सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणारे एक पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहे. ज्यात १ जुलै २०२५ पासून पेट्रोलची किंमत ४५ रुपये प्रतिलिटर होणार असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे.
Read More
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समाजमाध्यमाचे नाव ‘द ट्रुथ’ असे ठेवले. मात्र, हाच आग्रह त्यांच्या धोरणांमध्ये दिसत नाही. भारत आणि पाकिस्तान युद्धाच्याबाबतीतही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. मात्र, भारताने त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. एकूणच ट्रम्प यांची भारताविषयीची भूमिका आणि भारताने दिलेले प्रत्युत्तर याचा घेतलेला आढावा...
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने केलेल्या हवाई हल्यात पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारत-पाकच्या चार दिवसांच्या हल्ल्याच्या चकमकीतील ५० वर्षातील ही सर्वात मोठी लढाई होती. युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाई हल्ल्याच्या क्षमतेची परीक्षा घेत एकमेकांच्या लष्करी तळांवर हल्ला केला. परंतु आता उपग्रह प्रतिमांमध्ये सत्य स्पष्ट झाले आहे. युद्धादरम्यान, हल्ल्यांसाठी दोन्ही देशांनकङून क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करण्यात आला. दोन्हीही देशांनी एकमेकांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवल्याचा दावा केला. परं
Batenge toh Katenge is the truth ‘बटेंगे तो कटेंगे’ हा देशभरातील तमाम हिंदूंना भाजपने केवळ निवडणुकीपुरता दिलेला प्रचारकी नारा नव्हता, तर तो हिंदू एकतेचा कानमंत्र होता. पहलगाममध्ये जाती, पंथ, भाषा, प्रादेशिक ओळख विचारुन नव्हे, तर धर्म विचारुन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्यानंतर ‘बटेंगे तो कटेंगे’ या सत्यवचनाची दाहकता अधिक प्रकर्षाने हिंदूंना जाणवायलाच हवी!
गृहस्थाश्रम सोडून वानप्रस्थाश्रमात प्रवेश करीत असताना, सर्वांचा निरोप घेतेवेळी ज्यांच्याशी संबंध आले व ज्यांनी ज्यांनी या मागील आश्रमात सहकार्य केले, त्यांचे धन्यवाद व्यक्त करणे हे वानप्रस्थाश्रमात प्रवेश करणार्याचे कर्तव्य ठरते.
रिबेका आणि तिचा नवरा ग्रेग यांनी ‘स्ट्रदर्स वॉचमेकर्स’ अशी कंपनीच स्थापन केली असून, यांची अशी ख्याती आहे की, उत्कृष्ट प्रतीची यांत्रिक घड्याळं आजदेखील लोक पसंत करतात.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली वैयक्तिक मालमत्ता आणि उत्पन्नाची माहिती तेथील फेडरल इलेक्शन कमिशनला दिल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या याची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसते. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले ’ट्रुथ सोशल’ हे इंटरनेट अॅप या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे. कारण, यावर्षी चक्क २०१ डॉलर्सपेक्षाही नाममात्र कमाई या माध्यमातून झाल्याचे ट्रम्प यांनी अहवाल सादर करताना सांगितले. इतर अॅॅप्सच्या तुलनेत प्रतिवर्षी साधारण ७.५ लाख डॉलर्स उत्पन्न असलेल्या या अॅॅपवर ही वेळ आल्याने ट्र
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जे इतिहास संशोधन केले त्यात मी म्हणतो तेच खरे असा आग्रह धरला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चरित्र लिहीले गेले नाही,अशीच खंत ते वारंवार व्यक्त करीत.
भारतीय समाजाने अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी ५०० वर्षे लढा दिला आणि आता ही संघर्षमय साधना त्याच्या सिद्धीकडे जाताना दिसत आहे. अयोध्येत उभारले जाणारे भव्य श्रीराम मंदिर भारताचे राष्ट्रमंदिर ठरेल,” असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी अयोध्येत केले.
“सतीप्रथा, बालविवाह यांसारख्या कुप्रथा या धर्ममान्य असल्या, तरी काळानुसार नवीन कायदे बनवून त्या बंद करण्यात आल्या. तशाच कुप्रथा इस्लाम धर्मातूनही काढून टाकण्यात आल्या पाहिजेत,” असे परखड मत ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’चे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वेब पोर्टल ‘महा एमटीबी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान मांडले.
असंख्य सत्यप्रिय संतजण व महापुरुषांनी प्रखर सत्यवादिता, प्रामाणिकपणे सेवा, परोपकार व राष्ट्रीय-सामाजिक कार्य यांद्वारे आपल्या कुळांच्या कीर्तीचा कळस उंचावला आहे. इतकेच नव्हे, तर यांसारख्या सत्यवादी सत्पुरुषांनी शाश्वत सत्यवाणी (ऋत) व सद्व्यवहाराने आपली इहलोकांची जीवनयात्रा यशस्वी करून परलोकाचाही (पुढील जन्मात) मार्ग सुकर केल्याचे निदर्शनास येते. असा हा सत्याचा प्रताप मानवी जीवनाचे सर्वांगीण कल्याण साधणारा आहे.
माणूस येन-केन प्रकारे धन मिळवून मोठ-मोठाली घरे बांधतोय, जमीन-जुमला व मोटारगाड्या आणि अनेक महागड्या वस्तू घेऊन संपत्तीचे प्रदर्शन करीत आनंदी बनण्याचा व सुमनस होण्याचा प्रयत्न करतोय, पण हा शाश्वत आनंद नाही. जोपर्यंत आत्मज्ञानाचा, वैदिक सत्य ज्ञानाचा सूर्य पाहणार नाही, तोवर तो खर्या सुख व आनंदापासून तो वंचित राहणार...!
मानव जीवन अमूल्य आहे. सत्यज्ञानाच्या आचरणाने सतत या जीवनाला पवित्र केले पाहिजे. अगदी लहान-लहान उपदेश ग्रहण करीत पुण्यसंचय करीत राहिल्याने आपली जीवनयात्रा सार्थक ठरते. ज्याप्रमाणे मुंग्या मातीचा एक-एक कण जमवून वारुळ तयार करतात किंवा मधमाशा माधुर्याचा छोटा-छोटा अंश संग्रहित करून मधाचे पोळे तयार करतात, तद्वतच माणसानेदेखील अगदी छोटी-छोटी सत्यतत्त्वे, धार्मिकता, प्रामाणिकपणा, नीतिमूल्ये यांचा संग्रह करीत त्यांना जीवनात धारण करावे आणि आपल्या पुण्यकर्मात वाढ करीत राहावे.
पोरबंदरचे मोहनदास करमचंद गांधी विश्वस्तरावर 'महात्मा' म्हणून अमिट छाप उमटवतात, तेव्हा त्यांनी अंगीकारलेल्या सत्य आणि अहिंसा व्रताचे महत्त्व शब्दातीत, अमूल्य होते. सत्य आणि अहिंसेची ताकद मोहनदास करमचंद गांधी नावाच्या भारतीयाला कोट्यवधी दुर्बलांचे आशास्थान, प्रेरणास्थान बनवते. गांधीजींना अभिप्रेत असलेल्या सत्य व अहिंसेचे आजचे परिमाण शोधताना घेतलेला आढावा...
महात्मा गांधीजी गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरू मानत असत, तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरू होते. सदरच्या लेखातून रानडे आणि गोखले या गुरुशिष्यांबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली असून महात्मा गांधी व गोपाळकृष्ण गोखले या गुरुशिष्यांमधले वैचारिक साम्य, मतभेदही सांगितले आहेत.
ताश्कंद फाईल्सनंतर आणखी एक इन्वेस्टिगेटिव्ह चित्रपट घेऊन विवेक अग्निहोत्री प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. उद्या भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि याच निमित्ताने पुढील वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट घेऊन येत असल्याचे आज अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडियावर जाहीर केले.
पत्रकार छत्रपती हत्या प्रकरणी डेरा सच्चा सौदाच्या गुरमीत राम रहिमला सीबीआय विशेष न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप सुनावली
जगातील सर्व मानवांनो! उठा, जागे व्हा आणि ईश्वराने दिलेल्या वरांचा लाभ घ्या. कारण सत्य व पवित्र मार्ग हा सुरीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण असतो. श्रेष्ठ महापुरुष मात्र या अवघड मार्गावरून नेहमी चालतच असतात, असे कवीजन म्हणतात.
‘राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्या’च्या निमित्ताने लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पुढे येऊन नेत्रदान करण्यासाठी जागरूकता आणि इच्छा दाखवण्याची गरज आहे.
घडलेल्या घटनेसाठी डावे आणि उजवे एकमेकांना शिव्या देत बावळटपणे एकमेकांना दोष देत आहेत. डाव्यांसाठी हा नेहमीचा कार्यक्रम असला तरीही खरंतर या प्रकरणात दोघांनाही वापरून घेतले जात आहे. अर्थात हे ‘जाणते’ राजकारण महाराष्ट्राला नवे नाही.