काल संध्याकाळी राम मंदीर, अलिबाग येथे 'शेवटचं पान' ही स्वरचित कवितांची मैफिल संपन्न झाली. शिवानी, प्रतिक व अनिकेत या अलिबागमधीलच काही स्थानिक तरुणांनी ही मैफिल आयोजित केली होती. 'कलेला वाव देणारं, मनाचा ठाव घेणारं - तुमच्या आमच्या वहीचं, सर्वात खास, शेवटचं पान' हे शीर्षक असलेलं आकर्षक पोस्टर रसिकजनांचं लक्ष वेधून घेत होतं. तरुणांनी या मैफिलीचं आयोजन केल्यामुळे प्रेम, पाऊस, रात्र, समुद्र अशा सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या कविता सादर करण्यात आला. शिवाने दामले यांच्या एका कवितेला तर वन्स-मोर देखील मिळाला.
Read More
आदित्य प्रवीण दवणे, संकेत अरुण म्हात्रे, प्रथमेश किशोर पाठक आणि स्पृहा जोशी हे सादरकर्ते आपल्या कविता, गझल, गप्पांमधून प्रेक्षकांना काही नवं देण्याचा प्रयत्न केला
कथा, कादंबरी, नाटक, कविता तसेच लोकवाड्.मयातील गवळणी, भारुडे, लावणी, पोवाडे अशा वाड्.मयीन कलाप्रकाराच्या विविध अंगांनी मराठी वाड्.मय समृद्ध होत गेले. या वाड्.मय प्रकारांनी सर्वसामान्य माणसांचे मनोरंजन केले. त्यातील रसास्वादाचा आनंद रसिक घेत असतात.
वर्षाधारा बरसू लागल्या की आपसुकच महाकवी कालिदासांच्या काव्यरचनांचा स्मृतिदरवळ सुखावून जातो. तेव्हा, उद्या, दि. २२ जूनपासून आषाढ मास सुरु होतोय. त्यानिमित्ताने आषाढाच्या या प्रथमदिवशी कालिदासांच्या पाऊस, विरह आणि मिलनाची भावनिक गुंफण असलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करुया...
अटलजींच्या संपूर्ण जीवन प्रवासात त्यांच्यावर हावी होत होता, तो त्यांच्यातील संवेदनशील कवी.