स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत 50 हजार रूपयांच्या वैविध्यपूर्ण चलनी नोटांचा संग्रह करणारे रणछोडदास भुतडा यांच्याविषयी.....
Read More
देशांतर्गत तरलता कायम ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ‘चलन स्वॅप’चा प्रभावीपणे वापर करते. यातूनच महागाईचा धोका कमी करणे, तसेच स्थानिक चलनावरील दबाव कमी करणे मध्यवर्ती बँकेला सहज शक्य होते. ही प्रणाली कशी काम करते, ते म्हणूनच समजावून घ्यावे लागेल.
इतिहासातील साधने ही अभ्यासाच्या दृष्टीने ( Pune Currency ) फार महत्त्वाची, इतिहाच्या साधनांमुळे त्याकाळातील अनेक घटकांचे पुरावेच अभ्यासकासमोर येत असतात. त्यातूनच काळाचा पट अभ्यासकासमोर उभा राहून, त्यातून सत्य समोर येत असते. अशा इतिहासाच्या साधनांमध्ये नाण्यांचे महत्त्व फार. मराठ्यांच्या इतिहासाचे मुख्य केंद्र असलेल्या पुण्यातील नाण्यांचा घेतलेला हा आढावा...
ढाका : बांगलादेशातून शेख हसीना यांना हद्दपार करुन मोहम्मद यूनुस ( Unus ) सरकारचा मोर्चा आता राष्ट्रपिता मुजीबुर रहमान यांच्याकडे वळलेला दिसून येतोय. राष्ट्रपिता मुजीबुर रहमान यांच्या सर्व निशाण्या मिटवण्याकडे यूनुस सरकारचा कल आहे. इस्लामी कट्टरपंथी आणि पाकिस्तानच्या विचारधारेवर चालत यूनुस सरकारने आता बांग्लादेश चलनावरुन बंगबंधु मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी जुलै महिन्यातील सत्तापालटाची छायाचित्रे नोटांवर छापली जातील. याआधीही बंगबंधु यांचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न
भारतावर अवलंबून राहण्याची मालदीवला गरज नसल्याचे सांगत सत्तेवर आलेल्या मोईज्जू यांनी, काही दिवसांतच वक्तव्यावरून घुमजाव करत भारताला भेट देत, मदतीचा हात मागितला आहे. भारताने देखील मोठ्या मनाने मोईज्जू यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारत आणि मालदीव यांच्यातील स्नेह आणि त्यामागील राजकारण याचा आढावा घेणारा हा लेख...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवारी २००० रुपयांच्या ९७.८२ टक्के नोटा बँकिंग प्रणालीत पुन्हा आल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे. उर्वरित ७७५५ नोटा अजूनही लोकांकडे असल्याचे बँकेने म्हटले. १९ मे २०२३ मध्ये २००० रुपयांच्या ३.५६ लाख नोटा अस्तित्वात होत्या. प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे, ३१ मे २०२४ पर्यंत २००० नोटा घटत ७७५५ नोटा उरल्या होत्या.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या ९७.७६ टक्के नोटा परत आल्याचे म्हटले आहे. २००० रुपयांच्या ९७.७६ टक्के नोटा परत आल्या असताना ७९६१ कोटी किंमतीच्या नोटा अजून लोकांकडे असल्याचे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. १९ मे २०२३ ला आरबीआयने २००० नोटा रद्द केल्याचे सांगत लोकांकडून त्या परत मागितल्या होत्या त्यातल्या बहुतांश नोटा आरबीआयकडे परत आल्या असल्या तरी काही नोटा लोकांकडे शिल्लक आहेत.
रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने सोमवारी सांगितल्याप्रमाणे, चलनातील २००० रुपयांच्या ९७.६९ टक्के नोटा परत मिळाल्या आहेत. राहिलेल्या ८२०२ कोटी रुपये मूल्यांकनाच्या नोटा या लोकांकडे असल्याचे आरबीआयच्या (RBI) वतीने सांगण्यात आले आहे. १९ मे २०२३ मध्ये अभिसरणातील (Circulation) मधील २००० रुपयांच्या नोटा सरकारने पुन्हा मागितल्या होत्या.
बिटकॉईनमध्ये विक्रमी वाढ होत नव्या उच्चांकाला बिटकॉईन पोहोचले आहे. या उलथापालथीच्या काळात क्रिप्टो करन्सी (Crypto Currency)वरील विश्वास वृद्धींगत होताना दिसत आहे. जागतिक पातळीवर बिटकॉईनमध्ये वाढलेली समाजमान्यता पाहता परदेशातही मोठ्या प्रमाणात बिटकॉईनमध्ये व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार व इथेरेयुम (Ethereum) मधील विकसितता यामुळे बाजारात यांचा परिणाम होत बिटकॉईनमध्ये विक्रमी वाढ होत त्यांचे मूल्य ७०००० डॉलरवर पोहोचला आहे..
आरबीआयच्या माहितीनुसार चलन अभिसरणात (सरक्युलेशन) घट झाली आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत ही चलनाची घट ८.२ टक्क्यांवरून ३.७ टक्क्याने झाली आहे. गेल्या वर्षी चलन अभिसरणतील ही घट गेल्या वर्षी आरबीआयच्या २००० रुपयांच्या नोटा परत घेतल्यामुळे झाली असल्याचा आरबीआयच्या निष्कर्षात स्पष्ट झाला आहे. करन्सी इन सरक्यूलेशन (सीआयसी ) म्हणजे बाजारात उपलब्ध असलेला चलनाचा पुरवठा होय. व चलन म्हणजे बाजारातील पुरवठा वजा आरबीआयकडे असणारे चलन असते.
मनी लॉण्डरिंगची शक्यता, ‘केवायसी’ नियमांचे न होणारे पालन, यांसारख्या कारणावरून आभासी चलनासंबंधित (क्रिप्टो करन्सी) काही अॅप्स केंद्र सरकारच्या आदेशान्वये भारतातून ‘गूगल’ने नुकतीच हद्दपार केली. नवीन वापरकर्त्यांसाठी ती उपलब्ध होणार नसली, तरी जुने वापरकर्ते ती वापरू शकणार आहेत. तेव्हा, या निर्णयाच्या दूरगामी परिणामांचे आकलन करणारा हा लेख...
रिझर्व्ह बँक इतर बँका, व सुविधा पुरवणाऱ्या वित्तीय संस्थांसोबत डिजिटल करन्सी साठी पुढाकार घेत काम करत आहे.सेंट्रल बँकेची ( CBDC) सेंट्रल बँक डिजीटल करन्सीला लोकप्रिय बनवण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना असेल.असे रॉयटर्स वृत्तसंस्थेला सेंट्रल बँकेच्या सुत्रांनी माहिती दिली आहे.
क्रिप्टो वर सरसगट बंदी घालणे हा महागडा व अव्यवहार्य असल्याचा दावा International Monetary Fund (IMF) ने केला एका Synthesis पेपरमध्ये केला आहे. या सल्याचा दाखला देत क्रिप्टो करन्सीवर बंदी घालण्यापेक्षा एक विस्तृत नियमावली बनवायला हवी असे मत क्रिप्टो ट्रेडर्सने मांडले आहे. गुरूवारी हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून आठवड्याच्या शेवटपर्यंत G २० च्या सगळ्या सदस्यांना हा रिपोर्ट प्रस्तुत केला जाईल.
२०१६ मधल्या नोटबंदी व नवीन नोटा वापरात आल्यानंतर १९ मे २०२३ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने २००० चा नोटा पुन्हा बँकेत जमा करण्याचा सर्व बँकांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार २००० पैकी ९३ टक्के नोटा बँकेत परतल्याचा अहवाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितला आहे.
२००३ साली मुद्रांक घोटाळ्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत हादरे बसले. बनावट मुद्रांक पेपर केसमध्ये अब्दुल करीम तेलगी याला बंगलोर येथे अटक करण्यात आली. याने त्यांचे पाठीराखेच नाही पोलीस, मंत्री, प्रशासन यांच्यातील 'कर्ता धर्ता ' व्यथित झाले. १९९६ ते २००३ या काळात जवळपास ३०० बिलियन डॉलरचा घोटाळा केला. तेलगीचे साथीदार आणि स्वतः तेलगी यांना गंभीर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून ३० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. यावेळी तेलगीला न्यायालयाकडून २०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
डिजिटल इंडिया या संकल्पनेला शासनाचा प्रयत्न गेले काही वर्षे सुरू आहे.कागदी करन्सी पेक्षा डिजिटल पेमेंट साठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रति देयक मर्यादा २०० रुपयेंवरून ५०० रुपये प्रस्ताव ठेवला आहे. आणि भविष्यातही डिजिटल पेमेंटस वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आरबीआयने ठरवले आहेत.नुकतीच एमपीसी बैठकीचा निकाल गव्हर्नर शशिकांता दास यांनी घोषित केला.रेपो रेट तसाच ठेवण्याव्यतिरिक्त देखील डिजिटल पेमेंट सिस्टीमला वाव मिळावा यासाठी प्रयत्न म्हणून २०० चे लिमिट ५०० रुपये करण्यात आले आहे.
मुंबईत २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ५५४० रुपये जो काल ५५२५ रुपये प्रति ग्रॅम होता.२४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ६०४४ आहे जो काल ६०२८ रुपये प्रति ग्रॅम होता.२२ कॅरेट सोन्याची किंमत १५ रुपये व २४ कॅरेट साठी १६ रुपये प्रति ग्रॅम भाववाढ झाली आहे.
‘व्हर्च्युअल डिजिटल असेट’ (व्हीडीए) मालमत्ता (क्रिप्टो मालमत्ता) साठी अपेक्षित असलेल्या नियामक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी ‘जी ७’ राष्ट्रे अलीकडेच त्यांच्या शिखर परिषदेपूर्वी एकत्र आली होती. इतर घटकांसह हे राष्ट्रांसाठी अजेंडाच्या शीर्षस्थानी आहे. कारण, ते ‘व्हीडीए’साठी त्यांच्या देशांतर्गत धोरणांवर वेगाने काम करत आहेत. ‘जी २०’ गटाप्रमाणेच राष्ट्रांनी एकत्रितपणे आर्थिक स्थिरता मंडळाने निर्धारित केलेल्या मानकांशी त्यांचे नियम संरेखित करण्यासाठीचा निर्णय घेतला आहे. त्याविषयी सविस्तर...
दोन हजाराची नोट बंद झाल्यामुळे आता पाचशे आणि हजाराच्या नोटांची मागणी बाजारात वाढणार आहे. त्यामुळेच नाशिकरोडमधील करन्सी नोट प्रेसमध्ये पाचशे आणि हजाराच्या नोटांची अधिक छपाई करण्यात येणार आहे. पाचशेच्या १९७५ दशलक्ष नोटा छापण्याचे टार्गट करन्सी नोट प्रेसला देण्यात आलेले आहे. तसेच नाशिकसह देवास येथील प्रेसला तीनशे ते चारशे दशलक्ष ५०० रुपयांच्या नोटा छापण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सोन्याची आवड तशी भारतीयांना मूलतःच! अगदी काही हजार वर्षांपूर्वीची शिल्पे बघितली, तरी ती दागदागिन्यांनी मढवलेली. कोणाचं बारसं, मुंज असेल, तर हमखास छोटंसं सोन्याचं वळं भेट दिलं जायचं. सोन्याचे दागिने हे सर्वमान्य, स्वीकार्ह, पण देशांनी केलेला सोन्याच्या साठ्याच्या महत्त्वाबद्दल कुतूहलमिश्रित आश्चर्य! या सोन्याचा अर्थव्यवस्थेला काय फायदा, असा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न. सोनं जितकं जास्त तो देश तितका श्रीमंत, हे अगदी पूर्वीपासूनच आहे. यात भारत एकेकाळी अव्वल होता. तेव्हा, सोने, चलन आणि वैश्विक अर्थकारण यांचा आ
तैवान मुद्द्यावरून महासत्तांमध्ये भविष्यात उद्भवू शकणार्या संघर्षात युरोपने का सहभागी व्हावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकताच तीन दिवसांचा चीनचा दौरा केला. त्याचा केलेला ऊहापोह...
२० फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळ आणि सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांकडून सुमारे ८.३६ कोटी भारतीय रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. तसेच भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाकडून अमेरिकन डॉलर हे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी दरम्यान जप्त करण्यात आले आहे.
भारतीय रिझर्व बँकेतर्फे आजपासून रिटेल ग्राहकांसाठी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडिसी) अर्थात डिजिटल रुपयाचा पायलट प्रोजेक्ट सुरु होणार आहे. सध्या हे डिजिटल चलन दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि भुवनेश्वरमध्ये वापरता येणार आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यात देशातील ९ शहरांमध्ये त्याचा वापर करता येणार आहे. यापूर्वी १ नोव्हेबर २०२२ रोजी होलसेल प्रकारामध्ये डिजिटल रुपयाचा पायलट प्रोजेक्ट सुरु केला होता.
समाज माध्यमे, डार्क वेब, क्रिप्टो करन्सीचा दहशतवादी गटांकडून होणारा गैरवापर आणि त्याविषयी जागतिक एकमत नसणे, हे मुद्दे भारत नो मनी फॉर टेरर या जागतिक परिषदेमध्ये मांडणार आहे. नवी दिल्ली येथे १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी ही परिषद होणार आहे.
भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था ठरला. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ३ ट्रिलियन डॉलर्सपेक्षाही मोठा झाला आहे. ब्रिटनला मागे टाकत आता भारताने ही झेप घेतली. जागतिक स्तरावर आपले स्थान भक्कम कारण्याबरोबरच भारताने अजून मोठी उंची गाठण्याकडे दमदार वाटचाल सुरु केली आहे
आज रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत १ डॉलर = ७९.७५ रुपये इतकी आहे. काही महिन्यांपूर्वी ७२ रुपये प्रती डॉलर असणारा रुपया काहीसा घसरला आहे. रशिया-युक्रेन युद्धपरिस्थिती, वाढता जागतिक महागाई दर, काही देशांमध्ये आलेलं अन्नसंकट या सगळ्यामुळे रशिया सोडला, तर इतर बहुतेक देशांच्या चलनात डॉलरच्या तुलनेत घसरण झाली आहे. काही चलनांच्या तुलनेत रुपया वधारला. २०२१ मध्ये एक युरोची किंमत ८७ रुपये होती. ती आता ८० रुपये आहे. २०२१ मध्ये एक पौंडाची किंमत १०१ रुपये होती ती आता ९४ रुपये आहे. २०२१ मध्ये एक फ्रेंच फ्रँकची किंमत १३.६ र
जागतिक पातळीवर सातत्याने महागाई वाढत असताना भारतीय अर्थव्यवस्था त्यापासून लांब राहू शकत नाही. रिझर्व्ह बँकेने नेमके याचीच जाणीव आपल्या पतधोरण बैठकीत करून दिली.
जागतिक आर्थिक असंतुलनाचे महत्त्वाचे कारण म्हणजे, कृत्रिमरित्या ठरवलेला चलनदर. जे देश मोठ्या प्रमाणावर निर्यात करतात, ते सर्वसाधारणपणे स्वत:च्या चलनाचे अवमूल्यन करतात. त्यामुळे त्या देशांना डॉलर्स मोठ्या प्रमाणात मिळतात. ज्या देशांची निर्यात जास्त आहे, असे देश हे प्रगतिशील आहेत. (यात आशियाई देश जास्त आहेत.) या देशात सर्वसामान्य नागरिकांकडून बचतीचे प्रमाण जास्त आहे. ही बचत देशाअंतर्गत गुंतवली जाते. त्यामुळे उद्योगधंद्यांची वाढ होते आणि त्याचाच परिणाम म्हणजे उत्पादनवाढीमुळे निर्यातवाढ होते.
जेव्हा जेव्हा डॉलरला धक्का बसेल, अशी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा तेव्हा अमेरिकेने लष्करी सामर्थ्याचा वापर केलेला आहे.
आधुनिक काळात सार्वभौम व्यवस्थेने लागू केलेले (केंद्रीय म्हणजेच रिझर्व्ह बँक हे त्या सार्वभौम व्यवस्थेचे प्रतीक) चलन हेच अधिकृत चलन या व्याख्येत बसते, हे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. हे डिजिटल सार्वभौम चलन असेल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्प सादरीकरणात ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित ‘डिजिटल रुपया’ची घोषणा केली. तेव्हा, नेमके या ‘डिजिटल’ चलनाचे स्वरुप कसे असेल, ‘बिटकॉईन’, ‘क्रिप्टोकरन्सी’पेक्षा हे सरकारी डिजिटल चलन वेगळे आणि फायदेशीर कसे ठरेल, याचा या लेखातून घेतलेला आढावा...
" बिटकॉइन , इथेरियम किंवा एनएफटी सारख्या क्रिप्टोकरन्सीला भविष्यात कधीही अधिकृत चलनाचा दर्जा मिळणार नाही " असे केंद्रीय मुख्य अर्थसचिव टी. व्ही. सोमनाथन यांनी स्पष्ट केले आहे
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यात आभासी चालनाबद्दल महत्वपूर्ण घोषणा केल्या
फाईव्ह जी तंत्रज्ञान आणि एकविसाव्या शतकातील डिजिटल विश्वाला साजेसा, असा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केला.
‘व्हर्च्युअल’ चलनाला ‘आधुनिक काळातील महामारी’ म्हटले जाते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, ही चलने आभासी आहेत, सरकारी नियंत्रणाबाहेर आहेत आणि त्यांच्या किमती अतिशय धोकादायकपणे चढतात आणि गडगडतातही! कोरोना काळात ज्या आभासी नियमांबद्दल कायम चर्चा होत असते, त्या चर्चेचे एक केंद्र म्हणजे ‘बिटकॉईन’सारखे ‘डिजिटल’ चलन, ज्याला ‘आभासी चलन’ असेही म्हटले जाते. आजकाल जगभरात गुंतवणुकीसाठी आभासी (क्रिप्टोकरन्सी)चा पुरस्कार काही देशांनी केलेला दिसतो.
अनिवासी भारतीयांना आंतरराष्ट्रीय चलन बाजारपेठेत भारतीय रुपयाचे मूल्य विचारात घेता , त्यांच्याकडे भारतात गुंतवणुकीसाठी भरपूर पैसा उपलब्ध असतो. जर तुम्हाला योग्य दरात चांगली सदनिका मिळत असेल , तर सदनिका विक्रेता अनिवासी भारतीय आहे की भारतीय आहे, याचा विचार करू नका. पण , अनिवासी भारतीयांकडून कुठलीही मालमत्ता खरेदी करताना तुम्हाला विशेष दक्ष राहावे लागते आणि खास काळजी घ्यावी लागते .
बिटकॉईनसारख्या आभासी चलनांवरील बंदी उठवावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी देताना या चलनावरील बंदी उठवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आपले मत मांडले आहे. आभासी चलनाद्वारे व्यवहार करण्यास परवानगी देण्यात येईल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
‘या’ बँकेच्या एटीममधून २००० हजाराच्या नोटा होणार गायब
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीमधील एकूण १२ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत.
पाकिस्तानमधील आयातदार आणि निर्यातदार मोठ्या संख्येने अधिकाधिक डॉलर खिशात टाकण्याच्या स्पर्धेत उतरले असून यामध्ये पाकिस्तानी सेना आणि सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचीही भूमिका संशयास्पद असल्याचे समजते. पण, याचा भुर्दंड मात्र सामान्य पाकिस्तानी नागरिकांना सोसावा लागत आहे.
आशियामधील इतर १३ चलनांच्या तुलनेत पाकिस्तानच्या चलनाने न्यूनतम पातळी गाठली आहे. तब्बल २० टक्के घसरण झाल्याचे समोर आले आहे
परकीय चलनाची देशाबाहेर तस्करी केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान यांना ईडीने नोटीस बजावली आहे.
सध्या छोटंसं घर घेणंही सर्वांच्या आवाक्यात राहिलंय, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरेल. अनेक वर्षांची मेहनत, साठवलेला पैसा पदरी असूनही आज मोठ्या शहरांमध्ये घर घेणं सहजशक्य नाही.
आजच्या काळात युद्ध ही फक्त रणांगणावरच नाही तर व्यापारी वर्तुळातही खेळली जातात आणि अशा व्यापारी युद्धांमध्ये योग्य क्षणी योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त ठरते. ‘करन्सी स्वॅप’च्या या कराराबाबतही हेच म्हणता येईल.
मूर्त्यांची मुद्रा आणि चिह्नसंकेत
जगातील महत्त्वाच्या चलनांकडे नजर टाकल्यास असे दिसते की, डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन केवळ आशियाई देशांपुरते मर्यादित नसून युरो, ब्रिटिश पाऊंड, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियाचा डॉलर ते जपानचा येन अशा महत्त्वाच्या चलनांतही झालेले दिसते.
कर्नाटकातील बेळगाव येथील विश्वेश्वरय्या नगर येथे ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा मध्यरात्री कर्नाटक पोलिसांनी धाड टाकून जप्त केल्या.