पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आलेल्या शाहनवाज आलमचा, महाराष्ट्र ISIS मॉड्युल मास्टरमाइंड साकिब नाचन याच्याशीही संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. फ्री प्रेस जर्नलच्या एका अहवालातुन ही माहिती उघड करण्यात आली आहे. साकिबला एनआयएने ९ डिसेंबर रोजी अटक केली होती. दरम्यान, शाहनवाजच्या अटकेच्या काही महिन्यांपूर्वी साकिबचा मुलगा शमिल नाचन यालाही ऑगस्टमध्ये पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात अटक करण्यात आली होती.
Read More