Pranpratistha Sohla

फाटाफूटीच्या भितीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार चिडीचूप!

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता निवडणूकीसाठी आपण इच्छुक असल्याचे खुलेपणाने सांगत आहेत. मात्र याला शरद पवार गट अपवाद आहे. शरद पवार गटातही अनेकजण पक्षाकडून उमेदवारीचे तिकीट मिळावे यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्याबाबत त्यांच्याकडून खुलेपणाने कोणतेच वक्तव्य केले जात नाही. एकूणच विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीदेखील मौन बाळगले आहे. इच्छुकांची नावे बाहेर आली तर फाटाफूट होईल या भितीमुळे मौन बाळगल्याची चर्चा आहे.

Read More

डोंबिवलीत प्रथमच रस्ता काँक्रीटीकरणासाठी युटीडब्ल्यूटी पध्दतीचा वापर!

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत डोंबिवली पूव्रेतील घरडा सर्कल ते आर. आर. रूग्णालय येथे र्पयतच्या रस्त्यांच्या कॉक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कामामध्ये रस्त्यांचे खोदकाम न करता डांबरी पृष्ठभागावरच अल्ट्रा थीन व्हाईट टॉपिंग (युटीडब्ल्यूटी)या कॉक्रीटच्या थराचे काम करण्यात येते. या पध्दतीमुळे वेळेची बचत होत असून नागरिकांची होणारी सोय आणि खोळंबा टळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सावजर्निक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने डोंबिवलीत प्रथमच या तंत्रज्ञानाच्या आधारे क

Read More

कडोंमपाकडून कर थकबाकी वसुलीसाठी अभय योजना जाहीर

कल्याण डोंबिवली महापालिकेची मालमत्ता आणि पाणीपट्टी करापोटी येणारी थकबाकी वसूल करण्याकरिता महापालिका प्रशासनाकडून अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत महापालिकेस मालमत्ता आणि पाणी पट्टीच्या करापोटी १८०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. या अभय योजनेतंर्गत दिलेल्या मुदतीत थकबाकीदार थकबाकीची रक्कम भरु शकतात. या योजनेचा लाभ घेणाऱ्या थकबाकीदाऱ्याच्या थकबाकीवर‌ लावण्यात आलेल्या व्याजाच्या रक्कमेत ७५ टक्के व्याज माफ केले जाणार आहे, अशी माहिती कडोंमपा आयुक्त डॉ. भाऊसाहेब दा

Read More

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांचा डोंबिवली भिवंडी बोटीने प्रवास

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांचा डोंबिवली भिवंडी बोटीने प्रवास

Read More

कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कल्याण पश्चिमेतील रामबाग लेन क्र.1 मध्ये बुधवारी इमारत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही दोन मजली इमारत कोसळल्यानेे परिसरात खळबळ उडाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीच्या मृत्यूसह एक जण जखमी झाला आहे. या धोकादायक इमारतीत सूर्यभान व उषा काकड हे दाम्पत्य झोपेत असतानाच हा प्रकार घडल्याने दोघेही ढिगार्‍याखाली अडकले. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. दोन इमारतींचा सामायिक जिना असल्याने मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी व जवानांनी काकड दाम

Read More

कल्याण-डोंबिवलीतील कचर्‍याची समस्या तत्काळ सोडवा; अन्यथा तीव्र जन आंदोलन

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत पुरस्कार मिळवल्याचा बडेजाव केला जात आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरातील कचर्‍याचे ढीग पाहता महानगरपालिका प्रशासन खरोखर शहरातील स्वच्छतेसाठी काम करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित करत, पुढील दहा दिवसांत कचर्‍याची समस्या न सोडविल्यास भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे कल्याण पश्चिमचे माजी आमदार व भाजप भटके विमुक्त आघाडीचे संयोजक नरेंद्र पवार यांनी महागनरपालिका आयुक्तांना पत्र लिहून दिला आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121