नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात १० इलेक्ट्रिक वातानुकूलित डबलडेकर बसगाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात नवी मुंबईकरांनाही इलेक्ट्रिकल डबलडेकर बसमधून प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे.
Read More
नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शना खाली दि.१० डिसेंबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम महानगरपालिका क्षेत्रात प्रभावी रितीने राबविण्यात आली.
शब्दांमधील अक्षरांमध्येही ‘बिटविन द लाईन्स’ असे भाव असतात हे सुलेखनकार अच्युत पालव यांच्यामुळे समजले अशा शब्दात त्यांच्या सुलेखनाचा गौरव करीत त्यांची अक्षरावर हुकूमत पाहून थक्क व्हायला होते अशा शब्दात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नाट्य रसिकांची मागणी लक्षात घेता वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या इमारतीमध्ये वाचनालय बांधण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतला आहे, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली. त्यानुसार वाचनालय निर्मितीचे काम चालू करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच सांस्कृतिक वारसा असलेल्या महानगरपालिकेच्या या वास्तूत नाट्यप्रेमींसह सर्व पुस्तकप्रेमींना सुसज्य असे वाचनालय उपलब्ध होणार आहे. हे वाचनालय उभारण्याकरिता ३ कोटी ६५ लाख १४ हजार रुपये खर्च येणार आहे.
नियमित लसीकरणात नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना लसीकरणाचा लाभ मिळावा व लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता योग्य खबरदारी घेत आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या दर महिन्याला बैठक होऊन आढावा घेतला जात असतो.
नवी मुंबईतील पाच बेकायदा शाळा बंद होणार आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३१ मार्च, २०२३ अखेर नवी मुंबई महापालिकेची मान्यता न घेता प्राथमिक शाळा चालविल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. आरटीई अधिनियम २००९मधील कलम १८ अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. त्यानुसार, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाच शाळा मान्यतेशिवाय सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या वाटचालीचे खरे श्रेय निवृत्त सैनिकांनाच आहे.असे प्रतिपादन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ठाणे हाउसिंग फेडरेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाबद्दल अभिनंदन केले माजी सैनिकांच्या मालमत्ता करासंबधी तसेच लॅण्ड कन्व्हेयन्सबाबतच्या (भू अभिहस्तांतरण) अडचणी तातडीने सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
शिंद सरकरने बहुमत सिद्ध करत विजयोन्मादाने पुढची अडीच वर्षे आपण स्थिर सरकार देणार यावर शिक्कामोर्तब केले
‘प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रेन्स’ (पीएम केअर) या योजनेअंतर्गत सोमवार, दि. ३० मे रोजी अनाथ बालकांना लाभ वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘वेबकास्ट’/‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे देशभरातील निवडक अनाथ बालकांशी संवाद साधणार आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कलाकारांना राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने एक रक्कमी पाच हजार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील दोन हजार कलाकारांना हे अर्थसहाय्य देण्यात येणार असून यासाठी अर्ज करण्याचे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्य, कलाक्षेत्रात १५ वर्षे काम केल्याचे पुरावे तसेच वार्षिक उत्पन्न ४८ हजार असलेल्या कलाकारांनाच शासनाचे अनुदान मिळणार आहे. तेव्हा या जाचक अटीमुळे "भीक नको पण कुत्रा आवर' अशी
ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरेंचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पत्र
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका सज्ज झाल्या आहेत.