ठाणे : केंद्र शासनाने दि. २४ डिसेंबर, १९९६ रोजी पंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम,१९९६ अर्थात पेसा कायदा पारित केला आहे. पेसा कायद्याच्या निर्मितीला दि. २४ डिसेंबर, रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंचायती राज मंत्रालयाच्या निर्देशाने हा दिवस "पेसा दिन" ( PESA Day ) म्हणून मुरबाड, भिवंडी, शहापूर तालुक्यातील महसूली गावांमध्ये साजरा करण्यात येणार आहे.
Read More
ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करून २४ तास अखंड वीजपुरवठा करण्यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपयांचा आराखडा करण्यात येत आहे. या आराखड्यासाठी केंद्र सरकारकडून ६० टक्के अनुदान दिले जाणार आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या आराखड्यात अन्य लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असे निर्देश कपिल पाटील यांनी दिले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गावातील स्वातंत्र्यसैनिक, वीर जवानांसह कर्तृत्ववान व्यक्तींच्या नावाचा फलक गावाच्या वेशीवर लावण्याचा उपक्रम केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाकडून राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर `मेरी माटी मेरा देश' उपक्रमातून साडेचार कोटी वृक्षांचे रोपण केले जाईल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी येथे दिली.
केंद्र सरकारने संसदेत अविश्वास प्रस्तावाचा पराभव केला आणि देशभरात नकारात्मकता पसरवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. क्षेत्रीय पंचायती राज परिषदेस संबोधित करताना ते बोलत होते.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून म्हणजे २४ एप्रिलपासून ३६ तासांत देशाच्या विविध भागांमध्ये ५ हजार किमी पेक्षा जास्त अंतराचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. यादरम्यान ते आठ कार्यक्रमांना उपस्थित राहतील आणि सात वेगवेगळ्या शहरांचा प्रवास करणार आहेत.
‘राष्ट्रीय पंचायती राज दिना’निमित्त दि. 24 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीर येथे जाण्याची शक्यता आहे. यावेळी ते सांबा येथे काश्मिरी पंडितांसोबतही संवाद साधू शकतात, अशी माहिती जम्मू-काश्मीर भाजपचे प्रदेश संघटनमंत्री अशोक कौल यांनी दिली.