Prabhas

"....त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल"; उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावूक पोस्ट

(Ustad Zakir Hussain) जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक वर्षांपासून ते अमेरिकेतच वास्तव्यास होते. त्यांच्या निधनानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही समाजमाध्यमांवर एक खास पोस्ट लिहून झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "त्यांच्या

Read More

'आम्ही हे करू' म्हणत राज ठाकरेंनी केला मनसेचा जाहीरनामा प्रकाशित

(MNS Manifesto) राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यातील पक्ष प्रचारसभा, दौरे, जाहीरनामे प्रसिध्दी या सगळ्यांमध्ये व्यस्त आहेत. आजमितीस महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले जाहीरनामे प्रसिध्द केले आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. यावेळी त्यांनी 'आम्ही हे करू' या शीर्षकाने हा जाहीरनामा प्रकाशित करत आपली भूमिका मांडली आहे. मुंबईमधील वांद्रे येथील MIG क्लब येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत

Read More

"उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय, उरलेत फक्त खान", राज ठाकरेंची खोचक टीका

( Raj Thackeray ) दिंडोशी विधानसभा मतदारसंघामध्ये दि. ११ नोव्हेंबर रोजी उमेदवार भास्कर परब यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना निवडणूक चिन्हासकट शिंदेंकडे गेली. आज उद्धव ठाकरेंचा बाण निघून गेलाय आणि फक्त खान उरले आहेत", अशा शब्दात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. तसेच वर्सोव्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार हारून खान यांच्या उमेदवारीवरही त्यांनी टीका केली आहे.

Read More

राज ठाकरेंनी राऊतांना झाप झाप झापलं!, "महाराष्ट्राची भाषा घाण करणारा भिकार संपादक" म्हणत टीका!

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच भांडूपमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच मतदारसंघात कोणी दादागिरी केल्यास दुप्पट दादागिरी करेन, असा इशारा देखील त्यांनी दिला होता. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या टीकेवर संजय राऊत यांनी आपल्या नियमित पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलणार, असा जोरदार पलटवार केला आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121