अकेवळ राजकीय वा आर्थिक सत्ता हाती आली म्हणून एखादा पक्ष दीर्घकाळ राज्य करू शकत नाही. त्यासाठी त्याला ‘सिव्हिल सोसायटी’चे आत्मबळ लागते. केवळ प्रतिक्रियेच्या विरोधातून नव्हे, तर न्याय भावनेतूनच असे आत्मबळ येऊ शकते. असे सामूहिक आत्मबळच स्थायी परिवर्तनाचा आधार बनू शकते. त्यासाठी हिंदुत्ववादी चळवळीने ‘सिव्हिल सोसायटी’च्या मूल्यपद्धतीचा अभ्यास केला पाहिजे, तिचे स्वरूप व कार्यपद्धती समजावून घेतली पाहिजे.
Read More