ताईला आणि त्या वहिनीलापण खीर द्यायला हवी. त्या काही सख्ख्या पक्क्या नाहीत. पण, स्वार्थ जपण्यासाठी जोडावी लागतात नाती. तर त्या दोघींपैकी एकीलाच ती खीर मिळणार. जसे मी त्या दोघींचे नाव घेतले, तसे माझेपण नाव कोणीतरी घ्यायला हवे.
Read More
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शुक्रवारी २२ डिसेंबरला एका कार्यक्रमादरम्यान एकत्र आले आहेत. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांनी उधाण आल आहे. याच कार्यक्रमाला रश्मी ठाकरेही उपस्थीत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सरकार मध्ये आल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात झाल्या होत्या. परंतु या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याच ही सांगितल जात आहे.
केदारनाथमध्ये उद्धव ठाकरेंसमोर घोषणाबाजी करण्यात आली आहे. बद्रीनाथच्या दर्शनाला उद्धव ठाकरे गेले असताना तेथे शिवसैनिक देखील हजर होते. तर यावेळी बेळगावमधल्या सीमा भागातील काही लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर घोषणाबाजी केली. 'बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!' "उद्धवसाहेब, आदित्यसाहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत!" अशी घोषणाबाजी करण्यात आली.
काही दिवसांपुर्वी 'जी-२०' परिषदेच्यानिमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. त्यावेळी सुनक म्हणाले, हाऊ इज 'यूटी...' मी म्हणालो.'व्हाय...' ('यूटी' म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे) त्यावर सुनक म्हणाले, 'ते' दरवर्षी लंडनला येतात आणि संपत्ती घेतात. थंड हवा खातात आणि भारतात परतात. तुम्ही ब्रिटनला या. तुम्हाला सगळं सांगतो, असं सुनक यांनी मला सांगितलं, हे वाक्य आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच. आणि पुढे ते म्हणाले की, त्यामुळे आमच्यावर टीका करण्याआधी विचार करावा, अन्यथा 'पाटणकर काढा' देण्या
विरोधकांची आघाडी असलेल्या I.N.D.I.A. ची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी होत आहे. मुख्य म्हणजे या बैठकीस अनेक विरोधी पक्षातील नेते हे गैरहजर राहणार असल्याचं कळतंय. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मात्र यावेळी उपस्थित असतील. दरम्यान राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आल्यास रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्रीपद द्यावं, असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी मांडला असल्याचं आमदार नितेश राणेंनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावली आहे. हिंदुजा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. मनोहर जोशी यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले आहेत.
मेट्रो ३ कारशेड आणि १९ बंगला प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गिरे तो भी टांग उपर अशी उध्दव ठाकरेंची स्थिती असल्याचे म्हणटले आहे. ठाकरे परिवार मुंबई मेट्रो रुळावरून खाली आणण्याचा प्रयत्न करत आहे. मेट्रो 3 कारशेड चा मार्ग न्यायालयाने मोकळा केला आहे. असे ही सोमय्या म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेना रोशनी शिंदेच्या कासरवडवली येथील ऑफिसमधुन सुटण्याच्या वेळी तिच्यावर शिंदे गटाच्या २० महिलांनी मारहाण करण्यात आली, असा आरोप करण्यात येत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे पक्षसावरण्यासाठी एक पाऊल पुढे येत असताना, पक्षातील महिला नेत्यांमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे समजते. शिवसेनेतील महिला पदाधिकारी आशा मामेडी यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. मामेडी या शिंदे यांच्या पक्षात जाण्यामागे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील महिला आघाडीतील गटबाजी कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पक्षाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला दिसतो.
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुरकारला आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे सक्रीय झाल्या आहेत. रश्मी वहिनी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दे दोघेही शिंदेंची सकाळपासूनच समजूत काढत आहेत.
श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीची कारवाई
‘मराठी राबडीदेवी’ अशा आशयाचे ट्विट जितेन गजारिया यांनी गुरुवारी केले. त्यावरुन शिवसेनेला चांगलीच मिरची झोंबली. मग काय भाजप ‘आयटी’ सेलचे प्रभारी असलेल्या गजारिया यांना लागलीच ‘सायबर सेल’ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल
रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले.