सुभेदार, फत्तेशिकस्त, शिवरायांचा छावा, पावनखिंड, मुंज्या अशा अनेक चित्रपटांमध्ये आणि असंभव, शुभं करोति, तु तिथे मी अशा अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका गाजवणारे अभिनेते अजय पुरकर ( Ajay Purkar ) यांच्याशी Unfiltered गप्पा With कलाकारचा भाग छान रंगला... नक्की पाहा
Read More
नक्षलवाद आणि शहरी नक्षलवाद यांच्यावर थेट भाष्य करणारा आणि छत्तीसगडमधल्या बस्तरमधील माओवादाचे भयाण सत्य मांडणारा ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar : The Naxal Story) हा चित्रपट आज १५ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला. नुकताच या चित्रपटाचा प्रिमिअर पुण्यात झाला, तो पाहिल्यानंतर अभिनेते अजय पुरकर यांनी व्हिडिओ शेअर करत भारतातील प्रत्येक नागरिकांना ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar : The Naxal Story) चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, “आपल्याच देशाला आतुन लागलेली जी किड आहे त्यांच्या सणसणीत कानाखाली मारणारा हा
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. नरवीर सुभेदार तान्हाजी मालूसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित या ऐतिहासकपटात अभिनेता अजय पुरकर यांनी तान्हाजींची भूमिका साकारली असून प्रेक्षकांना कोंढाणा किल्ल्याचा तो इतिहास पुरकर यांच्या अभिनयातून याचही देही याची डोळा अनुभवता आला आहे. दरम्यान. या चित्रपटाने ब़ॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळत आहे. हिंदी चित्रपटांच्या गर्दीत 'सुभेदार' चित्रपटाने आपली जागा निर्माण केली असून आत्तापर्यंत या चित्रपटाने ८.७४ कोटी कम
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवाष्टकातील पाचवे पुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट काल २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. समाज माध्यमावर एकीकडे या चित्रपटाचे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या टीमची चिंता वाढवणारी गोष्ट होत आहे. सुभेदार चित्रपटाचा क्लायमॅक्स फोनवर शुट करुन समाज माध्यमावर वायरल केला जात असल्याने दिग्पाल लांजेकर यांनी प्रेक्षकांना इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ पोस्ट करत क्लायमॅक्स वायरल न करण्याची विनंती केली आहे
शालेय जीवनापासून पुस्तकात वाचलेला इतिहास हा प्रत्यक्षरित्या मोठ्या पडद्यावर पाहण्याचे अहोभाग्य आजच्या पिढीला लाभले आहे. त्याचे सर्व श्रेय हे ऐतिहासिक चित्रपट तयार करणाऱ्या प्रत्येक दिग्दर्शकांना जाते. शिवरायांचा इतिहास हा संपुर्ण जगासमोर चित्रपट स्वरुपात यावा आणि एक-दोन नव्हे तर तब्बल आठ भागांची ऐतिहासिक मालिकाच प्रेक्षकांसमोर मांडावी असा विचार करणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकाची स्थापना केली. आत्तापर्यंत शिवाष्टकातील चार चित्रपट प्रदर्शित झाले असून पाचवं पुष्प हे नरवीर सुभेदार तान्हाजी म
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प असणाऱ्या 'सुभेदार' चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. 'आले मराठे', 'मावळं जागं झालं जी' या गाण्यांपाठोपाठ आता 'हळद' हे गाणे देखील प्रेक्षकांची मने जिंकत आहे. रायबाचे लग्न असल्यामुळे त्यांच्या हळदीचा कार्यक्रम या गाण्यातून मांडला आहे. सुभेदार हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.
शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प म्हणजे सुभेदार चित्रपट. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवाष्टकातील सुभेदार चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. तानाजी मालूसरेंच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असताना आता चित्रपटातील स्वराज्यासाठीच्या घनघोर रणसंग्रामात पराक्रमाची शर्थ करणाऱ्या धाडसी योद्ध्यांचं गाणं 'आले मराठे आज प्रदर्शित झाले आहे. 'आले मराठे' या गाण्याचे बोल दिग्पाल लांजेकर यांचे असून देवदत्त मनिषा बाजी यांनी या गाण्याला उत्कृष्ट संगीत दिले आहे. 'आले मराठे'
“चित्रपट हा ऐतिहासिक दस्तऐवज असू शकत नाही. परंतु 'शिवराज अष्टक' या श्रृंखलेमार्फत येणाऱ्या भावी पिढीला आपला इतिहास समजावा हा माझा अट्टहास आहे”, असे मत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना मांडले. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटानंतर याच श्रृंखलेतील पाचवे पुष्प असणारा 'सुभेदार' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित असणार आहे. दरम्यान, या चित्रपटाची
अजय पूरकर यांचे नाव अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात गाजलेल्या कलाकृतींशी जोडले गेलेले आहे.
सध्या चित्रपटसृष्टीत एकापाठून एक ऐतिहासिक चित्रपट येत आहेत. त्यात सर्वात गाजला तो म्हणजे 'पावनखिंड'.