वसंत ऋतुच्या सौंदर्याने आणि मोहकतेने संगीत मानापमान चित्रपटालाही भूरळ घातली आहे. या चित्रपटात वसंत ऋतूच्या उत्सवाला साजर करणारं ऋतु वसंत हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुबोध भावे, वैदेही परशुरामी सोबत गायक शंकर महादेवन आणि बेला शेंडे ही या बहारदार गाण्यावर थिरकताना दिसले आहेत.
Read More
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnavis) राज्याचा कारभार सुरळीतपणे हाताळत आहेतच. एक उत्तम राजकारणी अशी त्यांची ओळख असून त्यांच्यातील आणखी एक सुप्त गुण समोर आला आहे. महाशिवरात्रीनिमित्त ‘देवाधी देवा’ हे गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याचे शब्द देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnavis) यांनी लिहिले आहेत. शंकर महादेवन आणि अमृता फडणवीस यांच्या आवाजातील गाण्याला फडणवीस यांच्या शब्दाची लागलेली जोड अधिकच मधूर वाटत आहे. ‘देवाधी देवा’ या गाण्याचे बोल देवेंद्र फडणवीस ()Dcm Devendra Fadnavis यांचे असून संग
प्रसिद्ध पार्श्वगायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या गीतांवर सुमारे १७ हजारांहून अधिक ठाणेकर थिरकले. रॉक ऑन संगीत, डिस्को गीतांनी जल्लोष साजरा झाला. तर धार्मिक व पारंपरिक शास्त्रीय गीते व हिंदी गीतांच्या लयीवर रसिक भारावून गेले होते. या गीतांबरोबर महाराष्ट्राच्या लोककलेचेही नागरिकांना दर्शन घडविण्यात आले.
विविध क्षेत्रातील मान्यवर आता विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तयार करणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) ने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची टीम तयार करण्यात येणार असून या १९ जणांच्या टीमद्वारे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. एनसीईआरटीने १९ दिग्गज व्यक्तिमत्त्वांवर जबाबदारी सोपवली आहे.
फेब्रुवारी महिना आला कि तरुणाईला वेध लागतात ते ‘व्हॅलेंटाईन डे’ चे. एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस जगभरात साजरा होतो. प्रेमाच्या या उत्सवाला आता थोडेच दिवस उरले आहेत. या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी भावनांच्या हिंदोळ्यावर प्रेमाची अनोखी सफर घडविण्यासाठी ‘प्रीतम’ हा मराठी चित्रपट सज्ज झाला आहे. चित्रपटाचे रोमँटिक पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
स्वप्नील जोशी मुख्य भूमिका साकारत असलेल्या श्राबनी देवधर दिग्दर्शित 'मोगरा फुलाला' या चित्रपटाचे सुमधुर असे शीर्षक गीत आज प्रदर्शित झाले. संगीत सृष्टीतील सुरांची कट्यार प्राप्त झालेल्या शंकर महादेवन यांनी या गाण्याचे पार्श्वगायन केले आहे.