( Farmers become fuel providers in the future Union Minister Nitin Gadkari ) आपल्या देशात प्रदूषणाची मोठी समस्या आहे. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने जैविक इंधन तयार करण्याचा प्रकल्प पानिपत येथे सुरू केला आहे. जैविक इंधनाचे 400 प्रकल्प सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यातील 60 प्रकल्प सध्या सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही, तर ऊर्जा दाता, हवाई इंधन दाताच नव्हे, तर बिटुमेन दाताही होणार आहे. त्यामुळे येणार्या काळात आपण ऊर्जा आयात करणारे नाही, तर निर्यात करणारा
Read More
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व भारतीयांना मिळतील.
‘अॅडव्हांटेज विदर्भ’ महोत्सवामुळे विदर्भ उद्योगाच्या केंद्रस्थानी येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी व्यक्त केला.
(Nitin Gadkari) रस्ते अपघातामधील अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून ५ हजार रुपये बक्षीस स्वरुपात मिळायचे. परंतु आता बक्षिसाची रक्कम वाढवून २५ हजार रुपये करणार येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. रस्ता सुरक्षेच्या मुद्द्यावर अभिनेते अनुपम खेर यांच्या मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाला पुरस्काराची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत
(Nitin Gadkari) केंद्र सरकार रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना कॅशलेस उपचार देणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात 'केबल कार' प्रकल्प राबविण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. येत्या ७ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे 'विकसित भारत २०४७' या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक होणार आहे.
Atal Bihari Vajypayee Jayanti आजवर अनेक चढउतार राजकारणात अनुभवावे लागले. मला राजकारणात यायचे नाही हा सुरुवातीला माझा मनोदय होता. तथापि लोकसेवेचे ते एक माध्यम आहे हे माझ्या वरिष्ठांनी बिंबवून मला नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उतरविले. कार्यकर्त्यांच्या बळावर मी निवडून आलो. महापौर झालो. आमदार झालो. मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. पुन्हा निवडून आलो. बहुमत असतांनाही राजकीय गणितांच्या गोळा बेरिजेमध्ये निराशा घ्यावी लागली. मला प्रत्येक क्षणी श्रद्ध्येय अटल बिहारी बाजपेयी यांचे हार नही मानुंगा हे शब्द प्रेरणा देत राहि
नागपूर : अत्यंत आवाहनात्मक अशा काळात सुमतीताईंनी खुप संघर्ष केला. अनेक लोक आंदोलने केली. त्यांच्या त्यांच्या सोबत अनेक घटकातील कार्यकर्त्यांनी संघर्षाची बीजे घेऊन समाजात विश्वासार्हता निर्माण केली. ताईंच्या संघर्षाच्या समृध्द वारसेवरच आम्हाला यश प्राप्त करणे शक्य झाले. त्याकाळात ताईंसह अनेक निस्वार्थ कार्यकर्त्यांनी रचलेल्या पायावर आम्हाला कळसापर्यंत पोहचता आले या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. सुमतीताई या केवळ लढवय्या ताई नव्हत्या तर त्यांना लोकमात
(CM Devendra Fadnavis) राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दि. ११ ते १२ डिसेंबर दरम्यान पहिला दिल्ली दौरा केला. या दौऱ्यावर असताना त्यांनी दिल्लीतील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या आहेत. या भेटीत त्यांनी निरनिराळ्या मूर्ती देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले आहे.
गोध्रामधील साबरमती एक्सप्रेसमध्ये २००२ साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आदी अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, हा चित्रपट पंतप्रधानांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत पाहिला असून चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता विक
नागपूर : भाजपसह महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश राज्य व केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या यशस्वी अमलबजावणीसह कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फलित असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी दिली. गडकरी म्हणाले, ’भाजप-महायुतीला आजपर्यंतच्या इतिहासात मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपवर संविधान बदलाचे खोटे आरोप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला. या सर्व आरोपांना शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेने जातीपातीच्या राजकारणाकडे द
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचाराचा झंझावात केला. एकूण ६४ ठिकाणी त्यांच्या रॅली, रोड शो आणि सभा झाल्या. यातील दिवाळीनंतर झालेल्या ५० वर सभा त्यांनी अवघ्या १३ दिवसांत केल्या. म्हणजे सरासरी चार सभा त्यांनी दररोज घेतल्या. सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये त्यांनी शेवटची सभा घेतली आणि प्रचाराची सांगता केली.
ठाणे : साठ वर्षात काँग्रेस करू शकले नाही ते दहा वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने करून दाखवले.तेव्हा, विकास कामे करण्याकरीता पैशांची नाही तर इमानदार नेत्यांची गरज आहे. असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी करून उपहारगृहात चवीसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी चांगल्या डॉक्टरांकडे जाताना जात पाहत नाही, मग निवडणूकीत आपण जात का बघतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
डोंबिवली : “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांसह सर्वच मोठे नेते हे देशाच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. राष्ट्र पुढे नेण्यासाठी आपल्या सारख्यांचे हजारो हात गरजेचे असून सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान करावे,” असे आवाहन मंत्री रविंद्र चव्हाण ( Ravindra chavan ) यांनी केले. त्यावर कर्तव्यनिष्ठ, कार्यतत्पर चव्हाण अशा शब्दात त्यांचा गौरव करून शहरातील बुद्धिवंतांनी त्यांचे समर्थन केले.
देशाचे महान सुपुत्र रतनजी टाटा यांच्या निधनाची वार्ता कळल्यावर मी स्तब्ध झालो आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात कुठलेही विघ्न येऊ नये, याची खबरदारी घेण्याबरोबरच गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा मार्गार्वरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय रस्ते, परिवहन आणि राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवार, दि. ८ ऑगस्ट रोजी मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांना दिले. मुंबई गोवा राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या १० वर्षांपासून सुरु आहे.
संजय राऊतांनी प्रसिद्धीसाठी वायफळ बडबड करु नये, अशी टीका काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी केली आहे. संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूर लोकसभा निवडणूकीबद्दल विधान केलं होतं. यावर आता नागपूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी त्यांचा जोरदार समाचार घेतला आहे. याबाबत त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
'मी पंतप्रधान होणार नाही पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील कृपया असे विचारून अडचणीत आणू नका असे हलक्याफुलक्या अंदाजात प्रश्नाचे उत्तर देत गडकरींनी यांनी हे स्पष्ट केले आहे. उपस्थिताने तुम्हाला पंतप्रधान पदी पहायचे आहे या प्रश्नाला उत्तर देताना हे विधान गडकरींनी केले आहे.आज बीडीबी (भारत डायमंड बोर्स) मुंबई येथे 'भारत तिसरी अर्थव्यवस्था के दहलीज पर' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताची अर्थव्यवस्था व डायमंड व्यापारी यांचे चर्चासत्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमा
देशाच्या विकास, समृद्धी आणि संपन्नतेचं आमचं व्हिजन
देशाच्या संविधानाचा पाया कुणालाही मुळीच बदलता येणार नाही, याबद्दल दुमत नाही आणि बदलाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु विरोधक याचा अपप्रचार करीत आहेत आणि बऱ्यापैकी ते लोकांमध्ये भ्रम निर्माण करीत आहेत. यासाठी आम्ही लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत, हा विरोधकांचा विखारी प्रचार सुरू आहे असे वक्तव्य राज्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. रवींद्र चव्हाण यांनी आज मंगळवार १४ मे रोजी दुपारी रिजन्सी बँक्वेट हॉल, नालासोपारा (पूर्व) येथे पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "नितीन गडकरींनी आमच्याकडे यावे. आम्ही त्यांना निवडून आणू" उद्धव ठाकरेंच्या याच प्रस्तावावर उत्तर देताना गडकरींनी ठाकरेंना चांगलेच फैलावर घेतले आहे.
"दत्ताजी डिडोळकर हे अखंड भारतीय दृष्टीचे स्वामी होते. त्यांच्या कामात सर्जनशीलता होती. समाजाला जोडणारी आणि सकारात्मक विचारांची ती व्यक्ती होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून आपण अनेक गोष्टी शिकलो, ज्याचा आपल्या जीवनावर परिणाम झाला. तरुणपणापासूनच अशा भावना आपल्या मनात रुजवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.", असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा.प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. (Dattaji Didolkar RSS)
महिला दिनाच्या निमित्ताने येत्या ८ मार्चला प्रदर्शित होऊ घातलेल्या 'तेरव' बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत आणि आपल्या समस्या मांडल्या जायला हव्यात, असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले.
सध्या नागपूरचा विकास झपाट्याने होत आहे. अशा स्थितीत आऊटर रिंगरोड हा नागपूरच्या वाढत्या वाहतूक व्यवस्थेसाठी 'लाइफलाइन' ठरणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. रविवारी नागपुरातील बहुप्रतिक्षित 'फोर लेन आऊटर रिंग रोड/बायपास' प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
भाजपतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी ४ ते ११ फेब्रुवारी या काळात 'गाव चलो अभियान' राबविण्यात येणार आहे. यामध्ये भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शुक्रवारी भाजपच्या मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्रातील ८१ महत्त्वाच्या रस्त्यांसाठी लवकरच १ हजार ६०० कोटी रुपये मंजूर करण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी दिली. तसेच राज्यात पर्यटन वृद्धी होऊन रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी रोप वे करीता निश्चित केलेल्या ४० ठिकाणांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेसची वेगळी भूमिका असून त्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर पत्रकार परिषदेत प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता त्यावर संजय राऊतांनी भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होत असते. दोघांमध्ये उत्तम संवाद आहे. जागा वाटपाच्या विषयात कुठलीही अडचण नाही. भविष्यात गरज पडली तर नक्कीच दिल्ली जाऊ, काँग्रेसचा जो काही विषय असेल तो आम्ही दिल्लीत जाऊन सोडवू असं विधान दि. २ जानेवारी रोजी ठाक
मोहन यादव लवकरच मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नेड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेक नेते शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
उसाच्या रसापासून तयार करण्यात येणार्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे एकीकडे केंद्र सरकार इथेनॉल निर्मितीला चालना देत असताना, सरकारने अशाप्रकारची बंदी का घातली? असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच. त्यानिमित्ताने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा केलेला हा प्रयत्न...
युवक-युवतींना बेरोजगारीतून मुक्त करुन त्यांना आत्मनिर्भर करण्याची सर्वात मोठी लढाई महाराष्ट्रासमोर असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत अधिसूचनेनुसार सल्लागार, संयुक्त सल्लागार ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’ हा महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांना जोडणारा महामार्ग असला तरी त्याची ओळख तशी सर्वदूर. एकविसाव्या शतकात भारताच्या प्रगतीचा हा एक महत्त्वाचा प्रारंभबिंदू मानला जातो. या द्रुतगती मार्गाच्या निर्मितीशी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव तर अगदी घट्ट जोडले गेले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक पदांच्या एकूण ६२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
देशात २०७० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे पंतप्रधानांचे ध्येय साध्य करण्यासाठी बांधकाम क्षेत्रात हरित उपक्रम राबवले जातील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.
ऑटो स्क्रॅप सेंटर उभारण्यासाठी गुंतवणूक आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना केले आहे. स्वयंचलित पद्धतीने चालणारी टेस्टिंग सेंटर व वाहन स्क्रॅप सुविधेसाठी ही गुंतवणूक आवश्यक असून यात वाहन स्क्रॅप करण्यात येणाऱ्या वाहनमालकाला किंमतीत सूट द्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या स्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेत एका बैठकीतून आढावा घेतला. नागपूर पूरग्र्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या क्षतीसाठी ५० हजारांपर्यंत मदत, टपरीधारकांना १० हजारापर्यंत मदत, तर गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देणार, अशा घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर केल्या.
डिझेल वाहनांवर कर लावण्याचा भारत सरकारचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर गोंधळ उडाला होता, ज्याबद्दल त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. नितीन गडकरी यांनी एका ट्विटद्वारे म्हटले आहे की, मीडिया रिपोर्ट्सवर तात्काळ स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे ज्यामध्ये डिझेल वाहनांच्या विक्रीवर 10% कर लावण्याची चर्चा आहे.
इथेनॉलवर चालणार्या चारचाकी वाहनाचे कालच नवी दिल्ली येथे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यानिमित्ताने इथेनॉल म्हणजे काय, ते अर्थकारणाची चक्रे कशी बदलेल, शेतकर्यांचे उत्पादन कशा प्रकारे वाढेल याचा आढावा घ्यायलाच हवा. नवीकरणीय ऊर्जेला भारत सरकार प्राधान्य देत असून, शून्य उत्सर्जन साधण्यासही त्याची मदत होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी टोयोटा कंपनीच्या चारचाकी वाहनाचे लोकार्पण करणार आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) जगातील पहिल्या बीएस ६ (स्टेज२) इलेक्ट्रीफाईड फ्लेक्स इंधन वाहनाच्या प्रोटोटाइपची निर्मिती केली आहे.
नागपुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला बळ द्या, असं उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावरुन, उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या विचासरणीचा विसर पडलेला पुन्हा एकदा दिसत आहे. बाळासाहेब म्हणाले होते, "मी माझं दुकान बंद करेन पण, काँग्रेससोबत कधीच जाणार नाही." मात्र ठाकरेंनी .याउलटचं केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मतदार संघात जाऊन काँग्रेसला बळ द्या. असं विधान त्यांनी केलं आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मंगळवारी २२ ऑगस्टला बहुप्रतिक्षित ‘भारत न्यू कार असेसमेंट पॉलिसी’ (भारत एनसीएपी) सुरू करणार आहेत. यामुळे भारतात ३.५ टनांपर्यंतच्या मोटर वाहनांचे सुरक्षा मानक वाढवून रस्ता सुरक्षेत वाढ करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
'कॅग'च्या अहवालामुळे देशभरात एकच खळबळ माजल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारित येणाऱ्या रस्ते वाहतूक महामार्गाच्या बांधणीच्या खर्चाचे आकडे लेखापरीक्षण विभागाकडून सांगण्यात आले. परंतु, कॅगच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या आरोपांचे खंडन केले असून त्यांच्या आरोपांवर स्पष्टता दिली आहे.
देशातील अभियात्रिकी चमत्कार असलेल्या द्वारका द्रुतगती महामार्गाच्या बांधणीत १२ टक्के पैशांची बचत झाली आहे. त्यामुळे या महामार्गाच्या बांधणीत भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध करून दाखवा, असे आव्हान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षांना दिले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात कागदावर धावणारी मेट्रो प्रत्यक्षात उतरविण्याचे काम केंद्र आणि राज्यामधील भाजपच्या सत्ताकाळात झाले. केवळ टीका आणि राजकीय कुरघोड्यांमध्ये व्यस्त असलेल्या आघाडीच्या सत्ताकाळात पुण्यात मेट्रो उन्नत (एलेव्हेटेड) करायची की भूमिगत (अंडरग्राऊंड) यावरच अनेक वर्षे खल सुरू होता. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती.
देशभरातील १०० शहरांमध्ये पर्यावरणपूरक ई बस वाहतुकीस चालना देण्यासाठी पंतप्रधान ई बस सेवेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याअंतर्गत ५७ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून १० हजार ई बस विविध शहरांमध्ये धावणार आहेत.
अटलजींनी आपले अवघे आयुष्य राष्ट्राप्रती समर्पित होते. सार्वजनिक जीवनामध्ये त्यांन सदैव राष्ट्रवादालाच सर्वोच्च प्राधान्य दिले, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितन गडकरी यांनी केले.
विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे अनेक विद्वानांचे, कलाकारांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि उद्योजकांचे शहर आहे. पुण्याची क्षमता अफाट आहे. सध्याच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या काळात पुणे शहराने देशामध्ये आघाडीवर असणे अपेक्षित आहे. २०४७ साली भारत स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करत असताना विकसित देश झालेला असेल, त्यावेळी त्या विकसित देशामध्ये पुणे हे अग्रेसर शहर असले पाहिजे, असा माझा आग्रह आहे.
आगामी काही वर्षातच आपल्या देशाच्या विकासाचा केंद्रबिंदु पुणे असणार आहे. पुण्याची ओळख रोजगार देणारे शहर अशी आहे. महाराष्ट्रामधील सर्वात वेगाने विकसीत होणारे पुणे शहर आहे. त्यामुळे या शहराला २४ तास पाणी, वीज आणि उत्तम रस्ते व इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे. भविष्यात पुणे शहर ही ऑटोमोबाईलची मोठी बाजारपेठ बनणार आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे पुण्यात ५० हजार कोटींचे पूल उभारण्यात येतील. तसेच पुणे-बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.