)
‘वेद’ ही परमेश्वराकडून मानवमात्रासाठी मिळालेली सर्वश्रेष्ठ ज्ञानसंपदा होय. सर्वहुत यज्ञस्वरूपी ईश्वराने चार ही वेदांची उत्पत्ती केली आहे, असे ऋग्वेद व यजुर्वेदातही वर्णिले आहे.