Lord Shri Ram रामायण ही केवळ कथा नाही, तर तो एक प्रवाह आहे. प्रवाह संस्कृतींना जोडणारा, काळाच्या मर्यादा ओलांडणारा. प्रभू रामचंद्रांची चरणरज भारतभूमीत पडली असली, तरीही त्यांच्या कर्तृत्वाने आणि मर्यादेच्या मोहिनीने सारे विश्वच मोहित झाले. रामनवमीनिमित्ताने ‘रामायणाचा जागतिक वारसा’ या विशेषांकात आपण रामकथेच्या या जागतिक प्रवासाचा वेध घेत आहोत. विशेषांकात रामकथेच्या प्रवासाची सुरुवात भारताच्या सीमेलगतच्या देशांपासून केली असून, मग हा प्रवास आग्नेय आशियाच्या समृद्ध संस्कृतींपर्यंत कसा पोहोचला, त्याचे विविध लेखा
Read More
Ramnavami 2025 वाल्मिकी ऋषींची गेली हजारो वर्षे मानवी मनाला शांत करणारी रसाळ मधुकथा म्हणजेच रामकथा. राम आणि सीतेची ही सुंदर कथा खूप प्राचीन. काळाची पाऊले जशी पुढे पडायला लागली, तशी ही कथा केवळ भारताची राहिली नाही, तर ती देशांच्या सीमा ओलांडून हिमालयापारही गेली. देशोदेशीचे राजकीय संबंध बदलत राहिले, नवीन सामाजिक परिस्थिती आकाराला आली आणि माणसाच्या एकूणच राहणीमान, जीवनमानातील स्थित्यंतरांनी प्रगतीचा आलेख गाठला. पण, या सगळ्या बदलांना तोंड देत, ही मधुर कथा देशविदेशातील विद्वानांच्या आणि रसिकांच्याही मुखात रुळली.
Shree Ram भारत आणि इंडोनेशिया यांचे संबंध केवळ भौगोलिक सीमांपुरते मर्यादित नाहीत, तर ते सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक बंधांनीही घट्ट विणलेले आहेत. निळ्याशार हिंद महासागराच्या लाटांइतक्याच खोल आणि अनंत या दोन्ही देशांच्या परंपरा आहेत. भारतीय संस्कृतीचा सुगंध इंडोनेशियाच्या निसर्गसंपन्न द्वीपसमूहात दरवळतो आणि तेथे रामायणाची गाथा आजही जिवंत आहे. हिंदुस्थानात जन्मलेल्या या महाकाव्याने इंडोनेशियात नवीन अर्थ, नवे रंग स्वरुप धारण केले. स्थानिक लोककला, नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून रामायणाच्या पाऊलखुणा इंडो
Ram Navami 2025 मालदीव... भारताच्या नैऋत्येकडील द्वीपराष्ट्र. ज्याप्रमाणे आग्नेय आशियात रामकथेचा सुगंध तेथील कणाकणांत दरवळलेला दिसतो, तसे चित्र इस्लामिक मालदीवमध्ये नाही. पण, अगदी रामाचे गुरु असलेल्या अगस्ती ऋषींनी मालदीव पादाक्रांत केले होते. एवढेच नाही, तर रामायणातील लंका ही आजची श्रीलंका नसून, श्रीलंकेच्या दक्षिणेला मूळात मालदीवजवळचेच एक द्वीप असल्याचाही दावा केले जातात. त्याचबरोबर मालदीवच्या लोककथांमध्ये राम आणि सीतेशी साधर्म्य साधणारी धोन हियाल आणि अली फुल्हूची कथा आजही गायली जाते. त्याचाचा मागोवा घेण