"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची किती आणि तुमची उंची किती ? याचा विचार करा आणि मग त्यांच्यावर टीका करा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती तुफानाला उद्धव ठाकरे घाबरले असून, मोदीजींचे हे तुफान जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील." असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरेंवर केला आहे. ठाकरेंनी मोदीजींचा वारंवार एकेरी उल्लेख टाळायला हवा होता. ते पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक चुका करत असून हे प्रकार जर थांबले नाहीत तर कधी ना कधी स्फो
Read More
आम्ही पन्नास थरांची दहीहंडी फोडली, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाचोरा शिवसंवाद यात्रेत प्रत्युत्तर दिले आहे. ५० थर होते की आणखी काही, असा उपरोधिक सवाल त्यांनी आपल्या भाषणात विचारला आहे. दहीहंडी कालच होऊन गेली आहे. कालच महाराष्ट्राच्या तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, त्यांनी पण पन्नास थर लावले होते.
‘जळगाव तरूण भारत’ने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भडगाव येथे सोमवार, १५ ऑक्टोबर रोजी आयोजित अल्पना कला स्पर्धा २०१८ अंतर्गत रांगोळी स्पर्धेत गायत्री संजय पवार हिने प्रथम तर सौ. ममता अतुलसिंह परदेशी यांनी द्वितीय तर अंकिता रुपेश जैन यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर पाच विजेत्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. ही स्पर्धा संत सेना महाराज विठ्ठल मंदिर नाचणखेडा रोड येथे उत्साहात पार पडली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
‘जळगाव तरुण भारत’ने नवरात्रोत्सवानिमित्त भडगाव येथे सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ६.३० दरम्यान सर्वांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा संतसेना महाराज विठ्ठल रुख्मिणी मंदिर, नाचणखेडा रोड, भडगाव येथे होणार असून त्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे
पोचारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो.कॉ. अमृत पाटील यांना खडकदेवळा ता. पाचोरा शिवारात मांडुळ सापाची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना दिली. त्यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीसांनी कारवाई केली. यात एक इसम व मांडूळासह मिळून आला आहे.
तालुक्यातील लाख या ३० ते ४० वस्ती असलेल्या गावी आजपावेतो कुठलाही रस्ता अथवा बस सेवा नव्हती त्यामुळे गावातील लोक सर्व आधुनिक काळात सर्व सेवा सुविधापासून वंचित होते.
येथे ‘जलयुक्त शिवार’ योजनेत पाण्याचा प्रश्न कायम मिटणार असे वाटत होते , मात्र शासकीय यंत्रणांकडून दुर्लक्ष झाल्याचा अनुभव ग्रामस्थांना आला.