रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंचा विजय झाला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील अशी मुख्य लढत झाली. दि. ४ जून रोजी झालेल्या मतमोजणीत सकाळपासून रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. सध्या रक्षा खडसे यांना ६ लाख २७ हजार ६७२ मते मिळाली आहेत. तर श्रीराम पाटील यांना ३ लाख ६ हजार ६२४ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे संजय बरामाने हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
Read More
निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी महाभकास आघाडीतील उबाठा सेनेतील अस्वस्थता वाढताना दिसते. हिंदू आणि मुस्लीम मतदारांना एकाच वेळी गोंजारण्याचे हे धोरण म्हणजे दोन दगडांवर पाय देण्यासारखे आहे. त्यामुळे यापैकी कोणत्याच मतदाराच्या मनात या पक्षाबद्दल विश्वास निर्माण झालेला नाही. वैयक्तिक सत्ताकांक्षेमुळे उबाठा सेना हा पक्ष ना हिंदूंचा राहिला, ना मुस्लिमांना तो आपला वाटतो. या अविश्वासाची मोठी किंमत या पक्षाला निवडणुकीत चुकवावी लागेल.
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभेची जागा लढवण्याची ईच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता जागा जिंकण्याचं मेरिट काँग्रेसचंच आहे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खडसेंच्या या ईच्छेवर विरजण घातले आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात गुरुवार दि. 30 नोव्हेबर रोजी रावेर लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील व ‘संपर्क से समर्थन’ अभियानात भाग घेत सर्वसामान्य जनतेशी संवाद साधतील.
खान्देशच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. रावेर मतदार संघातून रक्षा खडसे या आघाडीवर असून जळगावमधून उन्मेष पाटील आघाडीवर आहेत. यासोबतच धुळे व नंदुरबारमध्येही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजीव पाटील तर उपसभापतीपदी जि.प.सदस्य कैलास सरोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शासनाने सन 2018-19 या खरीप पणन हंगामातील ज्वारी, मका, बाजरी हे भरडधान्य आधारभुत किंमत योजनेतंर्गत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकुण 20 ठिकाणी भरडधान्य खरेदी केंद्र मंजुर केले आहे. या केंद्रामार्फत चालु हंगामात शासनाच्यावतीने 1 नोव्हेंबर पासून भरडधान्य खरेदी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
रावेर येथून भुसावळ - जळगाव कडे कामकाजानिमित्त ये - जा करणा-या प्रवाशांची होणारी गैरसोय दुर व्हावी यासाठी रेल्वे स्थानकावरुन सुटणा-या सुरत पॅसेंजर गाडीच्या वेळेत २ सप्टेंबर पासुन बदल करण्यात येईल अशी माहिती खा.रक्षा खडसे यांनी माहिती दिली.
रासायनिक खते घेवून जात असलेल्या भरधाव ट्रकने बालिकेस चिरडल्याने 6 वर्षीय बालिकेचा जागीस मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ट्रक चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवासांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये 14.18 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे आठ गेट पूर्ण उघडले असून धरणातून आज 45468 व्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.