चैत्र मासात येणार्या ‘मत्स्यजयंती’च्या दिवशी भगवंतांनी समुद्रात लोप पावणार्या वेदांचे रक्षण करून मानवी सृष्टीच्या पैलतीराला ते नेऊन पोहोचविले. भगवान वेदव्यासांचा ‘पैल’ नावाचा शिष्य होता. व्यासांची माता मत्स्योदरी हीसुद्धा मत्स्याचाच अवतार. याच मत्स्योदरीच्या पोटी वेदव्यासांनी जन्म घेतला. त्यांचे पिता पराशर-परासृष्टीला शर मारून वेध घेणारे ते पराशर. सात वर्षांच्या लहानशा मत्स्योदरीवर ते भाळले होते. सप्तचक्रांकित मानवी देहपिंडावरच तर साधकाची सारी मदार असते.
Read More