( Two MMRDA projects win prestigious awards ) ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए)च्या दोन प्रकल्पांना नवी दिल्लीत पार पडलेल्या ‘बिल्ड इंडिया इन्फ्रा अॅवॉर्ड्स २०२५ ’मध्ये दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १५९व्या प्राधिकरण बैठकीत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत प्रदान केले.
Read More
हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांना नुकताच मानाचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर झाला. ‘नौकर की कमीज’, ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या साहित्यकृती. गेली कित्येक दशके हिंदी साहित्यविश्वात त्यांनी आपल्या लेखनशैलीतून स्वतःची वेगळी छाप उमटवली. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्यविश्वाची मुशाफिरी करणारा ‘महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी’चे कार्याध्यक्ष डॉ. शीतला प्रसाद दुबे यांचा लेख...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या 'गुढीपाडवा' या आपल्या हिंदू नववर्ष दिवसाचे औचित्य साधत, 'शेलार मामा फाउंडेशन' आयोजित 'चिरायू' हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्याच्या उत्सवांचा सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला. यंदाचं हे १८ वर्ष असून ९०च्या दशकातील ज्येष्ठ कलाकारांनी 'चिरायू' ची मुहूर्तमेढ रोवली होती. कालांतराने खंडित झालेल्या या परंपरेला पुन्हा एकदा झळाळी आणली ती म्हणजे लोकप्रिय कलाकार सुशांत अरुण शेलार यांनी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. २००६ पासून 'शेलार मामा फाउंडेशन'द्वारा आयोजित 'चिरा
हिंदी साहित्यामध्ये स्वताचा वेगळा ठसा उमटवणारे Vinod Kumar Shukla यांना साहित्यातील प्रतिष्ठीत ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. स्थानिक ते वैश्विक असा प्रवास करणाऱ्या विनोद कुमार शुक्ल यांच्या साहित्याचं वेगळेपण नेमकं काय आहे ? हेच जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून
( Deputy Chief Minister Shinde on Receiving Jagadguru Sant Shri Tukaram Maharaj award ) ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद असून माझ्या राजकीय, सामाजिक जीवनातला हा सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म असल्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ज्येष्ठ हिंदी साहित्यीक आणि कवी विनोद कुमार शुक्ल यांना साहित्यातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. गेल्या ५० वर्षांपासून साहित्यक्षेत्रात स्वताचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या विनोद कुमार शुक्ल यांना ५९वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विनोद कुमार शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी छत्तीसगढ येथील राजनंदगाव येथे झाला. १९७१ साली त्यांचा पहिला कविता संग्रह "लगभग जिंदगी' प्रकाशित झाला.
( Maharashtra Bhushan Award announced to veteran sculptor Ram Sutar ) महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. २० मार्च रोजी विधानसभेत केली.
(Devendra Fadanvis on Maharashtra Bhushan Award 2024 ) ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ साठी राज्यातून प्राप्त शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे. ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ अंतिम निर्णय हा सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मराठी साहित्यामध्ये संशोधन आणि संवेदनशीलतेचा अनोखा मिलाप घडवून साहित्यनिर्मिती करणार्या ज्येष्ठ कवयित्री अरूणा ढेरे यांना यंदाचा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या बहुमोल योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
'झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन रितेश देशमुख आणि अमेय वाघ करत आहेत. कार्यक्रमातील एका खास क्षणी संपूर्ण वातावरण भावनिक झालं, जेव्हा अभिनेता जितेंद्र जोशीने दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी लिहिलेलं एक पत्र रितेशसमोर वाचून दाखवलं.
Ekta Kapoor चित्रपट निर्माती म्हणून नावारुपाला आलेल्या एकता कपूर यांना पद्मश्री देण्यात आला होता. मात्र, आता पद्मश्री पुरस्कार पुन्हा घ्यावा अशी मागणी करण्यात आली. भारताच्या विविध भागामध्ये १०८ वकिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना याबाबत एक पत्रही लिहिण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनात दिनांक ११ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मागच्या काही वर्षांपासून 'अवॉर्ड वापसी'चा प्रकार कला क्षेत्रातील काही जाणकार लोकांकडून सुरू करण्यात आला होता. सरकारचा निषेध म्हणून अनेक ठिकाणी आपआपले पुरस्कार परत केले जात होते. परंतु त्या त्या संस्थानवरील त्यांचे सदस्यत्व मात्र अबाधित राहत असे. यामुळे पुरस्काराचा मान राखला जात नाही. त्यामुळे आता पुरस्कार प्रदान करणाऱ्या कलावंतांना ' आम्ही पुरस्कार परत करणार नाही' असे त्यांच्याकडून लिहून घ्यावे अशी मागणी संसदीय समितीकडून करण्यात आली आहे.
मुंबई : "मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून, सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत त्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाख रुपयांचा अवॉर्ड देणार" असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आमदार आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी केली आहे. तसेच मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान आणखी ताकदीने पुढे नेण्यासाठी आशिष शेलार यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे.
(CM Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नागपूर दौऱ्यादरम्यान वेळ काढून पद्मश्री बहुमानाने सन्मानित डॉ. विलास डांगरे (Dr. Vilas Dangre) यांच्या तपोवन येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देत त्यांचे अभिनंदन केले.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा झाली. विविध क्षेत्रांत आपले अमूल्य योगदान देऊन देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार्या अनेक दिग्गजांचा, दरवर्षी ‘पद्म’ पुरस्काराने सन्मान केला जातो. कला आणि साहित्य या क्षेत्रांत मोलाची कामगिरी करून, यावर्षी ‘पद्मविभूषण’ पुरस्काराला ( Padma Vibhushan Award ) गवसणी घालणार्या या चार दिग्गजांचा हा अल्पपरिचय..
(60th State Marathi Film Awards) ६०व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीकरिता अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, ४ ब्लाईंड मेन, समायरा, गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही, ग्लोबल आडगाव, हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी याबाबत माहिती दिली.
: क्रिडाक्षेत्रात भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंचा १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात सन्मान करण्यात आला. शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरास्कार सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय भारतीय पुरूष हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंह यांना सुद्धा खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत
काश्मीरमधील हिंसाचार ( Kashmir Violence ) हा पाकपुरस्कृत असल्याचा उच्चार लष्करप्रमुखांनी केला आहे. आतापर्यंतच्या दहशतवादी घटनांनी वेळोवेळी ही बाब ठळकपणे मांडली आहे. भारताने दहशतवादाविरोधात राबविलेल्या ठोस उपाययोजना, तसेच काश्मीरच्या विकासासाठी राबविलेले धोरणात्मक निर्णय भारताला बळ देणारे ठरले आहेत.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टी धोक्यात आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये अनेक कलाकारांची घरं असून मोठ्या संख्येने ती जळून खाक झाली आहेत. दरम्यान, या आगीमुळे २ लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले असून तेथे आणीबाणी जाहिर करण्यात आली आहेलॉस एंजेलिस हे दक्षिण कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर आहे. हे अमेरिकेतील चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. या आगीचा फटका ऑस्कर पुरस्कार सोहळ्यालाही बसला असून १७ जानेवारी २०२५ रोजी होणारा नामांकनाचा सोहळा पुढे
‘राष्ट्रपती शौर्य पदक’ आणि अमेरिकेच्या ‘स्पार्टन पुरस्कारा’ने सन्मानित असलेले हेमंत अनंत बावधनकर. विरता आणि अचूक निर्णयक्षमता असलेल्या हेमंत यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा लेख...
Khel Ratna Award 2024 क्रीडा मंत्रालयाने २ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची घोषणा केली. यामध्ये भारताची अव्वल नेमबाजपटू मनू भाकरने पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत दोन कांस्यपदक मिळवत अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मनू भाकरने आपल्या भारताची मान उंचावली आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेशसह इतर ४ खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : साहित्य अकादमीच्यावतीने देण्यात येणार्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ ( Sudhir Rasal ) यांना ’विंदांचे गद्यरुप’ पुस्तकासाठी यंदा हा जाहीर झाला आहे. आतापर्यंतचा हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याची भावना रसाळ यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल गावाचे सरपंच रविंद्र माने यांचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थाकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अभिनंदन केले.
मुंबई : ‘माय होम इंडिया’ आयोजित ‘जनजातीय युवा गौरव पुरस्कार’ ( Tribal Youth ) सोहळा शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी बजाज इमेराल्ड, अंधेरी पूर्व येथे संपन्न झाला. यावेळी, जनजातीय समाजासाठी कार्य करणार्या दहा प्रख्यात समाजसेवकांना सुविख्यात मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कारार्थी स्वतः जनजातीय समुदायातील असून, आज ते आपल्याच समाजाच्या कल्याणाकरिता काम करत आहेत. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर उदय देशपांडेंसह अंधेरी पूर्व मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. मुरजी पटे
ठाणे : कोकणातील दुर्गम भागासह विविध शाळांमध्ये नवनवीन शैक्षणिक प्रयोग व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी कार्य करणारे १५१ आदर्श शिक्षक, ३० शिक्षकेतर कर्मचारी आणि ११ आदर्श संस्थाचालकांना आज सन्मानित करण्यात आले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे ( Vasantrao Davkhare ) यांच्या स्मृत्यर्थ आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडी-कोकण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पुरस्कारातून गुणवंत शिक्षकांच्या कार्याचा सन्मान झाला असल्याची भावना शैक्षणिक वर्तुळातून
पुणे : गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गदिमा पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे ( Asha Kale ) यांना जाहीर झाला आहे. सोबतच गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘गृहिणी सखी सचिव पुरस्कार’ दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांना, तर ‘चैत्रबन पुरस्कार’ प्रसिद्ध कथा, पटकथा, संवादलेखक, गीतकार क्षितीज पटवर्धन, ‘विद्या प्रज्ञा पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर
(Skoch award) महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम 'शासन आपल्या दारी'ला प्रतिष्ठीत स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. देशभरातील विविध श्रेणींतील २८० प्रकल्पांमधून 'शासन आपल्या दारी' या महाराष्ट्राच्या मॉडेलची निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सामाजिक सेवा संस्था ‘माय होम इंडिया’च्या वतीने ११ वा कर्मयोगी पुरस्कार ( Karmayogi Award ) यशस्वीरीत्या संपन्न झाला. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह श्री कृष्ण गोपाल यांनी डॉ. विश्वामित्र बत्रा यांना सन्मानित केले.
ठाणे : विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे ( Vasantrao Davkhare ) यांच्या स्मृत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील १२५ आदर्श शिक्षक व १० आदर्श संस्थाचालकांचा वसंतस्मृती पुरस्कारासह सन्मान करण्यात येणार आहे. ठाण्यातील एम. एच. हायस्कूलमध्ये रविवारी (ता. १ डिसे.) होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असेल.
मुंबई : ‘मराठी नाट्य कलाकार संघा’तर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी ( Mohan Joshi ) यांना जाहीर झाला आहे. गुरुवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी ‘नाट्य कलाकार संघा’तर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. ‘नाट्य कलाकार संघा’तर्फे आयोजित ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ या सोहळ्यात मोहन जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, माहीम-माटुंगा येथे आयोजित करण्यात आ
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) सध्या नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या तीन देशांच्या दौर्यावर आहेत. नायजेरियात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे स्वागत करण्यात आले. त्यांना नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रॅण्ड कमिसर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर’ (जीकॉन)ने सन्मानित करण्यात आलं आहे. यापूर्वी राणी एलिझाबेथ या एकमेव परदेशी व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आले. १९६९ मध्ये हा सन्मान त्यांना देण्यात आला होता.
मुंबई : प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार-२०२४ च्या निवड समितीने या वर्षासाठी 'ट्रेनिंग अँड एज्युकेशनल सेंटर फॉर हियरिंग इम्पेयर्ड' (टीच)चे सह-संस्थापक दीपेश नायर ( Dipesh Nair ) यांची निवड केली आहे. ते कर्णबधिर आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वपूर्ण काम करत आहेत. हा पुरस्कार गोरखपूर येथे २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशना दरम्यान दिला जाईल.
महाराष्ट्राला लोकसंस्कृतीचा मोठा वारसा लाभला आहे. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप. महाराष्ट्राचा पहाडी आवाज असं बिरुद मिळालेले लोकशाहीर विठ्ठल उमप आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. विठ्ठल उमप आज आपल्यात नाहीत, पण त्यांची गाणी,नाटकं व आठवणी आजही मराठी रसिक मनावर रुंजी घालत आहेत. लोकशाहीर, लोकगायक, गीतकार, असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शाहीर विठ्ठल उमप यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त १४ वा लोकशाह
भारत सरकारने ‘इनोव्हेटिव्ह फार्मर’, राज्य सरकारने ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित केलेल्या मराठवाड्यातल्या विद्या रूद्राक्ष यांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणारा हा लेख...
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. त्यांची लव्हस्टोरी सर्वांना माहिच आहेच. पण नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि यावेळी उमेशने आजवर कधीही न सांगितलेला मजेशीर किस्सा २५ वर्षांनी पहिल्यांदाच सांगितला. नक्की लव्हस्टोरीचा तो खास किस्सा कोणता आहे जाणून घेऊयात..
नाटक, मालिका आणि चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विजय गोखले यांनी आजवर मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही महत्वपुर्ण भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, गंधार पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी दिली. तसेच, २०२३पासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार स्पृह
आज ३० सप्टेंबर रोजी हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत आपली अनमोल कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर करण्यात आला.
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर करण्त आला आहे. ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन चक्रवर्तींना हा सन्मान दिला जाणार असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मिडियाद्वारी ही घोषणा केली आहे. मनोरंजन विश्वासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
(Karde)महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक स्वप्निल कापडणीस, सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारला. या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल पर्यटनमंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील यांनी
केंद्र शासनाच्या 'एक जिल्हा, एक उत्पादन' योजनेंतर्गत ठाणे जिह्यातील प्रोलेट्स ब्रँडला दि. २५ सप्टेंबर रोजी बंगळुरू येथील पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट पॅकेजिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. फूड व बिवरेज क्षेत्रात देशस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फूड प्रोसेसिंग कंपन्यांना 'Informa Markets'द्वारे 'Fi India Award' देऊन गौरविण्यात येते.
(CM Eknath Shinde) पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फोरमचा हा दुसराच पुरस्कार असून, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते गुरुवार, दि. १९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हे राज्यातील १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून राज्य शासनामार्फत दिले जातात. हे पुरस्कार अनमोल असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात मराठी चित्रपटाने विशेष बाजी मारली असून मधुगंधा कुलकर्णी निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे. याच निमित्ताने चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित झालेला ‘वाळवी’ हा चित्रपट दोन लग्न झालेल्या जोडप्यांच्या आयुष्याभोवती फिरणारा आहे.
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. तसेच, सचिन सुर्यवंशी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वारसा' या चित्रपटाला सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे जाहिर करण्यात आली. यात ‘वाळवी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाने २ राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावे केले आहेत.
दुबईस्थित ‘अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना मुंबईच्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’तर्फे दिला जाणारा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार २०२४’ देऊन गौरवण्यात आले आहे. धनंजय दातार यांनी सामाजिक क्षेत्रात विशेषतः वंचित जनांना न्याय देण्यासाठी केलेले उत्कृष्ट कार्य व योगदान यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे.
१५ व्या कृषी नेतृत्व समिती २०२४ आणि एग्रीकल्चर टुडे या मासिकाच्या वतीने देण्यात येणारा 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार' महाराष्ट्राला जाहीर झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवार, १० जुलै रोजी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, एग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ.एम.जे.खान, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला ' रिस्क मॅनेजर अवार्ड २०२४' पुरस्कार मिळाला आहे. इंग्लंडची मुख्य सेंट्रल बँकेने हा आरबीआयचा मोठा सन्मान केला आहे. रिस्क कल्चर व जागरूकता पसरविण्याचे काम नेटाने केल्याने हा बहुमान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळाला आहे. आरबीआयने ईआरएम फ्रेमवर्कचे तंतोतंत पालन केल्याने तसेच रिस्क मॉनेटरिंगची प्रभावी अंमलबजावणी केल्याने हा पुरस्कार बँकेला मिळाला आहे.