विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करणार्या व व्यक्तिमत्त्व विकासाचे नवे दालन उपलब्ध करून देणार्या, दिनेश मोरे यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा.
Read More
विजयादशमी २०२४ ते विजयादशमी २०२५ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे शताद्बी वर्ष. त्यानिमित्ताने डोंबिवलीतील ‘टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळा’ने २०२५ या वर्षाची दिनदर्शिका संघ विचारपीठ, संघ व संघ परिवार केंद्रस्थानी ( Personality Building ) ठेवून निर्माण केली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या सक्रिय सहभागातून संपन्न झालेल्या अशा या अभिनव उपक्रमाविषयी...
नोकरी सोडून साहित्य क्षेत्राला वाहून घेतलेल्या प्रदीप गांधलीकर या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख... ( Pimpri chichwad )
शालेय मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवणारी आणि त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसोबतच बौद्धिक विकासातदेखील अमूल्य योगदान देणारी संस्था म्हणजे ‘सरस्वती मंदिर ट्रस्ट’ संचालित ‘सरस्वती छात्रसेना’. ( Saraswati Chhatra Sena ) त्यानिमित्ताने छात्रसेनेच्या विविध उपक्रमांचा घेतलेला आढावा...
बिमल केडिया यांच्या आठवणी लिहिताना साधारण ४३ वर्षांपूर्वीच्या आठवणी जागृत झाल्या. आमचा पहिला परिचय झाला, तो ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या एका मोर्चादरम्यान. पोस्टर्स लावायचे होते, पण नेमका पोस्टर्स लावायचा गोंद राहिला होता. तेव्हा राजू पटवर्धनने सांगितलं की, “गोरेगावला बिमल यांचे कार्यालय आहे. तिथे संपर्क कर आणि गोंद मागवून घे.” स्वाभाविकपणे बिमल कोण, काही माहिती नव्हतं. सांगितल्याप्रमाणे मी फोन केला आणि म्हटलं, “बिमल से बात करनी हैं।” तर समोरून आवाज आला, “मीच बोलतोय. बिमल केडिया.” त्यांना म्हटलं, “मो
आचार्य म्हणजे शुद्ध आचरणाने परिपूर्ण असलेले दिव्योत्तम व्यक्तिमत्व अशा आचार्यांची प्रत्येक कृती व त्याचे सदाचारसंपन्न जीवन हे ब्रह्मचार्यांसाठी आदर्शांचा प्रेरक दीपस्तंभ असतो. आचार्य आपल्या विद्यार्थ्यांना ‘ब्रह्मचारी’ नावाने संबोधतात, ‘विद्यार्थी’ म्हणून नव्हे. कारण, विद्यार्थी म्हणजे केवळ विद्येला ग्रहण करणारा! पण, ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मणि चरति- नेहमी ब्रह्मतत्वात विचरण करणारा!
दोन सैन्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आता युद्ध होत नाही. युद्धाची रुपरेषा बदलली आहे. व्यवसाय, उद्योग, समग्र बाजारमूल्य, महसूल, संचालक मंडळाचे नियंत्रण असे त्याचे स्वरूप झाले असून, अहंकार हे युद्धाचे मूळ कारण आहे
जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या म्हणजे संपूर्णपणे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची स्थिती आहे. केवळ रोग नसणे म्हणजे आरोग्य आहे, असे म्हणता येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चिंता वा नैराश्याची लक्षणे असलेल्या मानसिक त्रासाच्या अनुपरिस्थितीपेक्षा मानसिक कल्याणाची मर्यादा खूप मोठी आहे. व्यक्तीला कल्याणाची अनुभूती हा मानसिक आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे.
कष्ट आणि धैर्याने केलेले कोणतेही सकारात्मक काम यश मिळवतेच, हे सांगणारे रमेश तुपे यांचे जीवन. त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...
नोकरी असो वा व्यवसाय, व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यावर निश्चितपणे प्रभाव पडतो. अनेकांचे तर यशापयश त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. त्यासाठी अर्थातच आवश्यक असते ते व्यक्तिमत्त्व व्यवस्थापन व त्याचा विकास. हे काम कठीण असले तरी अशक्य मात्र नसते.
एक शास्त्रीय भाषेतील व्यक्तिमत्त्वाची व्याख्या सांगते की, वर्तवणूक, भावनिक प्रवृत्तीविषयक आणि मानसिक अंगाचे घटक एकत्रित येऊन जी संमिश्र प्रतिमा बनते ते म्हणजे व्यक्तिमत्त्व. दुसरी एक सर्वसामान्य व्याख्या सांगते की, एखादी व्यक्ती एकांतात असताना किंवा इतरांशी संवाद साधताना किंवा बाह्य वातावरणात वावरताना जे भावनिक आणि मानसिक स्थैर्य आणि सातत्य दाखविते किंवा विशिष्ट स्वभाववैशिष्ट्य दर्शविते ते त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व असते.
तृतीय वर्ष संघ शिक्षित असलेले प्रमोद मुळे यांनी आपल्या स्वभावाने व सेवेने अनेक नवनवीन लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात आणले. शहरात साप्ताहिक विवेकच्या विक्रीचा आलेख चढता ठेवण्यात प्रमोद मुळे यांची प्रचंड मेहनत आहे. त्यामुळेच साप्ताहिक विवेक असो की संघ विचाराचे कोणतेही साहित्य असो शहरात त्याला प्रचंड मागणी असते. ५ डिसेंबर २०१६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत मनमाड येथे प्रवासास आले असताना प्रमोद मुळे यांच्या घरी त्यांनी काही काळ वास्तव्य केले. मोहन भागवत यांचे आदरातिथ्य
आनंद आपल्याजवळच आहे, आपल्यातच आहे, याची जाणीव जादूई आहे. त्यामुळे आपली आनंद घेण्याची क्षमता वाढते आणि आपल्या वातावरणात असणार्या आनंदाची मग तो निसर्ग असेल, माणसं असतील, कलात्मकता असेल, आपण यातून सहज आनंद मिळवतो.
आपण ठाम आणि खंबीर व्हायचे ठरविले तर ते शक्य आहे का? अगदी शक्य आहे. खंबीर राहण्यामध्ये आपल्याला अशा अनेक गोष्टींचा लाभ होतो की, ज्यामुळे आपण आपल्या आयुष्याच्या पथावर अनेक लोकांबरोबर चालत असताना, आपल्या मनाला जे खरोखर वाटते, ते बोलू शकू. आपल्या आयुष्याला संपन्न करण्यासाठी लागणार्या कृती करू शकू.
दुसर्यांच्या मूल्यांचा आणि भावनांचासुद्धा या व्यक्तीला साजेसा आदर असल्यामुळे बाह्य द्वंद्वसुद्धा फारशी होत नाहीत. काही कारणांमुळे अशी बाह्य द्वंद्व झालीच, तर अशा व्यक्ती ते द्वंद्व सोडविण्यासाठी तत्परता दाखवितात. काही व्यक्ती उपजतच खंबीर प्रवृत्तीच्या व स्पष्ट स्वभावाच्या असतात.
आज ‘व्यक्तिमत्व विकास’ ही आधुनिक काळातील उपपत्ती आहे. पण, साडेतीनशे वर्षांपूर्वी ग्रंथलेखन करताना सहज जाता जाता स्वामी त्यातील तत्त्वांवर भाष्य करतात, हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे. तसेच ते अभ्यासण्याजोगे आहे.
सार्यांना आपला इतका का राग येतो? त्यांना आपण का आवडत नाहीत? ते आपल्याला का धिक्कारतात? याचा खूप उहापोह करतो, पण लक्षात ठेवायला पाहिजे की, आपल्यासमोर एखादी गाडी चिखलातून निघून जाते तेव्हा चिखल तिच्याजवळ असणार्यावर उडतो. तिच्यापासून दूर असलेल्या लोकांवर नाही.
आपल्यापैकी प्रत्येकाला एक कामयाब जीवन जगायचे असते. प्रत्येकाच्या मनात ‘हम होंगे कामयाब एक दिन...’ हे तत्त्वज्ञान असते. पण, हे तत्त्वज्ञान असून काय उपयोग? हे तत्त्वज्ञान कामयाब जीवनासाठी जादू तर करणार नाही. त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट करण्याची तयारी फक्त बोटावर मोजता येणार्या लोकांची असते. बाकीच्यांसाठी ते तत्त्वज्ञान फक्त एक स्वप्न असते.
रा. स्व. संघाच्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिराची सांगता
नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो. जाणीवपूर्वक ती आपल्याला आचरणात आणायला लागते. नम्र माणसांना आतूनच आनंदाची जाणीव सतत होत राहते. स्वतःचा ढोल वाजवायच्या आवेशात नम्र माणसे दुसऱ्याचे खच्चीकरण करायचा प्रयत्न कधीच करत नाही. आपल्यासमोर नम्र माणसे आपल्या यशाच्या पत्त्यांचा बंगला उभा करायचा प्रयत्न कधीच करीत नाहीत. कारण, तो बंगला आतून मजबूत नसल्याने केव्हाही कोसळू शकतो.
स्वतःच्या स्व-भावाची उकल करण्याच्या मुलांच्या या वयात ‘हिरोवर्शीप’ अर्थात ‘व्यक्तिपूजा’ हा टप्पा बऱ्याचदा येतो. अशावेळी हे ‘हिरो’ कोण आहेत, यावर त्या पूजेचे फलित काय असणार ते अवलंबून असते.