रामाच्या साहचर्याबरोबर त्याच्या गुणांच्या कथा, आदर्शाच्या कथा करून स्तुतिस्तोमे गायिली, ऐकली अथवा त्यांचे कीर्तन, विवरण केले, तर रामाच्या गुणांचा आदर्शाचा प्रभाव आपल्या मनावर होऊन त्यापैकी थोडेफार का होईना गुण, आदर्श आत्मसात करावेसे वाटू लागतात. त्यातून रामाला आवडेल तसे वागण्याची प्रेरणा निर्माण होते. येथे अर्थातच प्रेमाची प्रीतीची दुसरी अट साध्य होते.
Read More
राम आणि रामनाम यानेच आपली सर्व संकटे दूर होऊन आपण ‘पूर्णकाम’ होऊ. यासाठी सकाळी रामाचे, त्याच्या गुणांचे चिंतन करून आपल्या दिवसाची सुरुवात करावी. रामनाम हे सर्व साधनांचे सार आहे तेव्हा उगीच शंका, संशय न घेता रामनामाची प्रचिती घ्यावी.
स्वतः नाम घेता, नामाच्या विरोधी भूमिका घेऊन इतरांचा बुद्धिभ्रमकरणार्या पापी माणसाला यम दंड देतो. नामाविषयी वाटेल ते तर्कवितर्क करणे म्हणजे आपणहून नरकाचे दरवाजे उघडण्यासारखे आहे. अशा सदाचारी लोकात ’ची ची’ म्हणजे ’छी:थू’ होणारच. यासाठी अत्यंत आदरपूर्वक रामनाम घेत जावे.
बुद्धिवंत हनुमानाने सुचवले की, रामाचे सामर्थ्य अफाट असल्याने त्याच्या नामाचे दगड बुडणार नाहीत. या रामनामाच्या दगडांनी अल्पावधीत सेतू बांधणे शक्य झाले. म्हणून समर्थ म्हणतात की, रामनामाने पाषाण तरले. भगवंताच्या नामाने निश्चितपणे (नेमस्त) पाषाणांना तारले. तसेच अनेक देहधारी पाषाणांना रामनामाने तारले आहे.