गुण आणि कर्म विभागाने माझ्याद्वारे म्हणजे परमशुद्ध बुद्धीद्वारे चातुर्वर्ण्य रचले गेले आहेत. त्यांचा मी कर्ता असलो, तरी मी त्या कर्तृत्वाच्या वर असलेला परमात्मा आहे. चातुर्वर्ण्य ही एक प्राचीन समाजरचना आहे, जिचा वरील श्लोकाद्वारे गीतेत स्पष्ट उल्लेख आला आहे
Read More
आजचे युग हे विज्ञान युग मानले जाते. विज्ञान संशोधनाद्वारे प्रगत होत असते. वैज्ञानिकांना आपल्या मनाच्या एकाग्रतेमुळे अशी संशोधने करणे शक्य झाले आहे. सर्व थोर वैज्ञानिक आधुनिक ऋषीच होत. आपले मन ध्यानाद्वारे एकाग्र करून ऋषी आध्यात्मिक चिंतन करीत आणि त्याद्वारे ज्ञानविज्ञानातील गहन तत्त्वे समाजासमोर ठेवित असत. वेदांमध्ये बरेच ज्ञानविज्ञान साठविले आहे. परंतु, दुर्दैवाने आज वेद म्हणजे केवळ मंत्र मानले जातात. वैदिक परंपरेने केवळ ज्ञानाचा किंवा विज्ञानाचाच एकांगी बडेजाव केला नाही, तर ज्ञानाची पूर्ती होण्याकरिता
धन्यकाम होऊन पांडव मेले असे समजून अश्वत्थामा परत फिरला. परंतु, पांडवीवृत्तीचे अजून काम बाकी होते. त्यांना हस्तिनापूर राज्यावर पुन्हा अधिष्ठित व्हायचे होते. महाभारत संपायचे होते
कथा लिहाव्यात भगवान वेदव्यासांनीच आणि त्या कथांना साजेशी नावेसुद्धा योजून काढावी व्यासांनीच! कथेतील प्रत्येक नावात गहन योगज्ञान आहे, हे व्यासकृपा झाल्याशिवाय लक्षात येणे कठीण आहे. कालयवन म्हणजे प्रत्येक जीवनाला दरक्षण कमी करणारा काळ प्रत्येकाला शत्रूसमान म्हणजे दुष्ट यवन वाटतो, म्हणून मृत्यू जवळ आणणार्या काळाला भगवान वेदव्यास कालयवन म्हणतात. या कालयवनाची जेव्हा जेव्हा भगवान श्रीकृष्णाची गाठ पडायची तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण कालयवनाच्या समोरून दूर पळून जायचे.
यमुना म्हणजे काय व यमुनेचे जल काळेच का सांगितले आहे, याचे रहस्य आम्ही पाहिले आहे. आता त्या काळ्या यमुनेत असणार्या काळ्या कालियाचे रहस्य पाहू.
ज्या खोलीत कृष्णाला पाळण्यात झोपविले होते, त्या खोलीत, शेतकरी आपल्या घराच्या ओट्यावर छकड्याचा मूळ साचा ठेवतात, तसे नंदाघरी आढ्यावर एक छकडा ठेवला होता. छकड्याला संस्कृत भाषेत ‘शकट’ म्हणतात. त्या शकटाला दोर बांधून कृष्णाचा पाळणा बांधला होता. आता कृष्ण बालकाला एकटाच पाहून कंसाचा दूत असलेल्या त्या शकटात एकदम जीव संचारला व त्याने पाळण्यात झोपलेल्या कृष्णाला आपल्या भाराखाली दाबण्याचा प्रयत्न केला.
भगवान गोपालकृष्णांच्या जीवनघटनांद्वारे भगवान वेदव्यास राजयोग्यांचा प्रशस्त मार्ग प्रत्येक आवश्यक अशा कर्मानुसार सांगत आहेत. कृष्णाचा जन्म मध्यरात्रीच का होतो? सर्व जग ज्यावेळेस निद्रेत असते, त्यावेळेस योगी जागृत असतो. गीता सांगते, ‘या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी।’ अशा मध्यरात्रीच्या शांत वेळी योगी आपले चित्त एकाग्र करून विश्वशक्तीचे स्वत:मध्ये कर्षण करीत असतो. ‘कर्षति इति कृष्णः’ योग्याच्या या महान कर्षण अवस्थेलाच वेदव्यास ‘कृष्ण’ म्हणतात. ही कृष्ण अवस्था योग्यांच्या चित्तात मध्यरात्री जन्मास येत
ऊर्जा व शक्तीच्या निरनिराळ्या अवस्थांमुळे साधकाला भिन्न भिन्न अनुभव येतात. लहरी मंद व जड झाल्यास त्या नादरुपाने प्रतीत होतात,
जड-यम नियमांच्याही वर म्हणजे उणे असलेल्या त्या देहातीत कालावस्थेला भगवान वेदव्यास ‘काळ्या पाण्याची यमुना’ (यम+उना) म्हणतात. याच यमुनेवर (सुषुम्नेवर) भगवान गोपालकृष्ण खेळत असतात.
सापेक्षरित्या एकसमयावच्छेदेकरून संघात संभव झाले की, त्यापासून परमाणू तयार होतो. परमाणूपासून अणू, अणूपासून विभिन्न पदार्थ एवं विभिन्न पदार्थांच्या संघातापासून सर्व जग तयार झाले आहे. ओतांच्या साकारण्यामुळेच सर्व जग दृश्यमान होते, म्हणून तेजस तत्त्वाचा गुण आकार मानला आहे. कुंडलिनीजागृत साधकाला बाह्य उत्तेजनाशिवाय स्वत:च्या ठिकाणी दिव्यस्पर्शाचा अनुभव येत असतो.
साधनेद्वारे झालेली गुणाणुरचना, शरीरशुद्धी व चित्तशुद्धीकरिता असल्याने त्यासाठी गुणाणुंची रचना अतिशय शुद्ध म्हणजेच सुसंस्कृत हवी. योगसाधना म्हणजे प्राणायाम, ध्यानधारणा करताना साधकाच्या शरीरातील असली उपयुक्त गुणाणुरचना आपोआप घडत असे. साधकाचा मूळ स्वभावच बदलत असतो
’विद्’ म्हणजे जाणणे. जाणून वागण्याची रीत म्हणजे वैदिक परंपरा होय. ‘जाणणे’ हा मराठी शब्द ’ज्ञान’ या संस्कृत शब्दाचे अपत्य आहे. ‘ज्ञान’ या शब्दाचा उच्चार मराठीत ’द्न्यान’ असा आहे. परंतु, तो चुकीचा आहे. त्याचा खरा उच्चार ‘ज्याँन’ असा आहे. या ‘ज्याँन’ शब्दापासून मराठीत ‘जाणणे’ हा धातू आला आहे. म्हणून ‘जाणणे’ याचा अर्थ ज्ञानप्राप्ती करणे होय. ज्ञानप्राप्ती करणे म्हणजे केवळ पुस्तके वाचणे आहे का? आज जरी आम्ही पुस्तके वाचून ज्ञानी होण्याचा सवंग मार्ग शोधून काढला असला तरी वैदिक परंपरा असल्या बहुवाचकाला ‘बहुश्रुत’ म्
वनवासी समाजाने संघर्षरत राहून हिंदू संस्कृती टिकवली : सरसंघचालक