गीता केवळ श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले शाब्दिक तत्त्वज्ञान नसून, जीवनातील अनंत गूढ तत्त्वांचे ज्ञान प्राप्त करून, प्रत्यक्ष जीवन जगण्याचे एक महान दिव्य शास्त्र आहे. यादृष्टीने हे महनीय शास्त्र जगासमोर आल्यास, सर्व जगच या महान ग्रंथाकडे मानवी जीवनाकरिता एक आवश्यक संहिता म्हणून बघेल. यामुळे भगवद्गीता केवळ हिंदूंचा धार्मिक ग्रंथ न राहता, अखिल विश्वाचा जीवन ग्रंथ बनेल.
Read More
शालेय अभ्यासक्रमात कोणत्याही धर्माचे शिक्षण दिले जाणार नाही, तसेच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे आवश्यक आहे, अशी भूमिका घेत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करणार नसल्याचे सांगितले आहे. भगवद्गीतेचा समावेश हा शालेय अभ्यासक्रमात करावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र भाजपची ही मागणी फेटाळून लावत 'केवळ राजकारणासाठी अशी मागणी केली जात आहे' अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.