भारताबाहेर मानवनिर्मित भूभागांची बंधने ओलांडून, सार्या नात्यांच्या पलीकडले असे रामायणाचे नाते, समस्त जगभरातील मानवसमूहाशी जुळले आहे. कोण वाल्मिकी, कुठे राहिले, कधी होऊन गेले, याची काहीही उठाठेव न करता सगळ्याच आशियाई देशवासीयांनी, रामकथेचे आकंठ रसपान केले आहे. भारतीय दर्यावर्दी प्रवासी, व्यापारी आणि बौद्घ भिक्षू यांच्याबरोबर, रामायणसुद्घा दक्षिण-पूर्वेकडील देशांत पोहोचले. रामायणातील शाश्वत जीवनमूल्ये आणि कर्तव्यपरायणतेची शिकवण यामुळे भारावून जाऊन, त्यांनी ते काव्य आत्मसात केले आणि आपापल्या भाषेत त्याचा अविष
Read More