मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर आधारित " धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे" या चित्रपटाला प्रदर्शित होउन दि. १३ मे रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अभिनेते प्रसाद ओक यांनी जनतेचे आभार मानले. चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांनी जनतेला धन्यवाद दिले. यानिमित्ताने प्रसाद ओकने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपट दुसरा तिसरा कुठला नसून "धर्मवीर" चित्रपटाचा दुसरा भाग आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या उत्सफूर्त प्रतिसाद येणाऱ्या नव्या भागालासुध्दाला मिळावा अशी आशा प्
Read More
‘पुणे फिल्म फाऊंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी जाहीर केली. फाऊंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्यासोबत फाऊंडेशनचे सचिव रवी गुप्ता हेदेखील यावेळी उपस्थित होते. याबरोबरच विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेत चित्रपट दिग्दर्शक चैतन्य ताह्मणे यांचे ‘लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाऊ कदम यांना घरी गणपती बसवला म्हणून किंवा प्रवीण तरडेंनी संविधानावर गणपती बसवला म्हणून माफी मागायला लावणार्यांना एक प्रश्न आहे की, भाऊ कदम किंवा प्रवीण तरडे यांना संविधानाने दिलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य, श्रद्धा स्वातंत्र्य आहे की नाही? की अभिव्यक्तिस्वातंत्र्य केवळ संविधानाचे नाव घेऊन असंविधानिक विचार आणि कृती करणार्यांनाच आहे? पुछता हैं भारत...!
‘सरसेनापती हंबीरराव’. या अतिभव्य ऐतिहासीक चित्रपटाच्या संहितेचे पूजन हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर महाराष्ट्रातील पाच शेतकर्यांच्या हस्ते करून प्रविण तरडे यांनी पुन्हा एक आदर्श पायंडा पाडला आहे.
‘आयुष्यात दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी काही लोक फार तत्पर असतात. त्यांच्या मते, आयुष्याच्या प्रवास हा यातूनच पुढे जात असतो’. अशाच कृष्णा सुर्वेची हटके मनोरंजक कथा संकेत पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ या आगामी मराठी चित्रपटात बघायला मिळणार असल्याचे या चित्रपटाच्या भन्नाट टीजर वरून लक्षात येते.
बॉलीवूड अभिनेता राकेश बापट गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी स्वतः मूर्ती साकारतो. सालाबादप्रमाणे यंदाही त्याने श्रींची मूर्ती साकारली असून यावर्षी त्याला लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे यांची साथ लाभली आहे. त्यांनी अतिशय सुरेख अशी मूर्ती शाडूच्या माती पासून साकारली असून ती पूर्णपणे इको फ्रेंडली आहे.
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची महती सांगणाऱ्या उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य मराठी चित्रपटाची घोषणा आणि पहिल्या पोस्टरचा अनावरण सोहळा कोंढणपूर, पुणे येथे काल पार पडला.