रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंचा विजय झाला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील अशी मुख्य लढत झाली. दि. ४ जून रोजी झालेल्या मतमोजणीत सकाळपासून रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. सध्या रक्षा खडसे यांना ६ लाख २७ हजार ६७२ मते मिळाली आहेत. तर श्रीराम पाटील यांना ३ लाख ६ हजार ६२४ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे संजय बरामाने हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
Read More