हा ९० वर्षे जुना विमान कायदा, १९३४च्या जागी भारतीय वायुयान विधेयक (BVV), २०२४ गुरूवार, ६ डिसेंबर रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या वर्षी ऑगस्टमध्ये लोकसभेत मंजूर झालेल्या या विधेयकामुळे विमान वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करणे सुलभतेसाठी हा कायदा फायदेशीर ठरेल. भारतीय वायुयान विधायक, २०२४ नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांच्या प्रतिसादानंतर मंजूर करण्यात आले, लोकसभेने या विधेयकाला आधीच मंजुरी दिली आहे.
Read More
Indian airlines भारतीय विमान कंपन्यांना बॉम्ब उडवण्याच्या अनेक धमक्या येताना दिसत आहेत. या घटनेत सध्या सर्वाधिक वाढ होत आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याप्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे.
‘नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना या विमानतळाच्या पाहणीदरम्यान दिली.